एक्स्प्लोर
Maharashtra: पावसाळ्यात कुठे फिरायला जायचं हा विचार करताय? मग 'या' ठिकाणांना नक्की भेट द्या
Monsoon Tourism: अवघ्या महाराष्ट्रात पावसाचा वर्षाव आता सुरु झाला असताना अनेकजण फिरायला जायचा प्लॅन करत असतील. मुंबई-पुण्याजवळच काही ठिकाणं आहेत, जिथला पावसानंतरचा आसमंत हा हिरवागार असतो.

Places to visit in rainy season in maharashtra
1/11

लोणावळा, खंडाळा: पुणे-मुंबई महामार्गावर ऐन घाटमाथ्यावर असलेली ही थंड हवेची ठिकाणं आहेत. मुंबई-पुण्यात राहणाऱ्यांसाठी लोणावळा आणि खंडाळा ही एकदम सोयीची पर्यटनस्थळं आहेत. टायगर पॉईंट, लायन पॉईंट, भुशी डॅम, वाळवळ डॅम ही लोणावळ्यातील प्रसिद्ध ठिकाणं आहेत.
2/11

लोणावळा-खंडाळ्याचा हिरवागार निसर्ग, थंड हवा, डोंगरमाथ्यावरुन कोसळणारे धबधबे आणि दाट धुकं ही पर्यटकांना आकर्षित करणारी बाब आहे. येथील निसर्ग सौंदर्य पाहून मनाला सुखद वाटतं. म्हणूनच पावसाळ्यात या ठिकाणी पर्यटकांची नेहमी गर्दी असते.
3/11

माथेरान: पावसाळ्यात माथेरानला जाण्याची आणि तिथलं वनसौंदर्य पाहण्याची मज्जाच वेगळी असते. माथेरानचा संपूर्ण माथा हा घनदाट झाडी, लाल पायवाटांनी भरलेला आहे. शार्लोट लेक, सनसेट पॉईंट, पॅनारोमा पॉईंट, लुईझा पॉईंट अशा अनेक ठिकाणांवरुन दिसणारी डोंगरदऱ्यांची दृश्य मनाला भुरळ घालतात.
4/11

मुंबई आणि पुण्याच्या पर्यटकांसाठी माथेरान हे सोयीचं ठिकाण आहे. माथेरानच्या माथ्यावर राहण्याची सोय देखील आहे. विविध हॉटेल्समध्ये तुम्ही राहायला देखील जाऊ शकता. प्रदूषणमुक्त हिल स्टेशन अशी ओळख असलेल्या माथेरानमध्ये पर्यटक सुट्टीचा खरा आनंद घेऊ शकतात. माथेरान हे मुंबईपासून 110 किलोमीटर अंतरावर आहे.
5/11

माळशेज घाट: माळशेज घाटाचं निसर्ग सौंदर्य पावसाळ्याच्या दिवसांत आणखी खुलतं. या पावसाळ्यात तुम्हाला खरी मज्जा घ्यायची असेल तर माळशेज घाटला नक्की भेट द्या. पावसाच्या सरी अंगावर झेलत आणि ढगांच्या ओलसर धुकट वातावरणात हरवून जाण्यात फार आनंद असतो.
6/11

ना शहर ना गाव, फक्त हिरव्यागार झाडांमधून जाणारा घनदाट रस्ता, ही आहे माळशेज घाटाची ओळख. पावसाळ्यात भेट देण्याच्या सर्वोत्तम ठिकाणांपैकी माळशेज घाट हे एक ठिकाण आहे. मोहक वळणदार रस्त्यांपासून ते हिरवी चादर घातलेल्या उंच पर्वतांपर्यंत हे एक सर्वोत्तम ठिकाण आहे. माळशेज घाटातील बरीचशी वळणं आणि बरीचशी ठिकाणं पृथ्वीवरील स्वर्गासारखीच वाटतात.
7/11

भीमाशंकर: तुम्ही पावसाळ्यात भीमाशंकरला भेट देत असाल तर येथील आल्हाददायक निसर्गसौंदर्याचा पुरेपूर आनंद घेता येईल. भीमाशंकरचं जंगल, सदाबहार अभयारण्य, हिरवा निसर्ग, भोवतालच्या नद्यांचा हा परिसर पर्यटकांचे मन आकर्षित करतो.
8/11

पावसाळ्यात हिरव्या निसर्गाचा आनंद घ्यायचा असल्यास भीमाशंकर हे उत्तम ठिकाण आहे. पावसाळा आला की जंगलप्रेमी, ट्रेकर्स, पक्षीनिरीक्षक अशा सर्वांना भीमाशंकरच्या वाटा कायम खुणावत असतात.
9/11

देवस्थान, हिल स्टेशन आणि वन्य प्राणी यांची संपदा असलेलं भीमाशंकर हे नैसर्गिक पर्यटनस्थळ आहे, येथील मनमोहक परिसर तुमच्या डोळ्यांचे पारणे फेडतो. महाराष्ट्राचा वन्य प्राणी शेकरु हा दुर्मिळ वन्य जीव येथे आढळतो.
10/11

आंबोली घाट: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हिल स्टेशन म्हणून ओळखलं जाणारं हे शहर आहे. पावसाळ्यात या ठिकाणची शोभा आणखी वाढते. आंबोली घाटातील वातावरण थंड, शांत आणि प्रसन्न असतं. आंबोली घाट हा पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या धबधब्यांसाठी प्रसिद्ध आहे. आंबोली धबधबा, हिरण्यकेशी धबधबा आणि नांगरतास धबधबा हे पर्यटकांची प्रमुख ठिकाणं आहेत.
11/11

आंबोली घाटावर अनेक प्रजातींचे पक्षी, फुलपाखरं आढळतात. सनसेट पॉईंट हा घाटाच्या मुख्य आकर्षणापैकी एक आहे, इथून संपूर्ण घाटमाथ्याचे, दऱ्यांचे आणि टेकड्यांचे सुंदर दृश्य दिसते. पावसाळ्यात आंबोली घाटात मुसळधार पाऊस पडतो, ज्यामुळे संपूर्ण परिसर हिरव्यागार नंदनवनात बदलतो. आंबोली घाटातील दाट धुक्यात हरवून जाण्याची मज्जा एकदा तरी अनुभवण्यासारखी आहे.
Published at : 26 Jun 2023 01:31 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
जळगाव
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion