Devendra Fadnavis : शेतकऱ्यांबाबत सरकारला संवेदना नाही, अजितदादांनी दिलेलं आश्वासन का पूर्ण केलं नाही : देवेंद्र फडणवीस
शेतकऱ्यांबाबत ठाकरे सरकारला कोणतीही संवेदना नाही. मागील अधिवेशनात दिलेलं आश्वासन राज्य सरकारने पूर्ण केलं नसल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Devendra Fadnavis : शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट करण्याच्या मुद्यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा लगावला. शेतकऱ्यांबाबत ठाकरे सरकारला कोणतीही संवेदना नाही. मागील अधिवेशनात दिलेलं आश्वासन राज्य सरकारने पूर्ण केलं नसल्याचे फडणवीस म्हणाले. हे सरकार सावकारी आणि सुलतानी पद्धतीनं शेतकऱ्यांची वीज तोडणी करत आहे. याविरोधात आम्ही आवाज उठवत राहू असेही फडणवीस यावेळी म्हणाले.
मागील अधिवेशनात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट घोषणा केली होती की, मे महिन्यापर्यंत कोणत्याही शेतकऱ्याची वीज तोडणी केली जाणार नाही. मग त्यांनी दिलेलं आश्वासन का पूर्ण होत नाही? असा सवाल फडणवीस यांनी केला. का ठाकरे सरकार सुलतानी पद्धतीनं वीज कापते आहे. यावर त्यांनी चर्चा करु असे सांगितले आहे. हे सरकार एवढं कोडगं आहे, सभागृहात सांगितले होते की आजची चर्चा वीज तोडणीच्या संदर्भत असेल मात्र, आज सभागृहात वेगळीच चर्च झाल्याचे फडणवीस यावेळी म्हणाले.
दरम्यान, शेतकऱ्यांच्या संदर्भात कोणताही संवेदना या सरकारला नसल्याचाआरोप यावेळी फडणवीस यांनी केला. आमचा आग्रह होता की तत्काळ वीज तोडण्यचे काम थांबवा, ज्यांची वीज तोडली आहे, त्यांची वीज जोडण्याचे काम करा असे फडणवीस यावेळी म्हणाले. जोपर्यंत वीज जोडणीची मागणी पूर्ण होत नाही आण्ही विषय लावूनच धरणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.
यावेळी प्रविण दरेकरांवर मुंबई बँकेसंदर्भात दाखल झालेल्या गुन्ह्यासंदर्भात देखील फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. दरेकर यांच्यावर जाणीपूर्व गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमच्यावर कितीही गुन्हे दाखल होऊद्या, आम्ही घाबरणार नाही. आम्ही भ्रष्टाचाराबद्दल बोलणे बंद करणार नाही,
आम्ही त्याची पर्वा करणार नसल्याचे फडणवीस यावेळी म्हणाले. आमच्यावर कितीही गुन्हे दाखल होऊ द्या, आम्ही न्यायालयात जाऊ, आम्ही जनतेच्या दरबारात जाऊ असेही फडणवीस यावेळी म्हणाले. हे सरकार लोकशीही पायदळी तुडवम्याचे काम करत आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- jalyukt shivar : जलयुक्त शिवार घोटाळा प्रकरणी चौघांना अटक, दोन निवृत्त अधिकाऱ्यांसह दोन कृषी सहाय्यकांचा समावेश
- Samyukt Kisan Morcha : संयुक्त किसान मोर्चा पुन्हा आक्रमक, 21 मार्चला देशव्यापी आंदोलन करणार