एक्स्प्लोर

मोठी बातमी! नगराध्यक्षांचा कालावधी अडीचऐवजी 5 वर्षे; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

राज्यातील नगरपंचायत व नगरपालिकांमधील नगराध्यक्षांचा कालावधी आता 2.5 ऐवजी 5 वर्षे करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

मुंबई : विधानसभा निवडणुकांच्या घोषणेपूर्वी कॅबिनेट बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जात असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत 8 मोठे निर्णय घेण्यात आले असून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा (ladki bain yojana) आढावादेखील घेण्यात आला आहे. तसेच, राज्यातील नगरपंचायत व नगरपालिकांमधील नगराध्यक्षांचा कालावधी आता 2.5 ऐवजी 5 वर्षे करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे, पुढील काही दिवसांता नगराध्यक्षपदासाठी (pressident) सोडत निघणार होती, त्यासाठी अनेक इच्छुक उमेदवार नगराध्यक्षदाची (Nagarpalika) स्वप्ने रंगवत होती, त्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरलं गेलं आहे. 

महाराष्ट्रात 228 नगरपरिषदा व नगरपंचायती आहेत. त्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांच्या पाच वर्षांच्या कालावधीपैकी अडीच-अडीच वर्षांचे असे दोन अध्यक्ष निवडण्याचे निश्चित करून पहिल्या टप्प्याच्या नगराध्यक्षपदासाठी घेण्यात आलेल्या आरक्षणाच्या सोडतीचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. त्यामुळे, आता दुसऱ्या टर्ममधील नगराध्यक्षांची निवड काही दिवसांवर येऊन ठेपली असता नगराध्यक्षांचा कालावधी अडीच वर्षावरुन 5 वर्षांवर करण्यात आला आहे. त्यामुळे, नगराध्यक्षपदाची स्वप्ने पाहणाऱ्या नगरसेवकांची घोर निराशा झाली आहे. 

राज्यात एकीकडे 2 वर्षांपासून बहुतांश नगरपालिका, नगरपंचायत आणि महापालिकांमध्ये प्रशासन राज आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच न झाल्यामुळे येथील नगराध्यक्षदाची खुर्ची रिकामी असून तो पदभारही प्रशासनाकडे आहे. त्यातच आता राज्यातील उर्वरीत नगर पंचायतींमधील नगराध्यक्षांचा कालावधी अडीच ऐवजी 5 वर्षांचा करण्यात आला आहे. राज्यात अंदाजे 105 नगर पंचायतच्या निवडणुका अडीच वर्षापूर्वी पार पडल्याने अडीच वर्षासाठी नगराध्यक्ष पदावर विराजमान झाले. मात्र, या नगराध्यक्षांचा कालावधी ऑगस्ट महिन्यात संपुष्टात येणार आहे. त्यामुळे नगराध्यक्ष पदाचे आरक्षण सोडत आतापर्यंत निघणे आवश्यक होते. आता, सरकारने अडीच वर्षांचा कालावधी आता थेट 5 वर्षांचा करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी दिली आहे. त्यामुळे, अडीच वर्षानी नगराध्यक्षपदाचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांची मोठी निराशा झाली आहे.

महाविकास आघाडीने घेतला होता निर्णय

दरम्यान, राज्यातील नगरपालिकांच्या नगराध्यक्षांची निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय गत महायुती सरकारने घेतला होता. त्यानंतर, महाविकास आघाडी सरकारने हा निर्णय बदलून नगराध्यक्षांची निवड सभागृहातील नगरसेवकांकडून करण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या, तो निर्णय लागू असून अडीच वर्षांसाठी नगराध्यक्षपदाची निवड होती, ती आता 5 वर्षे करण्यात आली आहे. राज्यातील जवळपास 105 नगरपालिकांमध्ये पुढील काही दिवसांत नगराध्यक्ष बदलले जाणार होते. 

हेही वाचा  

राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपली; शिंदे सरकारचे 8 मोठे निर्णय, दूध उत्पादकांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Amol Mitkari: अजितदादा असताना तटकरेंना कंटाळून राजीनामास्त्र उपसलेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा गेम झाला; आता अमोल मिटकरींचा गौप्यस्फोट, म्हणाले, 'अजितदादांना घाईगडबड...'
अजितदादा असताना तटकरेंना कंटाळून राजीनामास्त्र उपसलेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा गेम झाला; आता अमोल मिटकरींचा गौप्यस्फोट, म्हणाले, 'अजितदादांना घाईगडबड...'
Maharashtra Breaking LIVE Updates: स्वातंत्र्यवीर सावरकरांना मरणोत्तर 'भारतरत्न' पुरस्कार द्या, सुधीर मुनगंटीवारांची मागणी
Maharashtra Breaking LIVE Updates: स्वातंत्र्यवीर सावरकरांना मरणोत्तर 'भारतरत्न' पुरस्कार द्या, सुधीर मुनगंटीवारांची मागणी
Iran vs Israel War: इराणकडे आणखी किती क्षेपणास्त्रांचा साठा, रशियाने महिनाभरापूर्वीच मोठी रसद पाठवली, युद्धाबाबत संरक्षण तज्ञ अभय पटवर्धनांचं महत्त्वाचं भाकीत
इराणकडे आणखी किती क्षेपणास्त्रांचा साठा, रशियाने महिनाभरापूर्वीच मोठी रसद पाठवली, युद्धाबाबत संरक्षण तज्ञ अभय पटवर्धनांचं महत्त्वाचं भाकीत
Iran Vs Israel War: इराण- अमेरिका युद्धामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर संकट, सांगलीची हजारो टन हळद मुंबईतील बंदरात पडून, भावही कोसळला
इराण- अमेरिका युद्धामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर संकट, सांगलीची हजारो टन हळद मुंबईतील बंदरात पडून, भावही कोसळला

