एक्स्प्लोर

BJP Candidates List : भाजपच्या दुसऱ्या यादीत नितीन गडकरींना उमेदवारी; पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार सुद्धा रिंगणात!

पंकजा मुंडे यांचे राजकीय पुनर्वसन करण्यात आलं असून त्यांना बीडमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सुधीर मुनगंटीवार यांना सुद्धा लोकसभेच्या निवडणुकीत उतरवण्यात आलं आहे.

नवी दिल्ली : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित भाजपची लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर झाली आहे. यामध्ये राज्यातील 10 जागांवर भाजपकडून उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा एकदा नागपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे, तर पंकजा मुंडे यांचे राजकीय पुनर्वसन करण्यात आलं असून त्यांना बीडमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दुसरीकडे सुधीर मुनगंटीवार यांना सुद्धा लोकसभेच्या निवडणुकीत उतरवण्यात आलं असून त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव, रावेर, अकोला, वर्धा, नागपूर चंद्रपूर, नांदेड, जालना, दिंडोरी, भिवंडी, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पूर्व, पुणे, अहमदनगर, बीड, लातूर, म्हाडा आणि सांगली या लोकसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. 

सांगलीमधून पुन्हा एकदा संजय काका पाटील यांना संधी देण्यात आली आहे, तर म्हाडामधून रणजीतसिंह निंबाळकर यांना संधी देण्यात आली आहे. नांदेडमधून प्रतापराव पाटील चिखलीकर यांना संधी देण्यात आली आहे. जळगावमधून स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. रावेरमधून एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 

धुळ्यामधून डॉ. सुभाष भामरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नंदुरबारमधून हिना गावित यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दिंडोरीमधून भारती पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ यांना लॉटरी लागली असून त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. नगरमधून सुजय विखे पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, तर बीडमधून पंकजा मुंडे यांना उमेदवारी देत प्रीतम मुंडे यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. लातूरमधून सुधाकर तुकाराम श्रृंगारे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 

भाजपची उमेदवारी  जाहीर  

१) चंद्रपूर- सुधीर मुनगंटीवार 
२) रावेर - रक्षा खडसे 
३) जालना- रावसाहेब दानवे 
४) बीड पंकज मुंडे   
५) पुणे- मुरलीधर मोहोळ 
६) सांगली - संजयकाका पाटील
७) माढा- रणजीत निंबाळकर 
 ८) धुळे - सुभाष भामरे 
९) उत्तर मुंबई- पियुष गोयल 
१०)  उत्तर पूर्व- मिहीर कोटेचा
११) नांदेड- प्रतापराव चिखलीकर 
१२) अहमदनगर- सुजय विखे पाटील
१३) लातूर- सुधाकर श्रृंगारे
१४) जळगाव-  स्मिता वाघ 
१५) दिंडोरी- भारत पवार
१६)  भिवंडी- कपिल पाटील 
१७) वर्धा - रामदास तडस 
१८)  नागपूर- नितीन गडकरी 
१९) अकोला- अनुप धोत्रे 
२०) नंदुरबार- डॉ. हिना गावित

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Agarwal Family Member Fight : अग्रवाल कुटुंबातील एकाची पत्रकारांना धक्काबूक्की, पाहा काय घडलं...ABP Majha Headlines : 11 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSina River Solapur : हे क्रिकेटचे मैदान नाही, महाराष्ट्रातील कोरडी नदी आहे Maharashtra ABP MajhaDombivli Blast 10 Videos : डोंबिवली बॉलयर ब्लास्टची भीषणता  दाखवणारी 10 भयानक दृश्य!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Astrological Tips : अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Cyber Crime : हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
Embed widget