Maharashtra Breaking 2nd July LIVE Updates: लोकसभेतून नरेंद्र मोदी लाईव्ह, विरोधकांच्या आरोपांना पंतप्रधानांकडून उत्तर
Maharashtra Breaking News: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...

Background
Maharashtra Breaking News: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...
1. मुंबई पदवीधरमधून ठाकरे गटाचे अनिल परब विजयी, भाजपच्या किरण शेलार यांचा 26 हजार 26 मतांनी पराभव.बाळासाहेब ठाकरेंना विजय अर्पण, विजयाचा गुलाल उधळल्यानंतर अनिल परबांची प्रतिक्रिया
2. मुंबई आमच्या बापाचीच, मुंबईत शिवसेनाच, अनिल परबांनी विरोधकांना ठणकावलं, तर पदवीधरची यादी पाठवतो, बघा किती मुस्लिम, परबांचा टोला.
3. मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत विजयी झाल्यानंतर आमदार अनिल परब यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट, ठाकरेंकडून अनिल परब यांचे अभिनंदन.
4. मुंबई पदवीधरमधून ठाकरे गटाचे अनिल परब विजय झाल्यानंतर शिवसेना कार्यकर्त्यांचा जल्लोष, भरपावसाच अनिल परब यांना खांद्यावर घेत कार्यकर्त्यांचा डान्स
5. ठाकरे गटाचे नेते आणि नवनिर्वाचीत आमदार अनिल परब यांनी निवडणुकीत पैशांचा वापर केला, मुंबई भाजप प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांचा आरोप.
6. मुंबई शिक्षक मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार ज.मो.अभ्यंकर यांचा विजय, शिक्षक भारतीचे सुभाष मोरे यांचा 4 हजार 83 मतांना पराभव
7. मुंबई शिक्षक मतदार संघ निवडणुकीमध्ये ठाकरे गटाचे जगन्नाथ अभ्यंकर विजयी, विजयानंतर नवी मुंबई मतदान मोजणी केंद्राबाहेर कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा
8. मुंबई पदवीधर आणि मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत ठाकरे गटाला मोठं यश, शिवसेना भवनासमोर जल्लोष
Mumbai News : 300 युनिट वीज मुंबईकरांना मोफत देण्यात यावी; ठाकरे गटाचं आंदोलन
Mumbai News : गेल्या काही दिवसात वीजेच्या बिलाचा चांगलाच झटका मुंबईकरांना बसला आहे. त्यामुळे वीज दर कमी करावे तसेच 300 युनिट विज मुंबईकरांना मोफत देण्यात यावी या मागणीसाठी आज मुंबईत ठिकठिकाणी शिवसेना उद्भव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आंदोलन झाले. परळ येथे शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर विभाग प्रमुख आशिष चेंबुरकर यांच्या नेतृत्वात आंदोलन पार पडले. या वेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.मुंबईकरांना वीज बिलात दिलासा द्यावा अथवा हे आंदोलन आणखी तीव्र केले जाईल अशी चेतावणी या वेळी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी दिली.
Chandrapur News: चंद्रपूर जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षक संघ या संघटनेच्या वतीनं राज्यभर धरणं आंदोलन
Chandrapur News: चंद्रपूर जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षक संघ या संघटनेच्या वतीने आज राज्यभर धरणे आंदोलन करण्यात येत आहे. चंद्रपुरात देखील जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी यांच्या कार्यालयासमोर शिक्षकांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. राजपत्रित मुख्याध्यापक आणि उपशिक्षणाधिकारी यांची पदोन्नती शिक्षकातून सेवजेष्ठते नुसार करण्यात यावी, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यात यावी, शिक्षकांना कॅशलेस आरोग्य सुविधा आणि जुनी पेन्शन द्यावी यासारख्या 21 मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.
























