जालन्यात CEO कडून महिला कर्मचाऱ्याला अरेरावीची भाषा केल्यानं आली चक्कर, CEO विरोधात करणार आंदोलन
Jalna News : जालना जिल्हा परिषदेच्या सीईओकडून कर्मचाऱ्याला अरेरावी झाल्यामुळं संतप्त कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर आज आंदोलन केलं.
Jalna News : जालना जिल्हा परिषदेच्या सीईओकडून कर्मचाऱ्याला अरेरावी झाल्यामुळं संतप्त कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर आज आंदोलन केलं. जिल्हा परिषद कार्यालयातील बांधकाम विभागातील महिला कर्मचाऱ्याला पाहणी करताना सीईओ बोलल्यामुळे या कर्मचाऱ्यास अचानक चक्कर आली. यावेळी त्यांना दवाखान्यात भरती करण्यात आलं. या सर्व घटनेमुळे सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्रित येऊन मुख्याधिकाऱ्यांच्या विरोधात संताप व्यक्त करत बैठक घेतली.
आंदोलनाची दिशा ठरवणार
दरम्यान विभागप्रमुखाकडे आपण मुख्याधिकारी यांच्याविषयीची नाराजी व्यक्त करुन पुढे आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याचं या कर्मचारी संघटनेच्या वतीने सांगण्यात आलं. महिला कर्मचाऱ्याला झापल्याने जिल्हा परिषदेतील इतर कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या सीईओ विरोधात संताप व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या:


















