रोहित शर्मा ते सूर्यकुमार यादव, टीम इंडियाचे चार खेळाडू थेट विधानभवनात, मुख्यमंत्र्यांची भेट, भव्य सत्कार सोहळा!
Indian Cricket Team Updates: टी-20 विश्वचषक 2024 ची स्पर्धा जिंकून टीम इंडिया आज मायदेशी परतली आहे.
![रोहित शर्मा ते सूर्यकुमार यादव, टीम इंडियाचे चार खेळाडू थेट विधानभवनात, मुख्यमंत्र्यांची भेट, भव्य सत्कार सोहळा! Rohit Sharma Shivam Dubey Suryakumar Yadav Yashasvi Jaiswal will meet Maharashtra CM Eknath Shinde In Vidhan Sabha Mumbai रोहित शर्मा ते सूर्यकुमार यादव, टीम इंडियाचे चार खेळाडू थेट विधानभवनात, मुख्यमंत्र्यांची भेट, भव्य सत्कार सोहळा!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/04/0cf2e2c0a5b6071477b3ff3df4045e461720074970987987_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Indian Cricket Team Updates: टी-20 विश्वचषक 2024 ची (T20 World Cup 2024) स्पर्धा जिंकून टीम इंडिया (Indian Cricket Team) आज मायदेशी परतली आहे. सकाळी 6 वाजता टीम इंडियाचं विशेष विमान दिल्लीत दाखल झालं. 29 जून रोजी झालेल्या विजेतेपदाच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करत भारताने तब्बल 17 वर्षांनंतर टी-20 विश्वचषकाचे जेतेपद पटकावले. या विजयानंतर भारतीय संघ आज (4 जुलै) भारतात परतला आहे. यावेळी टीम इंडियाचे मोठ्या उत्साहात स्वागत होत आहे.
सध्या टीम इंडिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी दिल्लीतील पंतप्रधान निवासस्थानी दाखल झाले आहेत. यावेळी टीम इंडियाचे खेळाडू नरेंद्र मोदींसोबत ब्रेकफास्ट करणार आहेत. यानंतर टीम इंडिया मुंबईसाठी रवाना होणार आहे. दुपारी 2 ते 3च्या सुमारास टीम इंडिया मुंबईत दाखल होईल. मुंबईत टीम इंडियाची विजयी यात्रा काढण्यात येणार आहे. टीम इंडिया वानखेडे स्टेडियमवरही जाईल. याठिकाणी भारतीय संघाच्या स्वागतासाठी जंगी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे.
सध्या मुंबईत महाराष्ट्राचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. यादरम्यान भारतीय संघांचे मुंबईतील खेळाडू रोहित शर्मा, शिवम दुबे, सूर्यकुमार यादव, यशस्वी जैस्वाल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची उद्या (5 जून रोजी) भेट घेणार आहे. यावेळी विधीमंडळाच्या सभागृहात या खेळाडूंचा खास सत्कार करण्यात येणार आहे. यासंदर्भात शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी आज माहिती दिली. यासंबंधीचे निमंत्रण या खेळाडूंना देण्यात आलं आहे . यावेळी सर्व पक्षाचे आमदार उपस्थित रहावे यासाठी विधानसभा अध्यक्षांकडे विनंती करणार असल्याचं प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
आपल्या विश्वविजेत्या खेळाडूंचं भारतात स्वागत आहे. मुंबईतील रॅलीची योग्य व्यवस्था आम्ही करु. मुंबईत त्यांचं स्वागत आहे. मुंबईकर खूप उत्साहित आहेत, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
वानखेडे स्टेडियमवर होणार सन्मान-
भारतीय क्रिकेटमध्ये मुंबईतील वानखेडे स्टेडियमचे विशेष स्थान आहे. याच स्टेडियमवर भारताने 2011 सालचा एकदिवसीय सामन्यांचा विश्वचषक उंचावला होता. आता, याच स्टेडियमवर आज भारताच्या टी-20 विश्वविजेत्या संघाचाही सन्मान होणार आहे.
रोहित शर्मा, सूर्यकुमार यादवचा गणपती डान्स-
टीम इंडिया विमानतळावरून हॉटेलमध्ये पोहोचली आहे. टीम हॉटेलमध्ये पोहोचण्यापूर्वीच अनेक चाहते तिथे उपस्थित होते. हॉटेलच्या गेटवर चाहत्यांनी रोहित शर्मासह सर्व खेळाडूंचा स्वागत केले. यावेळी बस हॉटेल बाहेर पोहताच सूर्यकुमार यादव आणि यशस्वी जैस्वाल यांनी डान्स केला. यावेळी सूर्यकुमार मुंबईकर असल्याने त्याने मुंबई स्टाईल गणपती डान्स केल्याची प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
संबंधित बातम्या:
टीम इंडिया विमानतळापासून हॉटेलमध्ये पोहचेपर्यंत...काय काय घडलं?; पाहा A टू Z माहिती
गळ्यात विजयी मेडल...विराट कोहलीने दिल्ली विमानतळाबाहेर येताच काय केलं?; पाहा Video
हार्दिक पांड्याच्या मागची विघ्नं संपता संपेना; पुन्हा संशायाची पाल चुकचुकली, नेमंक काय घडलं?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)