एक्स्प्लोर
78 तासांत सरकार कोसळलं! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा
या सगळ्या घडामोडीनंतर महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जातं होती. राज्यात स्थापन झालेलं सरकार हे अल्प मतांचं सरकार आहे. त्यामुळे या सरकारने नैतिका म्हणून राजीनामा द्यावा देऊन बहुमताच्या सरकारला संधी दिली पाहिजे, अशी मागणी एकनाथ शिंदेनी केली होती.
![78 तासांत सरकार कोसळलं! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा Devendra Fadnavis Likely To Resign As Maharashtra Chief Minister 78 तासांत सरकार कोसळलं! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/11/17132007/devendra-fadnvis.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर आता मुख्यमंत्रीही देवेंद्र फडणवीस यांनी देखील राजीनामा देणार असल्याचे सांगितले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत आमच्याकडे बहुमत नसल्याने राजीनामा देणार असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अजित पवार यांनी काही कारणास्तव राजीनामा दिल्याने आमच्याजवळ बहुमत उरलेलं नाही, त्यामुळं मी राज्यपालांकडे राजीनामा देणार आहे. राज्यात भाजप चांगल्या विरोधी पक्षाचे काम करेल, असेही ते म्हणाले.
फडणवीस म्हणाले की, जनादेशाचा सन्मान करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देऊ असं कधीचं ठरलं नव्हतं. शिवसेनेने आकडे बघून बार्गेनिंग सुरु केलं. जे लोकं मातोश्रीवरुन बाहेर पडत नव्हते, ते अनेकांच्या पायऱ्या झिजवू लागले. महाविकासआघाडीचा कॉमन मिनिमम प्रोग्रॅम हा भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी होता, असेही फडणवीस म्हणाले.
आम्ही भूमिका घेतली होती की घोडेबाजार करणार नाही, फोडाफोडीचे राजकारण करणार नाही. आमच्यावर आरोप करणाऱ्यांनी अख्खा घोड्याचा तबेला उभा केला असेही फडणवीस म्हणाले. शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देणार असं कधीही ठरलं नव्हतं. न ठरलेल्या बाबींचा बाऊ केला, अनेक दिवस त्यांची वाट पाहिली, पण त्यांनी राष्ट्रवादी-काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा केली. महाविकासआघाडीचं तीन चाकं असलेलं सरकार चालणार नाही, असंही ते म्हणाले.
महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला जनादेश दिला, शिवसेनेपेक्षा भाजपला जनादेश मोठा होता, असे म्हणत फडणवीस यांनी पाच वर्ष साथ दिल्याबद्दल शिवसेनेसह सर्व अधिकारी आणि नेत्यांचे आभार मानले.
LIVE UPDATE
- जनादेशाचा सन्मान करण्याचा प्रयत्न आम्ही केला : मुख्यमंत्री फडणवीस
- शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देऊ असं कधीचं ठरलं नव्हतं : देवेंद्र फडणवीस
- शिवसेनेने आकडे बघून बार्गिनिंग सुरु केलं : देवेंद्र फडणवीस
- जे लोकं मातोश्रीवरुन बाहेर पडत नव्हते, ते अनेकांच्या पायऱ्या झिजवू लागले : मुख्यमंत्री फडणवीस
- महाविकासआघाडीचा कॉमन मिनिमम प्रोग्रॅम हा भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी होता : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- अजित पवारांनी माझ्याकडे राजीनामा सुपूर्द केला : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- आमच्याजवळ बहुमत उरलेलं नाही, आम्ही कुणाचे आमदार फोडणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस.
- मी राज्यपालांकडे माझा राजीनामा देणार : मुख्यमंत्री फडणवीस
- भाजप सक्रीय विरोधीपक्षाचं काम करत राहणार - देवेंद्र फडणवीस
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
शेत-शिवार
महाराष्ट्र
भारत
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)