एक्स्प्लोर

Maratha Reservation | गरज पडेल तेव्हा तलवारी काढू : संभाजीराजे

गरज पडेल तेव्हा तलवारी काढू, असा इशारा खासदार संभाजीराजे यांनी दिला आहे. तसंच कायदा हातात घेण्याची वेळ आमच्यावर आणू नका, असंही ते म्हणाले.मराठा आरक्षणासाठी सरकारकडून फार प्रयत्न होताना दिसत नसल्याचं संभाजीराजे यांनी सांगितलं.

उस्मानाबाद : संयम कधी सोडायचा माहित आहे, पण गरज पडेल तेव्हा तलवारी काढू, असा इशारा भाजपचे राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे. आम्ही भीक नाही तर हक्क मागत आहोत. आम्हाला आता गृहित धरु नका आणि कायदा हातात घेण्याची वेळ आमच्यावर आणू नका, असंही संभाजीराजे म्हणाले. तसंच येत्या 15 तारखेला अशोक चव्हाण यांच्या घरासमोर आंदोलन करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.

मराठा आरक्षणासह समाजाच्या विविध मागण्यांसाठी सरकारला जागे करण्यासाठी आजपासून मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या तिसऱ्या पर्वाला तुळजापुरातून सुरुवात झाली. या आंदोलनाला संभाजीराजेंनी हजेरी लावली, त्यावेळी ते बोलत होते.

"1902 मध्ये शाहू महाराजांनी प्रथम आरक्षण दिले त्यात मराठा समाजाचा सुद्धा समावेश होता. शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांची स्वराज्याची संकल्पना पुन्हा एकदा प्रस्थापित होणे गरजेचं आहे. 80 टक्के मराठा समाज गरीब आहे. आम्ही भीक मागत नाही हक्काचे आरक्षण मागतो. आम्हाला आता गृहित धरु नका आणि कायदा हातात घेण्याची वेळ आमच्यावर आणू नका. माझ्या रक्तात शिवाजी आणि शाहू महाराज आहेत. शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार," असं संभाजीराजे म्हणाले.

मराठा आरक्षणासाठी सरकारकडून फार प्रयत्न होताना दिसत नाहीत. सरकारमध्ये समन्वय नाही, असंही ते म्हणाले. तसंच राज्यातली आंदोलने भाजपा पुरस्कृत नाहीत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

"मराठा आणि ओबीसी समाजात जाणीवपूर्वक दुही निर्माण केली जात आहे. परंतु मराठा समाजात 2 गट पाडणाऱ्याचे प्रयत्न हाणून  पाडा, असं आवाहन संभाजीराजेंनी केलं. तसंच मराठा समाजाला ओबीसी समाजाच्या आरक्षणातून आरक्षण नको, असंही संभाजीराजे यांनी स्पष्ट केलं.

सारथी संस्था टिकू नये म्हणून सरकारमधील काहींचे प्रयत्न यावेळी सारथी संस्थेवरुनही त्यांनी सरकारवर निशाणा साधला. सारथी संस्था टिकू नये यासाठी सरकारमधले घटक प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसंच अजित पवार असूनही सारथी संस्था सुरु झाली नाही, असंही म्हणाले.

मराठा आरक्षण : क्रांती मोर्चाचं आजपासून तिसरे पर्व, राज्यभर आंदोलनाचं लोण

'एक राजा तर बिनडोक तर दुसऱ्यांचा आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवरच भर', प्रकाश आंबेडकरांची जहरी टीका

'सातारच्या गादीचा अवमान सहन करणार नाही', उदयनराजेंबाबत प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यानंतर निषेधाचा सूर

प्रकाश आंबेडकरच्या टीकेवर काय म्हणाले? वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मराठी आरक्षणावरुन उदयनराजे आणि संभाजीराजे यांच्यावर जहरी टीका केली. एक राजा बिनडोक आणि दुसऱ्या राजांचं आरक्षण सोडून इतर मुद्द्यांवर अधिक भर आहे असं आंबेडकर म्हणाले. यावर संभाजीराजेंनी अतिशय संयमी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "प्रकाश आंबेडकर हे विचारवंत आहेत. त्यांनी माझा अवमान केला नाही. पण त्यांनी योग्य शब्द वापरले नाहीत.

एमपीएससी परीक्षांना विरोध फक्त कोरोनामुळे : संभाजीराजे राज्यात सध्या एमपीएससी परीक्षांना काही मराठा संघटना तसंच काही परीक्षार्थ्यांकडून विरोध होत आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागल्याशिवाय लोकसेवा आयोगाची परीक्षा घेऊ नये, अशी त्यांची भूमिका आहे. तर दुसरीकडे दलित संघटनांसह इतरांनी परीक्षेसाठी आग्रह धरला आहे. परंतु लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला विरोध केवळ कोरोनामुळे करत असल्याचं संभाजीराजेंनी म्हटलं. कोरोना कमी झाल्यावर परीक्षा घ्यावी, असंही त्यांनी सांगितलं. मात्र आधीच्या नियुक्त्या का दिल्या नाहीत, असा प्रश्नही त्यांनी विचारला.

