(Source: ECI/ABP News/ABP Majha)
MLA Devendra Bhuyar : हा फक्त इंटर्व्हल, पिक्चर अभी बाकी है, आमदार देवेंद्र भुयारांचा राजू शेट्टींना इशारा
MLA Devendra Bhuyar : स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी झाल्यावर आमदार देवेंद्र भुयार आता कोणता निर्णय घेणार, ते काय करणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
MLA Devendra Bhuyar : स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी झाल्यावर आमदार देवेंद्र भुयार आता कोणता निर्णय घेणार, ते काय करणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याबाबत आमदार भुयार यांना विचारले असता सध्या फक्त इंटर्व्हल झाला असून, पिक्चर अभी बाकी है ! अशी सूचक प्रतिक्रिया दिली. गुरुवारी हिवरखेड येथे राजू शेट्टी यांनी शेतकरी मेळाव्यात आमदार देवेंद्र भुयार यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी करत असल्याची घोषणा केली. याबद्दल बोलताना नेत्याचं फक्त एक रूप पाहावं दुसरं रूप पाहू नये, नेत्याचं बाह्यरूप पाहावं अंतररूप पाहू नये. ज्यावेळी नेत्याचं खरं रूप जनतेसमोर येते त्यावेळी तो नेता राहत नाही. कालच्या सभेत याचं प्रतिबिंब दिसून आलं, अशी बोचरी टीका आमदार देवेंद्र भुयार यांनी राजू शेट्टी यांच्यावर केली.
मी जनतेच्या सेवेत स्वतःला गुंतवून घेतले आहे, मला 24 तासही कमी पडतात. त्यामुळे कोण काय बोललं आणि कोणी काय निर्णय घेतला? याचं मला काही देणें घेणे नाही. कालच्या सभेत भाजपचे कार्यकर्ते होते, जे निवडणुकीच्या प्रचारात माझ्या विरोधात होते. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला. त्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही, हा निर्णय मला मान्य असल्याचं आमदार भुयार म्हणाले.
राजू शेट्टी यांच्या या निर्णयाबद्दल जर अजून बोललो तर चळवळीला नख लागल्यासारखं होईल. या मतदारसंघात मागील 10 वर्षात जी कामं झाली नाहीत, ती कामं मी केली, मग मी बिनकामाचा कसा? जनतेचा सर्वे करून बघावा, असं आव्हान यावेळी देवेंद्र भुयार यांनी दिलं. राजू शेट्टी यांनी घरदार विकून माझा निवडणूक खर्च दिल्याचं सांगतात. मला 25 लाख वर्गणी त्यावेळी हितचिंतक यांनी दिली होती, त्यापैकी केवळ 7 लाखच मला मिळाली अन् त्याचाही हिशोब मी दिला असल्याचं आमदार भुयार यांनी सांगितलं.
माझं निलंबन मला विश्वासतच घेऊन करण्यात आलं. मी कुणाच्याही विरोधात बोलणार नाही. मी सध्या न बोलायचं ठरवलं आहे, सगळं आताच उघड करणार नाही. आजकाल कोटींशिवाय काम होत नाही. लाखात तर कामच होत नाही, ज्या लोकांना मी कामं दिली त्यांनी सांगावं मी टक्केवारी मागितली. रविकांत तुपकर माझे जवळचे मित्र, माझ्यावर 64 गुन्हे आहेत, घरात बसून गुन्हे दाखल होत नाहीत, हे चळवळीचे गुन्हे आहेत असंही आमदार देवेंद्र भुयार यावेळी बोलताना सांगितले.