काही काळजी नाही, बहिण विधानपरिषदेवर आली, भाऊपण येणार, महादेव जानकरांची नेमकी अपेक्षा काय?
बहिणीला (पंकजा मुंडे) एमएलसी मिळाली आहे, तिचं अभिनंदन, पण भाऊसुद्धा एमएलसी किंवा राज्यसभेवर जाईल काही काळजी नाही असे सूचक वक्तव्य राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते जानकर यांनी केलं आहे.
Mahadev Jankar : लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर भाजपने त्यांना विधानपरिषदेवर पाठवण्याती तयारी केली आहे. त्यांनी विधानपरिषदेसाठी उमेदवारी अर्जही दाखल केला आहे. यावर बोलताना राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर (Mahadev Jankar) म्हणाले की, बहिणीला एमएलसी मिळाली आहे, तिचं अभिनंदन, पण भाऊसुद्धा एमएलसी किंवा राज्यसभेवर जाईल काही काळजी नाही असे सूचक वक्तव्य जानकर यांनी केलं आहे.
जनतेनं माझा पराभव केला, मला पराभव मान्य
आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यालयाचं उद्घाटन झालं आहे. रासपचं हे पाहिलंच मुंबईतील कार्यालय आहे. यावेळी जानकर बोलत होते. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत गेल्या वीस वर्षापासून घरगुती संबंध आहेत. मी त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होतो, त्यामुळं माझा स्वभाव त्यांना माहित आहे. त्यांचाही स्वभाव मला माहिती आहे, त्यामुळे ते घरगुती प्रोग्रामसाठी आल्याचे जानकर म्हणाले. उपमुख्यमंत्री अजितदादा येणार होते पण ते येऊ शकले नाहीत असे जानकर म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडण्यासाठी जागा दिली. सगळ्यांनी प्रेम केलं. त्यांनी माझा छोटा पक्ष असतानाही एक जागा दिली पण जनतेनं माझा पराभव केला, तो पराभव मला मान्य असल्याचे जानकर म्हणाले.
महादेव जानकर नेहमीच दलितांसाठी तसेच ओबीसी, धनगर समाजासाठी उभे असतात : फडणवीस
राष्ट्रीय समाज पार्टीच्या कार्यालयाच्या उद्घाटनाला महादेव जानकर यांनी आमंत्रित केलं होतं. त्याच्या उद्घाटनासाठी मी या ठिकाणी आलो आहे. महादेव जानकर नेहमीच दलितांसाठी तसेच ओबीसी समाज धनगर समाजासाठी उभे असतात असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. महादेव जानकर यांचे समर्पित नेतृत्व असल्यामुळं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी या ठिकाणी आलो असल्याचे फडणवीस म्हणाले.
भारतीय संघाची जी रॅली निघणार आहे. बीसीसीआय ने जी व्यवस्था केली आहे ती योग्य प्रकारे पार पडली पाहिजे असेही फडणवीस म्हणाले. आम्ही देखील त्या ठिकाणी योग्य व्यवस्था करणार आहोत असे फडणवीस म्हणाले. खूप मोठा उत्साह मुंबईतल्या जनतेमध्ये आहे. आपले विश्वविजेते खेळाडू आपल्या मुंबईमध्ये येत आहेत असेह फडणवीस म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
Mahadev Jankar : मेलो तरी चालेल पण कमळावर कधीही लढणार नाही; महादेव जानकर असं का म्हणाले?