अभिनेत्री कपूरने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम पेजवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती फ्लोरल साडीत आणि खूपच सुंदर दिसत आहे. ( फोटो सौजन्य : इंस्टाग्राम )
2/9
जान्हवी कपूरने फार कमी वेळात बॉलिवूडमध्ये स्वतःची एक खास आणि वेगळी ओळख निर्माण केली आहे.
3/9
जान्हवीने तिच्या उत्कृष्ट अभिनयाने सर्वांची मने जिंकली आहेत, याशिवाय तिच्या मनमोहक अभिनयाचेही लोक वेडे आहेत.
4/9
जान्हवी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना नेहमीच अपडेट देत राहते.
5/9
आता जान्हवी पुन्हा एकदा तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. अलीकडेच तिने इंस्टाग्राम पेजवर काही फोटो शेअर केले आहेत.
6/9
जान्हवीचा फ्लोरल साडीमधील हा पारंपारिक लूक चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे.
7/9
ह्या लूकमध्ये जान्हवीमध्ये तिची आई आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची झलक पाहायला मिळतेय. जान्हवीचे फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांना पुन्हा एकदा श्रीदेवीची आठवण झाली.
8/9
जान्हवी हॉरर-कॉमेडी चित्रपट 'रुही'मध्ये दिसली होती. ती लवकरच 'गुड लक जेरी' चित्रपटात झळकणार आहे.
9/9
याशिवाय ती करण जोहरच्या प्रोडक्शनमधील 'दोस्ताना 2' या चित्रपटात दिसणार आहे.