बिबट सफारी अर्थमंत्र्यांच्या बारामतीतच, वनविभागाकडून शिक्कामोर्तब; राष्ट्रवादीचे आमदार म्हणतात, सफारी पुन्हा जुन्नरला आणा
अर्थसंकल्पात बिबट सफारीचा समावेश व्हावा यासाठी पुणे वनविभागाने महिन्याभरापूर्वी पत्राद्वारे मागणी केली होती. ही बिबट्या सफारी पुन्हा जुन्नरला आणा, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनकेंनी केली आहे
Pune Leopard safari News : बिबट सफारी कुठं होणार असा प्रश्न पुणे जिल्ह्यात चर्चिला जात होता. पण आता ही बिबट सफारी अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि खासदार सुप्रिया सुळेंच्या (Supriya) मतदारसंघात होणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे. पुण्यातील वनविभागाचे उपवनसंरक्षक अधिकारी राहुल पाटील यांनी तशी माहिती दिली आहे. बारामती तालुक्यातील गाडीखेल येथील 100 हेक्टर जागा निश्चित करण्यात आली आहे. नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात अजित पवारांनी बिबट सफारीसाठी 60 कोटींच्या निधीची तरदूत केलेली आहे.
अर्थसंकल्पात बिबट सफारीचा समावेश व्हावा यासाठी पुणे वनविभागाने महिन्याभरापूर्वी पत्राद्वारे मागणी केली होती. त्याआधीच बारामतीच्या गाडीखेल परिसराचे सर्वेक्षण ही करण्यात आले होते, असं राहील पाटील यांनी सांगितलं. जुन्नर येथील बिबट निवारा केंद्र आहे त्याच जागी सुरू राहणार असल्याचं पाटलांनी स्पष्ट केलं.
बिबट सफारीमुळे येथील परिसराचा कायापालट होणार असून या बिबट सफारीमुळे येथील स्थानिकांना मोठया प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होवून येथील स्थानिकांचे वनविभागाचे या बिबट सफारीमुळे मोठया प्रमाणात जीवनमान उंचावणेस देखील मदत होणार असलेची माहिती देखील राहुल पाटील यांनी दिली आहे.
बारामतीला हलवलेली बिबट्या सफारी पुन्हा जुन्नरला आणा- अतुल बेनके
बारामतीला हलवलेली बिबट्या सफारी पुन्हा जुन्नरला आणा, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनकेंनी केली आहे. पुणे पर्यटन जिल्हा जाहीर झाल्यानंतर जुन्नरला बिबट्या सफारीचा प्रकल्प जाहीर झाला होता. पण कालांतरांनं तो प्रकल्प बारामतीला जात असल्याचं वन खात्याकडून जाहीर करण्यात आलं आहे. यासाठी अजित पवार आणि मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार असल्याचं अतुल बेनकेंनी सांगितलं.
इतर महत्वाच्या बातम्या
The Kashmir Files : 'तुकडे-तुकडे गँग नावाचा कॅन्सर देशाच्या बाहेर फेका'; कंगनाचा व्हिडीओ व्हायरलLIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha