एक्स्प्लोर
दानवेंवर टीका करताना जोगेंद्र कवाडेंची जीभ घसरली!

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : विरोधकांच्या संघर्ष यात्रेत सावंतवाडीत पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते जोगेंद्र कवाडे यांची भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंवर टीका करताना जीभ घसरली. दानवे यांनी शेतकऱ्यांविषयी केलेल्या वक्तव्यावर टीका करताना कवाडेंनीही खालच्या भाषेत प्रहार केला. पाहा काय म्हणाले जोगेंद्र कवाडे? रावसाहेब दानवे काय म्हणाले होते? राज्य सरकारने एवढी तूर खरेदी केली, तरी रडतात XXX, अशा शब्दात रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलं. कापसाला, तुरीला, डाळीला भाव नाही असली गाणी बंद करा, अशी मुक्ताफळं दानवेंनी उधळली. याशिवाय दानवे यांनी असंसदीय भाषेचा वापरही केला होता.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
बुलढाणा
राजकारण
पुणे























