Maharashtra Breaking News LIVE Updates : जर 15 वर्षा आधी राज साहेबांनी कानाखाली लगावली नसती तर आज परिस्थिती तीच असती- शर्मिला ठाकरे
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
1.कीव्हमध्ये रस्त्यावर दिसल्यास गोळी घालण्याचे आदेश, युक्रेननंतर फिनलँड आणि स्वीडनला रशियाचा इशारा, चेर्नोबिलनंतर आणखी एक अणुप्रकल्प ताब्यात घेण्याचा प्रयत्न
2. अमेरिकेची युक्रेनला ३५० दशलक्ष डॉलरची लष्करी मदत, जर्मनी १ हजार अँटी टँक , ५०० स्टिंगर क्षेपणास्त्रे पुरवणार, फोनवरुन झालेल्या चर्चेत झेलेन्सीकींची मोदींकडे राजकीय मदतीची मागणी
3. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना घेऊन दोन विमानं मायदेशी परतले, ४५०हून अधिक विद्यार्थ्यांनी सोडला सुटकेचा निश्वास, मुंबईत भाजप आणि राष्ट्रवादीत श्रेयवादाची लढाई
4. नाना पटोले, बच्चू कडू, आशिष देशमुख आणि संजय काकडेंचे बेकायदेशीररित्या फोन टॅप केल्याचा आरोप, आयपीएस रश्मी शुक्लांवर गुन्हा दाखल, महाविकास आघाडीचा फडणवीसांवर हल्लाबोल
5.मराठीचा वर्तमान आणि भविष्यावर वैचारिक मंथन, एबीपी माझाच्या अभिजात मराठी मोहिमेत विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती, मराठी राजभाषा निमित्त दिवसभर विशेष कार्यक्रम
6. मागण्यांची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही, खासदार संभाजीराजे छत्रपतींचा निर्धार
7. 48 तास उलटले; शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या घरी अजूनही आयकर विभागाची छापेमारी सुरुच
Shivsena Corporator Yashwant Jadhav IT Raid : गेले 48 तास उलटूनही शिवसेना नेते व मुंबई मनपा स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी माझगाव येथे आयकर विभागाची छापेमारी सुरूच आहे.. शुक्रवारी सकाळपासून आयकर विभागाची छापेमारी सुरू झाली आहे. दरम्यान, शिवसैनिकांनी काल आयकर विभागाच्या छापेमारीविरोधात जोरदार घोषणाबाजी केली होती. शिवसैनिकांनी आयकार विभागाचे छापेमारीचा निषेध केला आहे.
गेल्या 48 तासाहून अधिक काळ झाले आयकर विभागाचे अधिकारी यशवंत जाधव यांच्या घरी चौकशी करत आहेत. काल शिवसैनिक आक्रमक झाल्यानंतर स्थानिक पोलिसांनी त्यांना समजून शांत केले होते. रात्रीपासून शिवसैनिक यशवंत जाधव यांच्या घराबाहेर बसून आहेत. यशवंत जाधव यांच्या घरावर आयकर विभागाने शुक्रवारी सकाळपासूनच छापेमारी सुरू केली आहे.
यशवंत जाधव यांना घरातून बाहेर काढणार असल्याचं समजल्यावर शिवसैनिक मोठ्या संख्येने यशवंत जाधव यांच्या घराच्या बाहेर एकत्र झाले झाले होते. त्यामुळे माझगाव परिसरात पोलिस बंदोबस्त अधिक वाढवण्यात आला होता. आयकर विभागाला चौकशी करीत असताना कोणताही त्रास होऊ नये यासाठी पोलिस बंदोवस्त ठेवण्यात आला आहे.
8.जिल्ह्यात चार आमदार तरीही बीडचे राष्ट्रवादी भवन अंधारात! दीड लाखांच्या विजबिलामुळे कनेक्शन कट
9.मुंबईसह आसपासच्या सर्व महापालिकांतील धोकादायक आणि बेकायदेशीर बांधकामं थांबवा; हायकोर्टाचा आदेश
10. भारताकडून धर्मशालाच्या दुसऱ्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात श्रीलंकेचा सात विकेट्सनी धुव्वा, रविंद्र जाडेजा, श्रेयस अय्यरच्या दमदार खेळीनं टी-20 मालिका भारताच्या खिशात
देशाचं वातवरण कलुषीत करण्याचं काम सुरूय - अशोक चव्हाण
देशाच वातावरण कलुशित करून आपल्याला मागे पाडण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप गंभीर आरोप राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केंद्रावर केलाय शिवाय जी बुलेट ट्रेन अहमदाबाद,नागपूरला जाऊ शकते ती मराठवाड्यात का येऊ शकत नाही असा सवाल ही अशोक चव्हाणांनी केंद्र सरकारला परभणीत विचारलाय.
