(Source: ECI/ABP News/ABP Majha)
CM Uddhav Thackeray : मुंबईतील सभेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या संपूर्ण महाराष्ट्रात सभा
CM Uddhav Thackeray Rally: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्रातल्या सर्व विभागात जाणार आहेत. यात ते शेतकरी, कष्टकरी आणि शिवसैनिकांची भेट घेणार आहेत, अशीही माहिती मिळाली आहे.
CM Uddhav Thackeray Rally: मुंबईतल्या सभेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात उद्धव ठाकरे जाणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संपूर्ण महाराष्ट्रात सभा घेणार आहेत. महाराष्ट्रात विभागवार सभा आखण्याचं काम सुरु आहे, अशी माहिती मिळाली आहे. कोरोनानंतर प्रथमच मुंबईच्या बाहेर जात उद्धव ठाकरे यांच्या सभा होणार आहेत. ते महाराष्ट्रातल्या सर्व विभागात जाणार आहेत. यात ते शेतकरी, कष्टकरी आणि शिवसैनिकांची भेट घेणार आहेत, अशीही माहिती मिळाली आहे.
खासदार विनायक राऊत यांच्याशी एबीपी माझानं संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, उद्धव ठाकरे संपूर्ण महाराष्ट्रात दौरा करणार आहेत. आजच्या सभेत गेले काही दिवस काही बोंबलत आहेत त्यांच्या तोंडात बोळा कोंबणार आहेत. आमचा हनुमान चालीसाला विरोध नाही, पण त्या राजकीय नाट्याला विरोध होता. ओवेसी नावाची किड गाढली गेली पाहिजे. याची पहिली मागणी आम्ही केलीय. केद्रानं एमआयएम वर बंदी आणली पाहिजे. आम्ही एमआयएमवर बंदीची मागणी केली आहे, असंही ते म्हणाले.
आजच्या सभेत मुख्यमंत्री ठाकरे कुणाचा समाचार घेणार?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा आज MMRDA मैदान, BKC, वांद्रे पूर्व येथे जाहीर सभा होणार आहे. आजच्या सभेत मुख्यमंत्री ठाकरे कुणाचा समाचार घेणार? याकडे लक्ष लागून आहे. दरम्यान या सभेला उपस्थित राहण्यासाठी राज्याच्या विविध भागातून शिवसेना कार्यकर्ते येणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सभेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होत आहे. भोंगा. हनुमान चालीसा, हिंदुत्व, आणि भ्रष्टाचार अशा विविध मुद्द्यांवर बोलण्यासाठी उद्धव ठाकरे सज्ज झाले आहेत. एक ना अनेक मुद्द्यांवरुन गेले काही दिवस राज्याचे राजकारण चांगलंच तापलेलं आहे. गेल्या दोन महिन्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भोंग्यांचा मुद्दा घेत महाविकास आघाडी आणि खास करुन उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. यावर आज उद्धव ठाकरे काय बोलतील याकडे लक्ष लागून आहे.
इतर महत्वाच्या बातम्या