एक्स्प्लोर

Nashik Saroj Ahire : शरद पवार हे वडिलांसमान, मात्र अजित पवारांच्या शपथविधीलाही उपस्थित; नाशिकच्या सरोज अहिरे कुणासोबत?

Nashik Saroj Ahire : शरद पवार (Sharad Pawar) यांच्या अगदी जवळच्या असलेल्या आमदार सरोज अहिरे नेमक्या कुणाच्या बाजूने हा प्रश्न अनुत्तरित आहे. 

Nashik Saroj Ahire : शरद पवारांच्या निकटवर्तीय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमदार सरोज अहिरे (Saroj Ahire) या दोन दिवसांपासून नॉट रिचेबल होत्या. विशेष म्हणजे, अजित पवार (Ajit Pawar) यांच्या शपथविधीला देखील हजर होत्या. मात्र अद्यापही त्यांचा निर्णय तळ्यात मळ्यात असल्याचे दिसून येत आहे. मुंबईत असलेल्या सरोज अहिरे या नाशिकला परतल्या आहेत. आज कुठल्याच बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचे स्पष्ट करत तब्येत बरी नसल्यानं नाशिकला आल्याची माहिती त्यांनी एबीपी माझाला दिली आहे. 

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर राज्यभरात नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ सुरू असून त्याचा पहिला अंक नाशिकमध्ये (Nashik) पाहायला मिळाला. नाशिकच्या राष्ट्रवादीत दोन गट पडले असून काल भुजबळ समर्थकांनी (Chhagan Bhujbal) राष्ट्रवादी कार्यालय ताब्यात घेतल्याने मोठा गोंधळ उडाला. यावेळी शरद पवार समर्थक कार्यालयाच्या बाहेर असल्याने त्यांची बैठक होऊ शकली नाही. परिणामी दोन्ही गटात काही काळ चांगलाच वाद रंगल्याचे पाहायला मिळाले. दुसरीकडे अजित पवार यांच्या शपथविधीला उपस्थित असलेल्या आमदार सरोज अहिरे या दोन दिवसांपासून नॉट रिचेबल होत्या. शरद पवार (Sharad Pawar) यांच्या अगदी जवळच्या असलेल्या अहिरे नेमक्या  कुणाच्या बाजूने हा प्रश्न अनुत्तरित आहे. 

दरम्यान, सरोज अहिरे संदर्भात महत्वाची माहिती समोर येत आहे की, अहिरे या दोन दिवसांपासून मुंबईत होत्या. रात्री उशिरा त्या मुबंईहुन नाशिकमध्ये परतल्या असून आज कुठल्याच बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. तब्येत बरी नसल्यानं नाशिकला आल्याची माहिती त्यांनी एबीपी माझाला दिली असून आज रुग्णालयात दाखल होणार आहे. आजारपणामुळे सध्या मानसिक स्थिती चांगली नसल्याची माहिती देत सायंकाळी आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे त्या म्हणाल्या आहेत. 

सुप्रिया सुळेंची घेतली भेट

नाशिकच्या देवळाली मतदारसंघाच्या (Deolali Assembaly) राष्ट्रवादी आमदार सरोज आहिरे या पुन्हा शरद पवारांसोबत जाणार का? असा प्रश्न आता उपस्थित होत असून काल सुप्रिया सुळेंसोबत त्यांची भेट झाल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे. शरद पवारांच्या अत्यंत निकटवर्तीय म्हणून सरोज आहिरे या ओळखल्या जातात. अनेक जाहीर कार्यक्रमात बोलताना शरद पवार हे माझ्या वडीलांसमान असल्याचंही त्यांनी वक्तव्य केल आहे. मात्र दोनच दिवसांपूर्वी अजित पवारांसह इतर मंत्र्यांच्या शपथविधीला त्या उपस्थित असल्याने हा चर्चेचा विषय बनला होता.

दरम्यान, शपथविधी सोहळ्यानंतर त्या नॉट रिचेबल झाल्या होत्या. त्यावेळी समर्थकांचेही फोन उचलत नसल्याने समर्थकांसह कार्यकर्त्यांमध्ये मोठा संभ्रम सध्या निर्माण झाल्याचे दिसून आले. मात्र रात्री उशिरा त्या नाशिकला पोहचल्या असून आज त्या भूमिका स्पष्ट करणार असल्याचे समजते. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! अशोक खरातप्रकरणात मोठी कारवाई; आधी रुपाली चाकणकरांची चौकशी, आता नामकर्ण आवारेला अटक
मोठी बातमी! अशोक खरातप्रकरणात मोठी कारवाई; आधी रुपाली चाकणकरांची चौकशी, आता नामकर्ण आवारेला अटक
NEET Paper Leak Case : NEET पेपरफुटीप्रकरणी शुभम खैरनार, मग धनंजय लोखंडेला अटक; आता पुण्यातील महिलेलाही घेतलं ताब्यात, मोबाईल, लॅपलॉप उघडताच हादरवणारी माहिती
NEET पेपरफुटीप्रकरणी शुभम खैरनार, मग धनंजय लोखंडेला अटक; आता पुण्यातील महिलेलाही घेतलं ताब्यात, मोबाईल, लॅपलॉप उघडताच हादरवणारी माहिती
Imtiaz Jaleel : एमआयएम नगरसेवक मतीन पटेलांवरील कारवाईवरून इम्तियाज जलील भडकले; म्हणाले, न्यायाधिशांना हे मान्य आहे का?
एमआयएम नगरसेवक मतीन पटेलांवरील कारवाईवरून इम्तियाज जलील भडकले; म्हणाले, न्यायाधिशांना हे मान्य आहे का?
NEET Paper Leak Case : नाशिकमधील शुभम आणि पुण्यातील धनंजयने NEET चा पेपर फोडला; किती रुपयांना विकला?, धक्कादायक महिती समोर
नाशिकमधील शुभम आणि पुण्यातील धनंजयने NEET चा पेपर फोडला; किती रुपयांना विकला?, धक्कादायक महिती समोर

