एक्स्प्लोर

Supreme Court: ...अन्यथा लाडकी बहीण योजना थांबवू, सुप्रीम कोर्टाचा शिंदे सरकारला गर्भीत इशारा

भूमी अधग्रहणाच्या प्रलंबित मोबदल्यावरून सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा झापले. पुण्यातील 1995 सालच्या एक कंपनीच्या भूसंपादन खटल्यावरून सर्वोच्च न्यायालयात पुन्हा लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करण्यात आला आहे.

मुंबई : राज्यातील मु्ख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरुन (Ladki bahin yojana) सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय खडाजंगी पाहायला मिळत आहे. दुसरीकडे 17 ऑगस्ट रोजी आपल्या बँक खात्यात 3000 रुपये येणार असल्याने लाडक्या बहिणी देखील भावाच्या ओवाळणीची अपेक्षा ठेऊन आहेत. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला थेट लाडकी बहीण योजना थांबवण्याचा इशारा दिला आहे. पुण्यातील (Pune) एका कंपनीच्या भूसंपादन केसप्रकरणी सर्वोच्च न्यायलायाने सरकारला गर्भीत इशारा दिला आहे. सरकारने ज्यांच्याकडून जमीन घेतली होती, त्यांना अद्यापही या जमिनीचा मोबदला मिळाला नाही, त्यामुळे यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात (Supreme court) याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीही महाराष्ट्र सरकारला झापलं होतं. तुमच्याकडे लाडकी बहीण योजनेसाठी पैसे आहेत, पण याचिकाकर्त्यांना मोबदला देण्यासाठी पैसे नाहीत का, असा सवालही विचारला होता. त्यानंतर, आता पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला गर्भीत इशारा दिला आहे. 

भूमी अधग्रहणाच्या प्रलंबित मोबदल्यावरून सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा झापले. पुण्यातील 1995 सालच्या एक कंपनीच्या भूसंपादन खटल्यावरून सर्वोच्च न्यायालयात पुन्हा लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करण्यात आला आहे. याचिककर्त्यांच्या पूर्वजांनी 1950 साली पुण्यात 24 एकर जमीन खरेदी केली होती, राज्य सरकारने ही जमीन घेतली. परंतु, अद्यापही याचिककर्त्यांना मोबदला दिला गेला नाही. राज्य सरकारने संबंधित जमीन डिफेन्स शिक्षा संकुलाला दिली आहे. याप्रकरणी, याचिकाकर्त्याने न्यायालयात धाव घेतली असून न्यायालयाने मोबदला देण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत. त्यावेळी राज्य सरकारने संबंधित व्यक्तीला मोबदला म्हणून जमीन दिल्याची माहिती न्यायालयात दिली. मात्र, प्रत्यक्षात संबंधित व्यक्तीला मिळालेली जमीन वनजमीन होती. त्यामुळे, याचिकाकर्ते पुन्हा सर्वोच्च न्यायालयात आले. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला गेल्या सुनावणीतही झापले होते,  आज पुन्हा लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करत न्यायालयाने सरकारला गर्भीत इशाराच दिला. 

उद्या होणार सुनावणी

सर्वोच्च न्यायालयात जमीन मोबदलाप्रकरणी टी.एन. गोदावर्मन यांनी दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी न्या.बी आर गवई आणि के विश्वनाथन यांच्या न्यायपीठासमोर सुरू आहे. त्यावरील आजच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने असं म्हटलंय की, आम्ही तुमची लाडकी बहीण, लाडके भाऊ यासह आम्ही सर्व योजना थांबवू. याप्रकरणात तुम्ही मुख्य सचिवांशी बोलून कंपनीच्या प्रमुखांशी बोलायला सांगा, याचिकाकर्त्यांना मोबदला देण्याचा एक आकडा ठरवा आणि तो आकडा घेऊनच कोर्टात बोला, असे न्यायालयाने सुनावलं आहे. त्यावर, राज्य सरकारच्या कॅबिनेट बैठकीमध्ये मुख्य सचिव व्यस्त असल्याने आज सरकारची बाजू न्यायालयात मांडण्यात आली नाही. त्यामुळे, सर्वोच्च न्यायालयाने उद्याची मुदत दिली असून उद्या म्हणजे 14 ऑगस्ट रोजी याप्रकरणी सुनावणी घेऊ, असे म्हटले आहे. 

दरम्यान, गेल्या सुनावणीत “न्यायालयाच्या आदेशांना गृहित धरुन वागू नका. आम्ही वर्तमानपत्र वाचतो, तुमच्याकडे फ्रीबीजसाठी, लाडकी बहीण साठी पैसे आहेत. पण, एका सर्वसामान्य माणसाच्या जमिनीचा मोबदला द्यायला पैसे नाहीत का?” अशा शब्दात न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला झापलं होतं.

