CM Uddhav Thackeray Live : काहींना बाळासाहेब ठाकरे असल्यासारखं वाटतं, नाव न घेता उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Uddhav Thackeray Speech Live : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईतल्या बीकेसी मैदानावर जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी महाराष्ट्रासह राज्याबाहेरुनही अनेक शिवसैनिक सभास्थळी आले आहेत.
LIVE
Background
मुंबई : मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज जाहीर सभा आहे आणि या सभेत त्यांच्या निशाण्यावर कोण-कोण असतील याची चर्चा सुरु झाली आहे. मशिदीवरील भोंग्यांवरून महिनाभर सुरु असलेला वाद, हिंदुत्वावरून सुरु असलेली लढाई, भाजपकडून होणारे आरोप प्रत्यारोप आणि राणा दाम्पत्यानं दिलेलं आव्हान..... या सगळ्यांचा समाचार उद्धव ठाकरे आजच्या सभेत घेतील असे संकेत शिवसेनेनं आतापर्यंत जारी केलेल्या जाहिरातींमधून मिळाले आहेत. याशिवाय ओवैशींनी औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहिल्यानं निर्माण झालेल्या वादावरही मुख्यमंत्री काय भाष्य करणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
मुंबईतल्या बीकेसी मैदानावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेचं आज सभा होणार आहे. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेऊन शक्तिप्रदर्शन केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ही सभा यशस्वी करण्यासाठी शिवसेनेनं कंबर कसलीय. त्यामुळे या सभेत मोठं शक्तिप्रदर्शन केलं जाणार आहे. दरम्यान या सभेला उपस्थित राहण्यासाठी राज्याच्या विविध भागातून शिवसेना कार्यकर्ते येणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सभेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होत आहे. हनुमान चालीसा, हिंदुत्व, आणि भ्रष्टाचार अशा विविध मुद्द्यांवर बोलण्यासाठी उद्धव ठाकरे सज्ज झाले आहेत. एक ना अनेक मुद्द्यांवरुन गेले काही दिवस राज्याचे राजकारण चांगलंच तापलेलं आहे.
उद्धव ठाकरेंच्या भाषणात कोणकोणते मुद्दे असतील?
- राज ठाकरे
- देवेंद्र फडणवीस
- नवनीत राणा आणि रवी राणा
- केंद्र सरकार
- महागाई
- केंद्रीय यंत्रणा
- आगामी निवडणुका
मुंबईतल्या सभेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात उद्धव ठाकरे जाणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संपूर्ण महाराष्ट्रात सभा घेणार आहेत. महाराष्ट्रात विभागवार सभा आखण्याचं काम सुरु आहे, अशी माहिती मिळाली आहे. कोरोनानंतर प्रथमच मुंबईच्या बाहेर जात उद्धव ठाकरे यांच्या सभा होणार आहेत. ते महाराष्ट्रातल्या सर्व विभागात जाणार आहेत. यात ते शेतकरी, कष्टकरी आणि शिवसैनिकांची भेट घेणार आहेत, अशीही माहिती मिळाली आहे.
संबंधित बातम्या :
CM Uddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या BKCवरील आजच्या सभेची जय्यत तयारी; वाहतूक मार्गात मोठे बदल
Uddhav Thackeray : आमचं हिंदुत्व चूल पेटवणारं आहे : उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray : श्रीलंका परत का पेटली याचा विचार करा. मध्ये कोणी तरी सांगितलं, मोदीजींनी धान्य फुकट दिलं. अरे कच्च खाणार का? ते शिजवायच कसं? गॅसच्या किंमती पहा. आमचं हिंदुत्व हे घर पेटवणार नाही, अख्ख घर पेटलं तरी चुल पेटत नाही, आमचं हिंदुत्व चूल पेटवणारं आहे : उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray : महाराष्ट्र मेल्या आईच दुध प्यायलेला नाही : उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray : महाराष्ट्र मेल्या आईच दुध प्यायलेला नाही. समोरुन वार करा परंतु खोटीनाटी गलिच्छ विकृत राजकारण बंद करा. आता तरी सुधरा : उद्धव ठाकरे
छत्रपतींच्या मातृभाषेस अभिजात भाषेचा दर्जा देऊ शकत नाहीत : उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray on Marathi Bhasha : छत्रपतींच्या मातृभाषेस अभिजात भाषेचा दर्जा देऊ शकत नाहीत, असे करंटे सरकार तिथे बसलं आहे. पुरातत्व खात तेच जे औरंगजेबाची कबर राखतं, तिथे कबर राखतात आणि मंदीरांच्या जीर्णोद्धारास नकार देतात. देवेंद्रजी तिकडे जाऊन विरोध करा, असे अनेक प्रकल्प आहेत जिथे केंद्राने अडवणूक केली आहे. : उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray on Raj Thackeray : काहींना बाळासाहेब ठाकरे असल्यासारखं वाटतं, राज ठाकरेंवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray on Raj Thackeray : मुन्नाभाई चित्रपटात कस त्याला गांधीजी दिसतात तस एकाला बाळासाहेब दिसतात, भगवी शाल घालुन फिरतो. म्हंटल अरे तो मुन्नाभाई तर लोकांच भल तरी करतो. त्यात शेवटी कळत की केमिकल लोचा झाला आहे, हे तसंच आहे.
कोणी मायेचा पुत या महाराष्ट्रात भगव्याला हात घालु शकणार नाही : उद्धव ठाकरे
आम्हीं कधी तुमच्या कुटुंबाची निंदानालस्ती केली का? भ्रष्टाचाराची एक एक प्रकरण आता यांची बाहेर येत आहेत. एकतर्फी प्रेम आहे, आणि या प्रेमातुन महाराष्ट्राला विद्रुप करण्याचे काम सुरू आहे. कोणी मायेचा पुत या महाराष्ट्रात भगव्याला हात घालु शकणार नाही : उद्धव ठाकरे