(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अहमदनगरमध्ये भरवस्तीत बिबट्याचा धुमाकूळ, चार जणांवर हल्ला
बिबट्याच्या हल्ल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चिंतेची बाब म्हणजे या परिसरात दोन बिबट्यांचा वावर असल्याची माहिती मिळत आहे.
Ahmednagar : अहमदनगर : बिबट्याने ( labrador) भरवस्तीत शिरून नागरिक आणि जणावरांवर हल्ला ( attack) केल्याच्या अनेक घटना राज्यात समोर येत आहेत. नागरिकांची झोप उडविणाऱ्या या हल्ल्यामुळे वनविभागहीत चिंतीत आहे. यातच आता अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर (shrirampur) येथील मोरगे वस्तीमध्ये बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. या बिबट्याने रहिवाशांवर (people) बिबट्यानं अचानक हल्ला केला. हल्ल्यात चार स्थानिक नागरिक जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भर वस्तीत बिबट्या घुसल्याने नागरिकांची एकच धावपळ सुरु झाली. बघ्यांची गर्दी झाल्यानंतर बिबट्याने घटनास्थळावरून पळ काढला.
बिबट्याच्या हल्ल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चिंतेची बाब म्हणजे या परिसरात दोन बिबट्यांचा वावर असल्याची माहिती मिळत आहे. स्थानिकांवर हल्ला करणारा बिबट्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. दिवसा-ढवळ्या बिबट्यानं दर्शन दिल्यानं मोगरे वस्तीतल्या रहिवाशांची एकच धावपळ झाली. लोक घरातून बाहेर पडायला घाबरत आहेत. वनविभागाने तत्काळ या हल्लेखोर बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
दरम्यान, बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना स्थानिकांनी तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले. आता हल्लेखोर बिबट्याला जेरबंद करण्याचे आवाहन प्रशासनासमोर उभे ठाकले आहे. भरवस्तीत बिबट्या शिरल्याची माहिती मिळताच पोलीस (police) घटनास्थळी दाखल झाले असून वनविभागाने ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने बिबट्याचा शोध सुरु केला आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
इतर महत्वाच्या बातम्या