Mahadev Munde: महादेव मुंडेंना कोणी संपवलं, कारण काय? लवकरच समोर येणार, तपास पथकाच्या साक्षीदार तपासणीला सुरुवात
या प्रकरणातून काय समोर येते हे महत्वाचे ठरणार आहे. या तपासणीसाठी पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक संतोष साबळे परळीत दाखल झाले आहेत.

Beed: एकीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सुरू असताना महादेव मुंडे प्रकरणाच्या तपासालाही वेग आला आहे. 15 महिने उलटून गेल्यानंतरही आरोपी फरार असल्याने मुंडे कुटुंबीयांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर मागच्या आठवड्यात या प्रकरणासाठी 5 सदस्यांच्या एका पथकाची नियुक्ती करण्यात आली होती. आता स्थानिक गुन्हा शाखेकडून महादेव मुंडे खून प्रकरणाच्या साक्षीदार तपासणीच्या कामाला सुरुवात झाली आहे. या तपासणीनंतर खून कोणी केला आणि कशासाठी केला हे समजणार आहे. या तपासासाठी या पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक संतोष साबळे हे परळीमध्ये दाखल झाले आहेत.(Mahadev Munde case)
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास चालू असतानाच 14 महिन्यापूर्वी परळीत महादेव मुंडे यांचा खून झाल्याचे प्रकरण पुढे आले. याही प्रकरणात तपास करण्यासाठी बीडच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांनी (Beed Police) एक पथक स्थापन केले आहे. सुरेश धस (Suresh Dhas) यांच्यापासून अंजली दमानिया आणि अनेक नेत्यांनी महादेव मुंडे (Mahadev Munde) यांच्या खुनाच्या तपासाची मागणी केली आहे. महादेव मुंडे हे पिग्मी वसूल करायचे त्यासोबतच पैशाची भिशी चालवायचे. साधे राहणीमान आणि ज्यांच्याशी व्यवहार येईल तेवढ्याच लोकांशी संबंध ठेवायचे विशेष म्हणजे राजकीय अथवा इतर कोणत्याही व्यक्तीसोबत फारसा संबंध न ठेवणाऱ्या महादेव मुंडे यांचा अतिशय निर्घृणपणे खून करण्यात आला. हा खून नक्की कोणत्या कारणाने झाला, कोणी केला याच्या तपासाला आता सुरुवात झाली असून या तपासासाठी नेमण्यात आलेल्या पथकाच्या कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे या प्रकरणातून काय समोर येते हे महत्वाचे ठरणार आहे. या तपासणीसाठी पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक संतोष साबळे परळीत दाखल झाले आहेत.
तपासाला वेग
महादेव मुंडे यांचा 15 महिन्यांपूर्वी कोण झाला त्यानंतर पहिल्यांदाच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर त्या खुनाच्या तपासासंदर्भात चर्चेला सुरुवात झाली आणि बीडच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हा शाखेकडून तपासाला सुरुवात सुद्धा केली आहे मागच्या आठवड्यापासून या तपासाला सुरुवात झाली असून यात हा तपास सुरुवातीपासून करण्याचा मानस तपास पथकाचा आहे..या खून प्रकरणातील साक्षीदार तपासणीला आता सुरुवात झाली आहे आणि यातूनच हा खून कोणी केला आणि कशासाठी केला हे समजणार आहे या तपासासाठी या पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक संतोष साबळे हे परळीमध्ये दाखल झाले आहेत..
महादेव मुंडेंच्या तपासासाठी पथकाची नेमणूक
महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी पथक स्थापन केले असून या पत्रकात एक पोलीस निरीक्षक आणि चार कॉन्स्टेबल चा समावेश असणार आहे .एलसीबी चे पी आय म्हणून काम केलेले संतोष साबळे यांच्यासह चार कॉन्स्टेबल आता महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपास करणार असल्याचे सांगण्यात आले आहे .महादेव मुंडे यांची पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे आणि मुंडे कुटुंबीयांनी पोलीस अधीक्षकांच्या घेतलेल्या भेटीनंतर या तपासाच्या तपासासाठी पाचसदस्यांचे एक पथक नेमण्यात आले आहे .
हेही वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