व्हिडीओ

Raj Thackeray 2008 Railway Case : गुन्हा कबूल नाही; राज ठाकरेंची स्पष्टोक्ती, कोर्टात काय घडलं?
Nitin Gadkari News : नितीन गडकरी पालखी मार्गावेळी बसने प्रवास करणार, ताफ्यातल्या 50 टक्के गाड्या कमी
Jaleel On Sanjay Shirsat : त्यांना लिंबू पाण्याची सवय नाही, देसी नको इंग्लिश घ्या, जलील यांचा शिरसाटांना टोला | ABP Majha
Sunil Shelke Mumbai : भाजपसोबत जाणार का? रोहित पवारांच्या दाव्यावर सुनील शेळके काय म्हणाले?
Rohit Pawar On Sunil Shelke : मी कर्जत जामखेडमधूनच निवडणूक लढवणार! रोहित पवार यांचं स्पष्टीकरण

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय! मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्या निम्म्या; परदेश दौरे रद्द, सार्वजनिक वाहतुकीचा वापर बंधनकारक
मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय! मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्या निम्म्या; परदेश दौरे रद्द, सार्वजनिक वाहतुकीचा वापर बंधनकारक
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 मे 2026 | बुधवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 मे 2026 | बुधवार
मोठी बातमी! अशोक खरातप्रकरणात मोठी कारवाई; आधी रुपाली चाकणकरांची चौकशी, आता नामकर्ण आवारेला अटक
मोठी बातमी! अशोक खरातप्रकरणात मोठी कारवाई; आधी रुपाली चाकणकरांची चौकशी, आता नामकर्ण आवारेला अटक
भाजप संघटना आणि केंद्रीय मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाची चर्चा रंगली; जून महिन्यात तिसऱ्या कार्यकाळातील दोन वर्ष पूर्ण होणार
भाजप संघटना आणि केंद्रीय मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाची चर्चा रंगली; जून महिन्यात तिसऱ्या कार्यकाळातील दोन वर्ष पूर्ण होणार
ठाणे कोर्टात हजर, 2008 च्या आंदोलानाचा खटला; न्यायमूर्तींचे राज ठाकरेंना 7 प्रश्न, मनसेप्रमुखांनी दिली थोडक्यात उत्तरे
ठाणे कोर्टात हजर, 2008 च्या आंदोलानाचा खटला; न्यायमूर्तींचे राज ठाकरेंना 7 प्रश्न, मनसेप्रमुखांनी दिली थोडक्यात उत्तरे
 Petrol Diesel Rate : पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यता, पेट्रोलियम मंत्र्यानंतर RBI चे गव्हर्नर संजय म्हलोत्रा यांचे सूचक वक्तव्य
पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यता, RBI चे गव्हर्नर संजय म्हलोत्रा यांचे सूचक वक्तव्य
'विरोधी पक्षनेता रबर स्टॅम्प नाही, तुम्हाला तुमचा उमेदवार निवडायचा आहे..' CBI संचालक निवडीवर राहुल गांधींची असहमती; मोदींच्या निवासस्थानी दीड तास बैठक अन् महाराष्ट्र कनेक्शन
'विरोधी पक्षनेता रबर स्टॅम्प नाही, तुम्हाला तुमचा उमेदवार निवडायचा आहे..' CBI संचालक निवडीवर राहुल गांधींची असहमती; मोदींच्या निवासस्थानी दीड तास बैठक अन् महाराष्ट्र कनेक्शन
Pimpri Chinchwad : 65 वर्षीय महिलेचा पाय रस्त्यावरील उघड्या व्हॉल्वमध्ये अडकला; दोन तासांच्या थरारानंतर सुखरूप सुटका
65 वर्षीय महिलेचा पाय रस्त्यावरील उघड्या व्हॉल्वमध्ये अडकला; दोन तासांच्या थरारानंतर सुखरूप सुटका
Embed widget