"राज्य सरकारकडून सकारात्मक निर्णयाची अपेक्षा, तोवर आम्ही वेट अॅंड वॉचच्या भूमिकेत"- संभाजीराजे छत्रपती

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kurla Bus Accident: अपघातानंतर चालक संजय मोरे ढसाढसा रडायला लागला, संतप्त जमावाच्या तावडीतून 'या' व्यक्तीने कसेबसे सोडवले
अपघातानंतर चालक संजय मोरे ढसाढसा रडायला लागला, संतप्त जमावाच्या तावडीतून 'या' व्यक्तीने कसेबसे सोडवले
Maharashtra Winter Temperature drops: नंदुरबारमध्ये तापमानाचा पारा घसरला, सातपुड्यात दवबिंदू गोठले, घरांवर हिमकणांची चादर
नंदुरबारमध्ये तापमानाचा पारा घसरला, सातपुड्यात दवबिंदू गोठले, घरांवर हिमकणांची चादर
नाशिकमध्ये हाडं गोठवणारी थंडी, मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याचा धोका, शाळांच्या वेळेत बदल
नाशिकमध्ये हाडं गोठवणारी थंडी, मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याचा धोका, शाळांच्या वेळेत बदल
Maharashtra Cabinet Expansion: महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वाची अपडेट, एकनाथ शिंदे वेगळाच पॅटर्न वापरणार?
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वाची अपडेट, नाराजी थोपवण्यासाठी शिवसेनेत फिरती मंत्रिपदे?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज :  11 डिसेंबर 2024 : ABP MajhaKurla Best Bus Accident Update : आरोपी चालकाने क्लच समजून बसच्या एक्सिलरेटरवर पाय दिल्याने अपघातRahul Gandhi Viral Video : राहुल गांधी किराना दुकानात वस्तू विकतात तेव्हाABP Majha Headlines :  8 AM :  11 डिसेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kurla Bus Accident: अपघातानंतर चालक संजय मोरे ढसाढसा रडायला लागला, संतप्त जमावाच्या तावडीतून 'या' व्यक्तीने कसेबसे सोडवले
अपघातानंतर चालक संजय मोरे ढसाढसा रडायला लागला, संतप्त जमावाच्या तावडीतून 'या' व्यक्तीने कसेबसे सोडवले
Maharashtra Winter Temperature drops: नंदुरबारमध्ये तापमानाचा पारा घसरला, सातपुड्यात दवबिंदू गोठले, घरांवर हिमकणांची चादर
नंदुरबारमध्ये तापमानाचा पारा घसरला, सातपुड्यात दवबिंदू गोठले, घरांवर हिमकणांची चादर
नाशिकमध्ये हाडं गोठवणारी थंडी, मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याचा धोका, शाळांच्या वेळेत बदल
नाशिकमध्ये हाडं गोठवणारी थंडी, मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याचा धोका, शाळांच्या वेळेत बदल
Maharashtra Cabinet Expansion: महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वाची अपडेट, एकनाथ शिंदे वेगळाच पॅटर्न वापरणार?
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वाची अपडेट, नाराजी थोपवण्यासाठी शिवसेनेत फिरती मंत्रिपदे?
Weather Update: उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची लाट, महाराष्ट्र गारठला, येत्या दोन दिवसात तापमान घसरणार: IMD
उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची लाट, महाराष्ट्र गारठला, येत्या दोन दिवसात तापमान घसरणार: IMD
ममतादीदींचा 'इंडिया'च्या नेतृत्वावर दावा, अनेक पक्षांची साथ; काँग्रेसच्या मौनामुळे काय साधणार?
ममतादीदींचा 'इंडिया'च्या नेतृत्वावर दावा, अनेक पक्षांची साथ; काँग्रेसच्या मौनामुळे काय साधणार?
एबीपी माझा इम्पॅक्ट; अस्तित्वात नसलेल्या औषधांच्या 5 कंपन्या उघडकीस, आता चौकशी होणार
एबीपी माझा इम्पॅक्ट; अस्तित्वात नसलेल्या औषधांच्या 5 कंपन्या उघडकीस, आता चौकशी होणार
Kurla Bus Accident: संजय मोरेचं पाऊल 'वाकडं' पडलं अन् घात झाला, क्लच समजून चुकून 'अ‍ॅक्सिलरेटर'वर पाय; कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणी धक्कादायक माहिती
संजय मोरेचं पाऊल 'वाकडं' पडलं अन् घात झाला, क्लच समजून चुकून 'अ‍ॅक्सिलरेटर'वर पाय; कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणी धक्कादायक माहिती
Embed widget