BJP candidate list : भाजपची दुसरी यादी जाहीर, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, मुरलीधर मोहोळ यांच्यासह 20 जणांची नावं
BJP candidate list Maharashtra 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने दुसरी यादी जारी केली आहे. दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील मोठ्या नावांचा समावेश आहे.
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने दुसरी यादी (BJP candidate list) जारी केली आहे. दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील मोठ्या नावांचा समावेश आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, बीडमधून पंकजा मुंडे, रावेरमधून रक्षा खडसे, नंदुरबारमधून हिना गावित, धुळे सुभाष भामरे, चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार यांची नावं आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या यादीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. आजच्या यादीमध्ये महाराष्ट्रातील एकूण 20 उमेदवारांचा समावेश आहे. नितीन गडकरी यांना नागपूर, नगरमधून सुजय-विखे पाटील, माढामधून रणजीत निंबाळकर, बीडमधून पंकजा मुंडे, रावेरमधून रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
कुणाकुणाची तिकीटं कापली?
भाजपने महाराष्ट्रातील दिग्गजांची नावं जाहीर केली असली तरी अनेक दिग्गजांनी नावं कापली आहेत. यामध्ये प्रामुख्याने भाजपचे उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी (Gopal Shetty) यांचं नाव आहे. गोपाळ शेट्टी यांचं तिकीट कापल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते नाराज आहेत. त्यांच्या जागी केंद्रीय मंत्री आणि राज्यसभा सदस्य पियुष गोयल (Piyush Goyal) यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
याशिवाय बीडमधून पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना तिकीट दिल्याने, त्यांची बहीण प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापलं गेलं आहे. दुसरीकडे उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात आमदार मिहीर कोटेचा यांना तिकीट देऊन, भाजपने मनोज कोटक (Manoj Kotak) यांना धक्का दिला.
जळगावचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचं तिकीट देऊन भाजपने स्मिता वाघ (Smita Wagh) यांना तिकीट दिलं. तिकडे अकोल्यात खासदार संजय धोत्रे यांच्याऐवजी मुलगा अनुप धोत्रे यांना तिकीट दिलं.
खासदारांचे तिकीट कापले जाण्यामागची कारणे काय?
- संसदीय कामकाजातील निष्क्रियता
- मतदारसंघात केंद्र सरकारच्या योजना घेऊन जाण्यात अपयश
- पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये निष्क्रियता
- पक्षाने आखून दिलेले कार्यक्रम न राबवणे
- पक्षसंघटनेत शून्य सहभाग
भाजपची यादी जाहीर, महाराष्ट्रातून लोकसभेसाठी हे 20 उमेदवारी रिंगणात (BJP candidate list for Maharashtra)
१) चंद्रपूर- सुधीर मुनगंटीवार
२) रावेर - रक्षा खडसे
३) जालना- रावसाहेब दानवे
४) बीड पंकजा मुंडे
५) पुणे- मुरलीधर मोहोळ
६) सांगली - संजयकाका पाटील
७) माढा- रणजीत निंबाळकर
८) धुळे - सुभाष भामरे
९) उत्तर मुंबई- पियुष गोयल
१०) उत्तर पूर्व- मिहीर कोटेचा
११) नांदेड- प्रतापराव चिखलीकर
१२) अहमदनगर- सुजय विखे पाटील
१३) लातूर- सुधाकर श्रृंगारे
१४) जळगाव- स्मिता वाघ
१५) दिंडोरी- भारती पवार
१६) भिवंडी- कपिल पाटील
१७) वर्धा - रामदास तडस
१८) नागपूर- नितीन गडकरी
१९) अकोला- अनुप धोत्रे
२०) नंदुरबार- डॉ. हिना गावित
विदर्भातील 10 पैकी 4 जागांवर भाजपचे उमेदवार जाहीर, 6 जागांवर अजूनही प्रतीक्षा कायम
- नागपूर- नितीन गडकरी (तिसऱ्या वेळी उमेदवारी)
- चंद्रपूर - सुधीर मुनगंटीवार (पहिल्यांदा उमेदवारी)
- अकोला - अनुप धोत्रे (पहिल्यांदा उमेदवारी, विद्यमान खासदार संजय धोत्रे यांचा मुलगा)
- वर्धा - रामदास तडस ( तिसऱ्या वेळी उमेदवारी)
गोपाळ शेट्टी यांची प्रतिक्रिया
तिकीट कापल्यामुळे माझे कार्यकर्ते आंदोलन करत आहेत तो त्यांचा अधिकार आहे. अजून २-३ दिवस आंदोलन करतील. आम्ही अशी आंदोलनं पहिली आहेत. या कार्यकर्त्यांसोबत शानदार पद्धतीने काम केलं आहे निवडणूक जिंकलो आहे. त्यामुळे त्यांना अशा प्रकारचा धक्का लागणं स्वाभाविक आहे.
आम्ही जे काम केली ती काम डोक्यात ठेवून काम करणार, अशी प्रतिक्रिया तिकीट कापलेले भाजपचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांनी दिली.
मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया (Murlidhar Mohol reaction)
पुणे लोकसभेसाठी महायुतीचा उमेदवार कोण असणार अशी चर्चा सुरू होती. मला खात्री आहे पुणे लोकसभामधून मोठ्या मताधिक्याने निवडून येईल.
मी भाजपचा कार्यकर्ता म्हणून पक्ष नेतृत्वाला धन्यवाद देईन की लोकसभा उमेदवार म्हणून मला संधी दिली. देशाचे प्रधानमंत्री, अमित शाहजी, जे पी नड्डाजी, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभारी आहे.
व्यक्ती म्हणून माझं नाव आलं असलं तरी पक्ष सर्व सामान्य कार्यकर्त्याला नेता करतो. १९९२-९३ साली अध्यक्ष होतो. लोक प्रतिनिधी म्हणून काम केलं.
महापौर म्हणून काम केलं, राजकीय पार्श्वभूमी नसलेला कार्यकर्ता लोकसभा उमेदवार होतो हे फक्त भाजपमध्येच होऊ शकते, असं मुरलीधर मोहोळ म्हणाले.
सांस्कृतिक जडणघडण, शहराचे भविष्य डोळ्यासमोर ठेवून काम करणार. मोदींनी केलेलं काम, स्वप्नात असलेली मेट्रो सुरू झाली, चांदणी चौक प्रकल्प अनेक गोष्टी भाजपकडून मिळाल्या. पुन्हा एकदा खासदार हा पुण्याचा महायुतीचा, त्याला मत देईन, मोदीजी यांना पुन्हा प्रधानमंत्री करणार.
BJP releases its second list of candidates for the upcoming Lok Sabha elections pic.twitter.com/bpTvxfMkDr
— ANI (@ANI) March 13, 2024