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai PC : गणित जमत नसल्यानं प्रियंका चतुर्वेदी राज्यसभेपासून दूर - संजय राऊत
Special Report Iran vs America : ब्रिटनच्या वेगळ्या भूमिकेवरुनही ट्रम्प यांचा संताप
Special Report Raj Thackeray - Uddhav Thackeray : मनसे-ठाकरेसेनेतील नाराजीवर तोडगा निघाला?
Special Report Rajya Sabha : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची घोषणा
Jalgaon Banana : केळीचे दर 2.500 रुपयांवरुन 1500 रुपयांवर, युद्धाचा उत्पादकांना फटका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बिहारमधील नितीशपर्व संपल्यात जमा! राज्यसभेला आज अर्ज दाखल करण्याची शक्यता, अमित शाह आजच पाटण्यात येणार; कार्यकर्त्याचा सीएम निवासस्थानासमोर आक्रोश, 'म्हणाले, ही गद्दारी, हा निर्णय त्यांचा नाही...'
बिहारमधील नितीशपर्व संपल्यात जमा! राज्यसभेला आज अर्ज दाखल करण्याची शक्यता, अमित शाह आजच पाटण्यात येणार; कार्यकर्त्याचा सीएम निवासस्थानासमोर आक्रोश, 'म्हणाले, ही गद्दारी, हा निर्णय त्यांचा नाही...'
Sharad Ponkshe On Kerala Story 2: 'प्रत्येक हिंदू माणसानं...', 'द केरला स्टोरी 2' सिनेमाबाबत शरद पोंक्षेंनी स्पष्टच सांगितलं, हिंदी सिनेस्टार्सनाही सुनावलं
'प्रत्येक हिंदू माणसानं...', 'द केरला स्टोरी 2' सिनेमाबाबत शरद पोंक्षेंनी स्पष्टच सांगितलं, हिंदी सिनेस्टार्सनाही सुनावलं
Pune Crime News: पुण्यात लेकीची छेड काढणाऱ्या विद्यार्थ्याला बापाने लोळवून लोळवून मारलं, हुल्लडबाजाला बेदम चोप
पुण्यात लेकीची छेड काढणाऱ्या विद्यार्थ्याला बापाने लोळवून लोळवून मारलं, हुल्लडबाजाला बेदम चोप
Putin on Gas to European Markets: इराणने 33 किमीची होर्मुझ सामुद्रधुनी बंद करत जगाची बत्तीशी बसवल्यानं पेट्रोल अन् गॅसचं काय होणार? याची चर्चा असतानाच आता पुतीन यांनी धडकी भरवली!
इराणने 33 किमीची होर्मुझ सामुद्रधुनी बंद करत जगाची बत्तीशी बसवल्यानं पेट्रोल अन् गॅसचं काय होणार? याची चर्चा असतानाच आता पुतीन यांनी धडकी भरवली!
Donald Trump War with Iran: ट्रम्पचे लष्करी अधिकार मर्यादित करण्यासाठी आणलेला ठराव अमेरिकन सिनेटमध्ये नामंजूर; महत्वाच्या टप्प्यावर लगाम घालण्यात अपयश; युद्ध किती काळ चालणार अन् आता पुढे काय घडणार?
ट्रम्पचे लष्करी अधिकार मर्यादित करण्यासाठी आणलेला ठराव अमेरिकन सिनेटमध्ये नामंजूर; महत्वाच्या टप्प्यावर लगाम घालण्यात अपयश; युद्ध किती काळ चालणार अन् आता पुढे काय घडणार?
Shawarma Girl meets Raj Thackeray: डोंबिवलीची शोरमा गर्ल स्पेशल गिफ्ट घेऊन शिवतीर्थवर आली, राज ठाकरे म्हणाले....
डोंबिवलीची शोरमा गर्ल स्पेशल गिफ्ट घेऊन शिवतीर्थवर आली, राज ठाकरे म्हणाले....
Bollywood Actress on Khamenei Death: इराणचे सुप्रीम लीडर खामेनींच्या मृत्यूनंतर आनंदी झालेली बॉलिवूड अभिनेत्री; पण आता म्हणतेय, 'ते माझा जीव घेतील...'
इराणचे सुप्रीम लीडर खामेनींच्या मृत्यूनंतर आनंदी झालेली बॉलिवूड अभिनेत्री; पण आता म्हणतेय, 'ते माझा जीव घेतील...'
युद्ध गुन्हेगारी सुरुच? 7 ते 12 वयातील 165 निष्पाप चिमुरड्या मुली मारल्यानंतर आता भारतात लष्करी सरावातून परतणाऱ्या इराणी युद्धनौकेवर श्रीलंकेजवळ अमेरिकेचा हल्ला; 87 मृत्यूमुखी, 32 जणांचा जीव वाचला
युद्ध गुन्हेगारी सुरुच? 7 ते 12 वयातील 165 निष्पाप चिमुरड्या मुली मारल्यानंतर आता भारतात लष्करी सरावातून परतणाऱ्या इराणी युद्धनौकेवर श्रीलंकेजवळ अमेरिकेचा हल्ला; 87 मृत्यूमुखी, 32 जणांचा जीव वाचला
Embed widget