(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आमदारांची चांदी! निधीत एक कोटींची घसघशीत वाढ, पीए आणि ड्रायव्हरचा पगारही वाढवला; अजित पवारांची घोषणा
MLA Fund : आमदारांच्या स्थानिक विकास निधीत आणखी एक कोटींची भरघोस वाढ केली आहे. त्यामुळे आता प्रत्येक आमदाराला त्याच्या मतदारसंघात विकास कामांसाठी प्रत्येक वर्षी पाच कोटींचा निधी उपलब्ध होणार आहे.
MLA Fund : राज्यातील आमदारांच्या निधीत एक कोटीची घसघशीत वाढ करण्यात आला आहे. आमदारांचा स्थानिक विकास निधी चार कोटी रुपयांवरून पाच कोटी रुपये करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी याबाबतची घोषणा आज केली. तर आमदारांचे ड्रायव्हर आणि पीएच्या पगारात पाच हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आमदारांचा स्थानिक विकास निधी चार कोटींवरुन पाच कोटी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आमदारांच्या स्थानिक विकास निधीत आणखी एक कोटींची भरघोस वाढ केली आहे. त्यामुळे आता प्रत्येक आमदाराला त्याच्या मतदारसंघात विकास कामांसाठी प्रत्येक वर्षी पाच कोटींचा निधी उपलब्ध होणार आहे. तर आमदारांच्या ड्रायव्हरचा पगार 15 हजार रुपयावरुन 20 हजार रुपये करण्यात आला आहे. तर आमदारांच्या पीएचा पगार 25 हजारावरुन 30 हजार करण्यांत आला
नव्या निर्णयानुसार आता आमदारांना स्थानिक विकासासाठी पाच कोटी रुपये दिले जातील. या निधीतून आमदारांना आपल्या मतदारसंघातील विकासाची कामं करता येणार आहेत. विधानसभा आणि विधानपरिषदेतील आमदारांना हा निधी मिळणार आहे. विधानसभेतील आमदारांची संख्या 288 तर विधानपरिषदेचे 78 आमदार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आमदारांच्या निधीमध्ये दोन वर्ष वाढ केली नव्हती. त्यानंतर आज दोन वर्षानंतर आमदार निधीमध्ये एक कोटीची वाढ करण्यात आली आहे.
"महाविकास आघाडीमध्ये तीन पक्ष आहेत. यातील राष्ट्रवादीला जास्त निधी दिला जातो आणि शिवसेना काँग्रेसला कमी निधी दिला जातो, असा विरोधकांनी आरोप केला आहे. परंतु, हा निधी कोणत्याही एका वैयक्तीक पक्षाचा नसतो. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी 23 पक्षाचं सरकार चालवलं आहे. यात विविध पक्षाचे मंत्री होते. तसंच आमचंही तीन पक्षाचं सरकार आहे. निधी देत असताना पक्ष पाहिला जात नाही," अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.
संबंधित बातम्या :