हेही वाचा

मोठी बातमी! नगराध्यक्षांचा कालावधी अडीचऐवजी 5 वर्षे; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मावळत्या सूर्यकिरणांची तिरीप बुद्धांच्या चेहऱ्यावर रेंगाळताना.. वेरूळ लेणीत किरणोत्सवाची पर्वणी, Photos
मावळत्या सूर्यकिरणांची तिरीप बुद्धांच्या चेहऱ्यावर रेंगाळताना.. वेरूळ लेणीत किरणोत्सवाची पर्वणी, Photos
मोठी बातमी! नोटबंदीवेळी जप्त केलेल्या जुन्या 500 अन् 1000 च्या नोटा जमा करुन घ्या, हायकोर्टाचे RBI ला निर्देश
मोठी बातमी! नोटबंदीवेळी जप्त केलेल्या जुन्या 500 अन् 1000 च्या नोटा जमा करुन घ्या, हायकोर्टाचे RBI ला निर्देश
तुझं नाटक मीच बघेन, बर का?; आ. संदीप क्षीरसागरांचा तहसीलदारांना दम; खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
तुझं नाटक मीच बघेन, बर का?; आ. संदीप क्षीरसागरांचा तहसीलदारांना दम; खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 मार्च 2025 | सोमवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sandeep Kshirsagar Viral Audio Clip | संदीप क्षीरसागरांची बीडच्या नायब तहसीलदारांना धमकी? प्रकरण काय?Job Majha : पुणे महानगरपालिका - NUHM अंतर्गत विविध पदांसाठी भरती : 10 March 2025Budget 2025 | Mahayuti PC | एकनाथ शिंदेंकडून पुन्हा खुर्ची चर्चेत, शिंदेंच्या मनातून जाईना- अजित पवारBudget Superfast | अर्थ बजेटचा | अजित पवारांनी सादर केलेल्या बजेटमधून  सर्वसामान्य जनतेसाठी नेमकं काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळत्या सूर्यकिरणांची तिरीप बुद्धांच्या चेहऱ्यावर रेंगाळताना.. वेरूळ लेणीत किरणोत्सवाची पर्वणी, Photos
मावळत्या सूर्यकिरणांची तिरीप बुद्धांच्या चेहऱ्यावर रेंगाळताना.. वेरूळ लेणीत किरणोत्सवाची पर्वणी, Photos
मोठी बातमी! नोटबंदीवेळी जप्त केलेल्या जुन्या 500 अन् 1000 च्या नोटा जमा करुन घ्या, हायकोर्टाचे RBI ला निर्देश
मोठी बातमी! नोटबंदीवेळी जप्त केलेल्या जुन्या 500 अन् 1000 च्या नोटा जमा करुन घ्या, हायकोर्टाचे RBI ला निर्देश
तुझं नाटक मीच बघेन, बर का?; आ. संदीप क्षीरसागरांचा तहसीलदारांना दम; खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
तुझं नाटक मीच बघेन, बर का?; आ. संदीप क्षीरसागरांचा तहसीलदारांना दम; खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 मार्च 2025 | सोमवार
धक्कादायक! रायगड जिल्ह्यात 2 खुनाच्या घटना; काळ्या बॅगेत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ
धक्कादायक! रायगड जिल्ह्यात 2 खुनाच्या घटना; काळ्या बॅगेत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ
Harshvardhan Sapkal on Ravindra Dhangekar : धंगेकर कोण होतास तू, काय झालास तू...; काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर प्रदेशाध्यक्षांची बोचरी टीका
धंगेकर कोण होतास तू, काय झालास तू...; काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर प्रदेशाध्यक्षांची बोचरी टीका
Satish Bhosale Khokya Bhai : खोक्या भाईनंतर त्याच्या साडूचा प्रताप समोर, एक कोटीची मागितली खंडणी, अहिल्यानगरमध्ये गुन्हा दाखल
खोक्या भाईनंतर त्याच्या साडूचा प्रताप समोर, एक कोटीची मागितली खंडणी, अहिल्यानगरमध्ये गुन्हा दाखल
Maharashtra Budget 2025 : अजित पवार अन् उद्धव ठाकरे भेट; दादा हा अर्थसंकल्प तुमचा नाही, उद्धव ठाकरेंचा अजितदादांना टोला
अजित पवार अन् उद्धव ठाकरे भेट; दादा हा अर्थसंकल्प तुमचा नाही, उद्धव ठाकरेंचा अजितदादांना टोला
Embed widget