Nandurbar ZP Schools : वादळानं शाळांचे पत्रे उडवले, महिनाभरापासून विद्यार्थी व्हरांड्यात शिकताय, नंदुरबारच्या शाळांची व्यथा
Nandurbar News : नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात झालेल्या वादळामुळे जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांवरील पत्रे आणि छप्परच उडून गेले आहे.
![Nandurbar ZP Schools : वादळानं शाळांचे पत्रे उडवले, महिनाभरापासून विद्यार्थी व्हरांड्यात शिकताय, नंदुरबारच्या शाळांची व्यथा maharashtra nashik news Zilla Parishad schools in Nandurbar district damaged due to stormy wind Nandurbar ZP Schools : वादळानं शाळांचे पत्रे उडवले, महिनाभरापासून विद्यार्थी व्हरांड्यात शिकताय, नंदुरबारच्या शाळांची व्यथा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/01/7c128c39735b2e5cd9af129a4214b7271688201759331738_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Nandurbar ZP Schools : नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात झालेल्या वादळाने अनेक शाळांचं नुकसान झाल्याचे चित्र आहे. या वादळाचा तडाखा जिल्हा परिषदेच्या 44 शाळा सापडल्या असून या शाळांवरील पत्रे आणि छप्परच उडून गेले आहे. विशेष म्हणजे, याबाबत दुसऱ्या दिवशी तातडीने पंचनामे झाले. मात्र आता महिना उलटत आला असला तरी शिक्षण विभागाकडून या शाळांची दुरुस्तीच होत नसल्याने ऐन पावसात विद्यार्थ्यांना थेट वरांड्यातच शिक्षण घेण्याची नामुष्की ओढावली आहे.
नंदुरबार जिल्ह्यातल्या बहुतांश भागात जूनच्या पहिल्या आठवड्यात वादळी वाऱ्याने (Stormy Wind) थैमान घातले आहे. या वादळात जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या (Zilha Parishd School) अनेक शाळा सापडल्या असून या शाळांवरील पत्रे आणि छप्परच या वादळात उडून गेले आहे. विशेष म्हणजे याबाबत दुसऱ्या दिवशी तातडीने जवळपास 44 शाळांचे पंचनामे झाले. सर्वच मुख्याध्यापकांनी शाळांच्या या दुरावस्थेबाबत वरिष्ठ स्तरावर अहवाल देखील पाठवले. मात्र जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे या शाळांच्या दुरुस्तांसाठी पैसे नसल्याने आता शाळा सुरु होवून पंधरवाडा उलटल्याने थेट विद्यार्थ्यांना वर्ग खोल्याच नसल्याने वरंड्यात शिक्षण घेण्याची नामुष्की ओढावली आहे. त्यामुळेच आता विद्यार्थ्यांकडून या शाळा दुरुस्तीची अपेक्षा व्यक्त होत आहे .
विशेष म्हणजे आता पावसाळा (Rainy Season) सुरु झाला असून अशातच थेट पावसाचे पाणी या व्हरांड्यात येत असल्याने विद्यार्थ्यांसमवेत शालेय साहित्य देखील भिजण्याची शक्यता आहे. मात्र एकीकडे शासनाकडे मोठे प्रकल्प राबविण्यासाठी वारेमाप पैसे असताना शाळांसारख्या संस्थाच्या दुरुस्तीसाठी पैसा नसावा, ही दुर्देवी बाब असल्याचे चित्र आहे. याबाबत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला संपर्क केला असता त्यांनी मूग गिळून गप्प राहणंच पंसत केले आहे. तर दुसरीकडे आपल्या गावातील विद्यार्थ्यांचे होणारे हाल आणि शैक्षणिक नुकसान पाहुन अनेक ग्रामपंचायती या शाळांच्या दुरुस्तीसाठी पुढे सरसावल्या आहेत.
विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी लढा
दरम्यान शालेय पोषण आहार असेल वा, शैक्षणिक क्रीडा साहित्य पुरवण्याचा ठेका, यासाठी राज्यभर ठेकेदारांवर कोट्यावधींचा निधी वितरित केला जातो. मात्र पन्नास वर्षांहून अधिकचा काळ ज्ञानार्जन करुन भारताचे भविष्य घडविणाऱ्या अशा शाळांच्या बांधणी आणि दुरुस्तीची बाब शासनाने गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. ही अवस्था जिल्हा परिषदेच्या 44 शाळांची असली तरी खाजगी आणि विना अनुदानीत शाळांचे असे नुकसान पाहता आज हजारो विद्यार्थ्यांना वर्ग खोल्याविना उघड्यावर शिक्षणासाठी लढा द्यावा लागत आहेत. याकडे मायबाप सरकारने तरी लक्ष द्यावे, ऐवढीच माफक अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
पुनर्वसन केंद्रात पहिल्याच पावसात गळती.....
नंदूरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या धडगाव ग्रामीण रुग्णालयात नुकतेच बांधण्यात आलेल्या पोषण पुनर्वसन केंद्रात पहिल्याच हलक्या सरींच्या पाउसात गळायला सुरवात झाली आहे. पोषण पुनर्वसन केंद्रात अडमिट असलेल्या बालकांचे गैरसोय झाली असून हलक्या दर्जाचे काम झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली जात असून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. मुळातच धडगाव तालुक्यात आरोग्याच्या सुविधेच्या अभावी तालुक्यातील रुग्णांचे हाल होत असतानांच कुपोषित बालकांच्या पोषण आणि उपचारासाठी बांधण्यात आलेल्या NRC केंद्राच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभार समोर आला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Nandurbar : नंदुरबारमध्ये पोषण आहारात निकृष्ट धान्याचा पुरवठा, कुपोषणाची समस्या कशी दूर होणार?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)