...तर रस्त्यावर उतरु; इंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ वारकरी सांप्रदाय सरसावला
इंदोरीकर महाराज यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्यास वारकरी सांप्रदाय रस्त्यावर उतरेल, असा इशारा त्यांनी शासनाला दिला आहे. इंदोरीकरांनी हिंदू धर्मग्रंथातील दाखले देत वक्तव्य केलं होतं.
पंढरपूर : निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ वारकरी सांप्रदाय सरसावला आहे. पंढरपूरमध्ये जेष्ठ कीर्तनकारांनी बैठक घेत इंदोरीकर महाराजांना पाठिंबा दिला आहे. सरकारने गुन्हा दाखल केल्यास सांप्रदाय रस्त्यावर उतरेल असा इशाराच कीर्तनकारांनी दिला आहे.
इंदोरीकर महाराजांच्या वक्तव्यावर सध्या राज्यभर वादळ उठलं आहे. अंनिसने तर इंदोरीकरांविरोधात अंधश्रद्धा निर्मुलनाचे गुन्हा दाखल करण्याची भूमिका घेतली आहे. आज पंढरपूरमध्ये वारकरी सांप्रदायतील जेष्ठ मंडळींनी बैठक घेत इंदोरीकर यांना पाठिंबा दिला आहे. याबाबत जर सरकारने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्यास वारकरी सांप्रदाय रस्त्यावर उतरेल, असा इशाराही त्यांनी शासनाला दिला आहे. वारकरी सांप्रदाय जगाला समतेची शिकवण देत अंधश्रद्धा दूर करण्याचे काम करत आला आहे. इंदोरीकर जे बोलले त्याला धर्मग्रंथांचा आधार असल्याने सांप्रदाय त्यांच्या पाठीशी उभा राहणार असल्याचं जेष्ठ कीर्तनकार प्रभाकरदादा बोधले यांनी सांगितलं.
... तर कीर्तन सोडून शेती करेन, निवृत्ती महाराज इंदोरीकरांची उद्विग्न प्रतिक्रिया
संततीसाठी हिंदू धर्मग्रंथात अनेक प्रमाण दिलेले असून संत तुकारामांपासून अनेक संतांनी यावर भाष्य केलं आहे. असं असताना इंदोरीकरांनी तेच दाखले देत वक्तव्य केलं होतं. मग त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी कशासाठी? असा सवाल या महाराज मंडळींनी उपस्थित केला. कीर्तकारांनी धर्मग्रंथातले दाखले द्यायचे की सिनेमा नाटकातील, असा सवाल करत यासाठीच जादूटोणा विधेयक होताना हिंदू धर्म ग्रंथांवर आघात होणार नाहीत याची ग्वाही संप्रदायाने घेतली होती, अशी भूमिका ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांनी मांडली.
तृप्ती देसाई यांसारखी काही मूठभर मंडळी शोबाजी करत असल्याचा टोला माधव महाराज शिवनीकर यांनी लगावला. सरकारने जर या मंडळींपुढे झुकून इंदोरीकरांवर गुन्हा दाखल केल्यास वारकरी संप्रदाय या विरोधात तीव्र आंदोलन करेल, असा इशारा शिवनीकर व इतर जेष्ठ वारकरी नेत्यांनी दिला आहे.
काय म्हणाले होते निवृत्ती महाराज इंदोरीकर?
स्त्रीसंग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्रीसंग जर अशीव वेळेला झाला तर ती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी होतात. जर टाईमिंग हुकला की क्वालिटी खराब, असं सांगत, पुलश्य नावाच्या ऋषींनी कैकसी नावाच्या स्त्रीशी सूर्य अस्ताला जाताना संग केला तर रावण, बिभीषण, कुंभकर्ण जन्माला आला. तर आदिती नावाच्या ऋषीने पवित्र दिवशी संग केला तर त्याच्या पोटी हिराण्यक्षपू नावाचा राक्षस जन्माला आला. हिरण्यकक्षपूने नारायण म्हणून संग केला तर भक्त प्रल्हाद जन्माला आला, असं इंदुरीकर महाराज यांनी कीर्तनात म्हटलं होतं.
इंदुरीकर महाराजांची शिक्षकांची खिल्ली उडवणारी क्लिप व्हायरल, शिक्षक संघटनाची नाराजी
सर्वात मोठे सेलिब्रिटी इंदुरीकर महाराज | स्पेशल रिपोर्ट | एबीपी माझा