परभणीत आज सार्वजनिक बांधकाम विभाग व महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येणाऱ्या ८० कोटीच्या विविध कामाचे भुमिपुजन तसेच छत्रपती शिवाजी महाराज,डॉ बाबासाहेब आंबडेकर यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाचे हि भूमिपुजन सावर्जनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमांनंतर आयोजित सभेत त्यांनी केंद्र सरकार वर गंभीर आरोप केले आहेत तसेच नवाब मालिकांबरोबर जे होतंय ते अत्यंत दुर्दैवी असुन विरोधकांकडून घाणेरडे आणि सुडाचे राजकारण केले जात आहे आमचेही सरकार होते मात्र आम्ही असे खालच्या पातळीचे राजाकडून कधी नाही असे हि ते म्हणाले ..
चंद्रपूर : पोटदुखीच्या त्रासाने जवानाचा मृत्यू
चंद्रपूर : सावली तालुक्यातील सादागड येथील आशीष मंगाम (27) या सैन्यदलातील जवानाचा मृत्यू, पोटदुखीच्या त्रासाने युवा सैनिकाच्या झालेल्या मृत्यूने हळहळ, उत्तर प्रदेशातील मेरठ येथील सैनिक रुग्णालयात पोटदुखीच्या तासानंतर करण्यात आले होते दाखल, मृत्यूची माहिती परिवाराला देण्यात आल्यानंतर तहसीलदारांनी घेतली कुटुंबाची भेट, उद्या मूळगावी सादागड येथे पोचणार पार्थिव, अविवाहित असलेल्या या जवानावर सैन्य इतमामात होणार अंत्यसंस्कार
जर 15 वर्षा आधी राज साहेबांनी कानाखाली लगावली नसती तर आज परिस्थिती तीच असती.- शर्मिला ठाकरे
जर पंधरा वर्षांपूर्वी माझ्या नवऱ्याने कानाखाली लगावली नसती तर आजही आपल्याला तेच चित्र पाहायला मिळालं असतं, असे म्हणत राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी मराठी राजभाषा दिनाच्या दिवशी मनसेच्या महिला कार्यकर्त्यांचे संबोधन केले. महाराष्ट्रात जर मराठी पाट्यांसाठी कोणाच्या काचा, दुकाने फोडावे लागत असतील तर ते लज्जास्पद आहे, असे यावेळी शर्मिला ठाकरे म्हणाल्या. मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून मनसेच्या वतीने महिलांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी 11 कर्तृत्ववान मराठी महिलांचा गौरव देखील करण्यात आला. मराठी भाषा दिन म्हणून आजच्याच दिवशी नाही तर वर्षाचे 365 दिवस मराठीतच बोलले पाहिजे आणि यापुढे सर्व नागरिकांनी मराठीतच बोलावे असे आवाहन महिला मनसे पदाधिकारी यांना शर्मिला ठाकरे यांनी केले. तसेच युवराज संभाजी छत्रपती मराठा आरक्षणासाठी गरज असलेल्या आमरण उपोषणा बाबत विचारले असता, समाजात आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या लोकांना आरक्षण दिले पाहिजे असे देखील आरक्षणाच्या मुद्यावर शर्मिला ठाकरे म्हणाल्या. तर लता दिदींच्या स्मारकापेक्षा त्यांच्या आठवणीत मोठे संगीत विद्यापीठ सुरू करावे असे मत यावेळी शर्मिला ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केले..
राज्यपाल यांची राजकीय फटकेबाजी, खैरे आणि बागडे यांना कानपिचक्या -
राज्यपाल कोश्यारी यांनी कार्यक्रमात माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि विधानसभा अध्यक्ष यांना टोला लगावला. खैरे यांना उद्देशून बोलतांना राज्यपाल कोश्यारी म्हणाले, आमदार-खासदार असताना लोक मागे-पुढे असतात. परंतु तुम्ही माजी झालात की कुणी येत नाही का हो खैरेजी! तर ‘नोट आणि वोट’ संस्कृतीतून नेत्यांनी बाहेर पडण्याची गरज असल्याचे बागडे यांच्याकडे पाहून राज्यपाल म्हणाले.
कोल्हापुरातील मराठा संघटनांकडून राज्य सरकारला मंगळवार पर्यंतचा अल्टिमेटम
कोल्हापुरातील मराठा संघटनांकडून राज्य सरकारला मंगळवार पर्यंतचा अल्टिमेटम
संभाजीराजेंच्या मागण्या मान्य न केल्यास बुधवारपासून जिल्ह्यात उग्र आंदोलन छेडणार
बुधवारनंतर कशा पद्धतीने आंदोलन होईल त्याची जबाबदारी सरकारची असेल
मराठा संघटना प्रतिनिधींचा राज्य सरकारला इशारा
संभाजीराजे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पार पडली कोल्हापुरात संघटना प्रतिनिधींची बैठक