एक्स्प्लोर
Advertisement
राजकारण वेगळ्या ठिकाणी, कुटुंब वेगळ्या ठिकाणी : अजित पवार
मंगळवारी दुपारी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर अजित पवारांच्या मनधरणीचे प्रयत्न यशस्वी झाल्याचं म्हटलं जात होतं. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची काल (26 नोव्हेंबर) रात्री सिल्वर ओकवर भेट घेतल्यानंतर पवार कुटुंबातील दूरावा संपल्याचा स्पष्ट झालं. त्यानंतर आज पवार कुटुंबात सर्व आलबेल असल्याचं अजित पवारांनी सांगितलं.
मुंबई : 23 नोव्हेंबरला उमुख्यमंत्रीपदाची शपथ आणि 26 नोव्हेंबरला उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा... गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या राजकीय नाट्यानंतर अजित पवार यांनी पहिल्यांदाच माध्यमांना प्रतिक्रिया दिली. "राजकारण वेगळ्या ठिकाणी, कुटुंब वेगळ्या ठिकाणी. मी राष्ट्रवादीतच होतो, आहे आणि राहणार," असं अजित पवार म्हणाले. विधानभवनात आज सर्व नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडल्या. शपथविधीला जाण्यापूर्वी अजित पवारांनी पवारसाहेब आमचे नेते असून आपण राष्ट्रवादीतच असल्याचं सांगितलंय
मंगळवारी दुपारी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर अजित पवारांच्या मनधरणीचे प्रयत्न यशस्वी झाल्याचं म्हटलं जात होतं. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची काल (26 नोव्हेंबर) रात्री सिल्वर ओकवर भेट घेतल्यानंतर पवार कुटुंबातील दूरावा संपल्याचा स्पष्ट झालं. त्यानंतर आज पवार कुटुंबात सर्व आलबेल असल्याचं अजित पवारांनी सांगितलं.
राजकारण वेगळ्या ठिकाणी, कुटुंब वेगळ्या ठिकाणी
अजित पवार म्हणाले की, "मला सध्या काहीही बोलायचं नाही. मी योग्य वेळी बोलेन. मी आधीही बोललो होतो की, मी राष्ट्रवादीत होतो, राष्ट्रवादीतच आहे आणि राष्ट्रवादीतच राहणार. सगळ्या सहकाऱ्यांसोबतच आहे. गैरसमज करण्याचं कारण नाही. मध्यंतरीच्या काळात अनेक बातम्या आल्या. त्यात तसूभरही तथ्य नव्हतं. त्याबाबत जास्त बोलायचं नाही. पवारसाहेब आमचे नेते आहेत, त्यामुळे मी भेटणारच ना. तो माझा अधिकार आहे. मी आधीही सांगितलं होतं की पवारसाहेब माझे नेते आहेत आणि मी राष्ट्रवादीमध्येच आहे. नेहमी आम्ही आनंदात असतो, काळजी करण्याचं कारण नाही. राजकारण वेगळ्या ठिकाणी, कुटुंब वेगळ्या ठिकाणी."
शरद पवारांची भेट
23 नोव्हेंबरला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेत अजित पवार यांनी सगळ्या महाराष्ट्राला धक्का दिला होता. कारण भाजपासोबत जात त्यांनी ही शपथ घेतली होती. त्यानंतर अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधला आमदारांचा एक मोठा गट फोडला असल्याची चर्चा चांगलीच रंगली होती. मात्र त्यांच्यासोबत जाणारे सगळे आमदार रविवारी संध्याकाळपर्यंत राष्ट्रवादीमध्ये परतले. अजित पवारांच्य मनधरणीचे प्रयत्नही सुरु होते. अखेर मंगळवारी दुपारी अजित पवार यांनी राजीनामा दिला. त्यांनी राजीनामा दिल्याने भाजपाचं सरकार कोसळलं आणि देवेंद्र फडणवीस यांनाही राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर नऊ तासांनी अजित पवार हे सिल्वर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी गेले. अत्यंत तत्परतेने अजित पवार कारमधून उतरुन घरात गेले. यावेळी त्यांच्या स्वागताला सुप्रिया सुळे उभ्या होत्या.
संबंधित बातम्या
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement