एक्स्प्लोर

'सातारच्या गादीचा अवमान सहन करणार नाही', उदयनराजेंबाबत प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यानंतर निषेधाचा सूर

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षण आंदोलनावरुन या दोन्ही राजेंवर जहरी टीका केली. प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या टीकेनंतर आता प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्याचा निषेध केला जात आहे.

मुंबई : मराठा आरक्षणावरुन राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. मराठा आरक्षण आंदोलनाच्या नेतृत्वाबद्दल खासदार उदयनराजे आणि खासदार संभाजीराजे यांना समाजाकडून आवाहन केलं जात आहे. यातच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षण आंदोलनावरुन या दोन्ही राजेंवर जहरी टीका केली. 'एक राजा तर बिनडोक आहे. दुसरे संभाजी छत्रपती यांनी भूमिका घेतली आहे पण ते आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवरच भर देत आहेत' अशा शब्दात प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या टीकेनंतर आता प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्याचा निषेध केला जात आहे.

सातारच्या गादीचा अवमान आम्ही सहन करणार नाही - गृहराज्यमंत्री देसाई प्रकाश आंबेडकर यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर केलेल्या टिकेसंदर्भात बोलताना राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी ही टीका निंदनीय असल्याचे आणि अशा प्रकारची टीका कदापि सहन करणार नसल्याचे सांगितले आहे. दोन्हीही छत्रपतींनी आरक्षणासंदर्भात भूमिका स्पष्ट केली आहे. असं असताना प्रकाश आंबेडकरांनी केलेली टीका आम्ही सहन करणार नाही. मराठा समाज शासनाकडे आरक्षणासाठी पाठपुरावा करत आहोत. सातारच्या गादीचा अवमान आम्ही सहन करणार नाही. सातारा जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील जनता ही टीका सहन करणार नाही, असं शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे.

मराठा आरक्षण समितीकडून निषेध

मराठा आरक्षणाच्या मागणीला वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या पाठिंब्याचं स्वागत आहे. पण 'एक राजा बिनडोक' या वक्तव्याचा निषेध करत असल्याचं मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी सांगितलं आहे. आरक्षणासाठी मराठा समाजातील सर्व नेत्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे. आज संध्याकाळी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक असून मराठा आरक्षण, एमपीएससी परीक्षा, पोलीस भरती, नोकर भरती यासह विविध विषयांवर महत्त्वाचे मुद्दे मांडणार असल्याचे सुरेश पाटील यांनी सांगितलं. साताऱ्यात प्रकाश आंबेडकरांविरुद्ध घोषणाबाजी

प्रकाश आंबेडकरांनी उदयनराजे यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यानंतर साताऱ्यातील कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले. साताऱ्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत उदयनराजे जिंदाबाद, प्रकाश आंबेडकर मुर्दाबाद अशी घोषणाबाजी देखील केली.

प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या वक्तव्यानंतर परळीमध्ये सुरू असलेल्या मराठा रोख ठोक मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा निषेध नोंदवला आहे. प्रकाश आंबेडकरांनी छत्रपतींच्या वारासदारांवर टीका करू नये असे आवाहन केलं आहे.

'एक राजा तर बिनडोक तर दुसऱ्यांचा आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवरच भर', प्रकाश आंबेडकरांची जहरी टीका

प्रकाश आंबेडकर म्हणाले, 'एक राजा बिनडोक'

पुण्यात बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, दोन्ही राजांचा आंदोलनाला पाठिंबा आहे, असं मला वाटत नाही. यातील एक राजा तर बिनडोक आहे. दुसरे संभाजी छत्रपती यांनी भूमिका घेतली आहे पण ते आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवरच भर देत आहेत, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. त्यांनी यावेळी मराठा आरक्षणासाठी 10 तारखेला पुकारलेल्या बंदला पाठिंबा दिला आहे.

आंबेडकर म्हणाले की, दोन्ही राजांचा 10 तारखेच्या आंदोलनाला पाठिंबा आहे असं मला वाटत नाही. यातील एक राजा तर बिनडोक आहे. दुसरे संभाजी छत्रपती हे आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवरच भर देतायत. ज्या व्यक्तिला घटना माहीत नाही, जो व्यक्ती असं म्हणतो की आम्हाला आरक्षण मिळालं नाही, तर कोणालाच मिळू नये याला भाजपने राज्यसभेवर कसं पाठवलं याचं आश्चर्य आहे. मी कोणालाही अंगावर घ्यायला घाबरत नाही, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

ते म्हणाले की, मराठा समाजाने महाराष्ट्राला आतापर्यंत खुप चांगले नेतृत्व दिले आहे.  ते नेतृत्त्व सगळ्यांचा विचार करणारे होते.  आता जे नेतृत्व करत असल्याचं दाखवतायत ते खुजे आहेत. स्वतःच आस्तित्व टिकवण्यासाठी जातीचा आधार घेत आहेत, असं आंबेडकर म्हणाले. प्रकाश आंबेडकर  म्हणाले की, मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी फोन करुन 10 तारखेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याची मागणी केली.  त्यानुसार 10 तारखेच्या बंदला आमचा पाठिंबा असेल.  हा पाठिंबा देताना मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण वेगळं आहे हे समजताच तो आम्ही त्यांना सांगितले आहे आणि ओ बी सी आरक्षणाला धक्का लागणार नाही हे आम्ही सांगितलं आहे, असंही ते म्हणाले.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, वातावरण बिघडताना दिसतेय.  वेगवेगळ्या मराठा संघटना आक्रमक होताना दिसतेय. त्यांच्यात कलह होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रील वातावरण बिघडू  नये यासाठी आम्ही 10 तारखेच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. आरक्षण कोणाला द्यायचं याचा अधिकार राज्य सरकारला नाही तर केंद्र सरकारला आहे, असंही आंबेडकर म्हणाले. एमपीएससीच्या परीक्षेला विरोध करणारे मराठा नेते मराठा आरक्षणाच्या पायावर धोंडा पाडून घेतायत. एमपीएससीची परीक्षा घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे आणि त्याची अंमलबजावणी व्हायला हवी. एमपीएससीची परीक्षा हा सर्वच समाजातील विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, असं आंबेडकर म्हणाले.

VIDEO | नेमकं काय म्हणाले प्रकाश आंबेडकर

संबंधित बातम्या

एमपीएससी परीक्षा पुढे ढकला अन्यथा होणाऱ्या नुकसानाला सरकार जबाबदार : खासदार संभाजीराजे

नवी मुंबईतील मराठा समाजाच्या बैठकीला उदयनराजेंची पाठ, साताऱ्यात राज्यव्यापी मेळावा घेणार

MPSC Exam | एमपीएससी परीक्षेवरुन मराठा विद्यार्थी, संघटनांमध्ये मतमतांतर

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe FDA : तुकाराम मुंढेंचा औषध कंपन्यांवर हातोडा! 'या' 10 आयुर्वेदिक कंपन्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द
तुकाराम मुंढेंचा औषध कंपन्यांवर हातोडा! 'या' 10 आयुर्वेदिक कंपन्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget