एक्स्प्लोर

... तर कीर्तन सोडून शेती करेन, निवृत्ती महाराज इंदोरीकरांची उद्विग्न प्रतिक्रिया

वादग्रस्त वक्तव्यानंतर अडचणीत आलेल्या निवृत्ती महाराज देशमुख यांनी पहिल्यांदा या वादावर भाष्य केलं आहे. युट्यूब चॅनलवाल्यांनी मला संपवण्याचा प्रयत्न केला. परंतु चॅनल संपतील पण मी संपणार नाही, असं इंदोरीकर म्हणाले.

बीड : पुत्रप्राप्तीसाठी सम-विषम तिथीचा फॉर्म्युला दिल्यानंतर कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर अडचणीत आले आहेत. या सर्व वादावर इंदोरीकरांनी काल रात्री केलेल्या आपल्या कीर्तनात भाष्य केलं आहे. दोन तासांच्या कीर्तनात एखादं वाक्य चुकीचं जाऊ शकतं, असं स्पष्टीकरण त्यांनी आपल्या कीर्तनात दिलं. परभणीतील गंगाखेड तालुक्यातील उंडेगावात झालेल्या कीर्तनात त्यांनी हे भाष्य केलं.

पुत्रप्राप्तीबाबत मी जे काही बोललो ते अनेक ग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे. वादामुळे मुला खुप त्रास होत आहे. सहन करण्याची क्षमता आता संपली आहे. दोन दिवसात माझं वजनही कमी झालं आहे. एक-दोन दिवस बघेन, वाद थांबला नाही तर किर्तन सोडून शेती करेन, अशी उद्विग्न प्रतिक्रिया इंदोरीकर महाराजांनी दिली.

स्त्रीसंग सम तिथीला झाल्यास मुलगा आणि विषम तिथीला झाल्यास मुलगी होते, इंदुरीकर महाराजांचं वादग्रस्त वक्तव्य

गेल्या 26 वर्षांपासून मी कीर्तन करत आहे. या काळात घर आणि कुटुंबापासून नेहमी लांब राहिलो. रात्रंदिवस प्रवास करतो, हे सगळं मी लोकांसाठी केलं. एखाद्या कीर्तनात एखादा शब्द चुकीचा गेला किंवा मी केलेलं वाक्य चुकीचंही नाही, मात्र मला त्रास दिला जातोय. युट्यूबवाले काड्या करतात, युट्यूब चॅनलवाल्यांनी मला संपवण्याचा प्रयत्न केला. परंतु चॅनल संपतील पण मी संपणार नाही, असं इंदोरीकर महाराज म्हणाले.

काय म्हणाले होते निवृत्ती महाराज इंदोरीकर?

स्त्रीसंग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्रीसंग जर अशीव वेळेला झाला तर ती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी होतात. जर टाईमिंग हुकला की क्वालिटी खराब, असं सांगत, पुलश्य नावाच्या ऋषींनी कैकसी नावाच्या स्त्रीशी सूर्य अस्ताला जाताना संग केला तर रावण, बिभीषण, कुंभकर्ण जन्माला आला. तर आदिती नावाच्या ऋषीने पवित्र दिवशी संग केला तर त्याच्या पोटी हिराण्यक्षपू नावाचा राक्षस जन्माला आला. हिरण्यकक्षपूने नारायण म्हणून संग केला तर भक्त प्रल्हाद जन्माला आला, असं इंदुरीकर महाराज यांनी कीर्तनात म्हटलं होतं.

इंदुरीकर महाराजांची शिक्षकांची खिल्ली उडवणारी क्लिप व्हायरल, शिक्षक संघटनाची नाराजी

निवृत्ती महाराजांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत अहमदनगरच्या PCPNDT समितीने ही नोटीस पाठवली होती. गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात असून PCPNDT कायद्याच्या कलाम 22 चे उल्लंघन असल्याचा आरोप याच समितीच्या सदस्याने केला. त्यानुसार PCPNDT सल्लागार समितीने निवृत्ती महाराज इंदोरीकर यांना नोटीस पाठवून खुलासा मागितला आहे. इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मुलन समितीने केली आहे.

सर्वात मोठे सेलिब्रिटी इंदुरीकर महाराज | स्पेशल रिपोर्ट | एबीपी माझा

महत्त्वाच्या बातम्या

Eknath shinde: उद्धव ठाकरे 6 मतदारसंघात फिरुन आल्यानंतर सचिन अहिरांकडून 'वेलकम'; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, सगळं फुलप्रूफ
उद्धव ठाकरे 6 मतदारसंघात फिरुन आल्यानंतर सचिन अहिरांकडून 'वेलकम'; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, सगळं फुलप्रूफ
Aaditya Thackrey On Sachin Ahir: ठाकरेंची साथ सोडली पण वरळी मतदारसंघाबाबत सचिन अहिरांचा शब्द, आदित्य ठाकरे काय म्हणाले?
ठाकरेंची साथ सोडली पण वरळी मतदारसंघाबाबत सचिन अहिरांचा शब्द, आदित्य ठाकरे काय म्हणाले?
Sachin Ahir on Aditya Thackeray: आदित्य आणि उद्धव ठाकरे तुम्हाला रोज भेटत होते, मग ठाकरेंना का सोडलं?, सचिन अहिर यांनी कारण सांगितलं...
आदित्य आणि उद्धव ठाकरे तुम्हाला रोज भेटत होते, मग ठाकरेंना का सोडलं?, सचिन अहिर यांनी कारण सांगितलं...
Sachin Ahir and Aaditya Thackeray: पक्ष सोडताच पहिला हल्ला आदित्य ठाकरेंवर, वरळीतून निवडणूक लढणार का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले....
पक्ष सोडताच पहिला हल्ला आदित्य ठाकरेंवर, वरळीतून निवडणूक लढणार का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले....

व्हिडीओ

Zero Hour : नसरापुरातील प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा, निकालानं गुन्हेगारांवर वचक बसेल असं वाटतं का?
TET Exam Paper Leaked Case : टीईटी पेपरफुटीचे धागेदोरे थेट बिहार, हरियाणापर्यंत... | Special Report
Uddhav Thackeray Tour In Reble MP Constituency : दौरे आणि बोल, डॅमेज की कंट्रोल? | Special Report
Uddhav Thackeray On CM Devendra Fadnavis : फडणवीसांचं 'हित', ठाकरे 'चिंतक' | Special Report
Uddhav Thackeray Shirdi : काहींच्या नसा-नसांत गद्दारी भरली, भाऊसाहेब वाकचौरेंवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde on Uddhav Thackeray: आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट...; सचिन अहिर शिंदे गटात येताच एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर बोचरा वार
आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट...; सचिन अहिर शिंदे गटात येताच एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर बोचरा वार
रात्री सोबत गप्पा, सकाळी 11.30 वाजता इंग्रजीत मेसेज; अंबादास दानवेंनी सांगितला सचिन अहिरांचा 'दे धक्का', म्हणाले काही...
रात्री सोबत गप्पा, सकाळी 11.30 वाजता इंग्रजीत मेसेज; अंबादास दानवेंनी सांगितला सचिन अहिरांचा 'दे धक्का', म्हणाले काही...
उद्धव ठाकरे नी*, मौलवींसोबत शय्या, 2019 मध्ये शेण खाल्लं, आता लग्नात फोटोग्राफी करावी : नितेश राणे
उद्धव ठाकरे नी*, मौलवींसोबत शय्या, 2019 मध्ये शेण खाल्लं, आता लग्नात फोटोग्राफी करावी : नितेश राणे
Eknath shinde: उद्धव ठाकरे 6 मतदारसंघात फिरुन आल्यानंतर सचिन अहिरांकडून 'वेलकम'; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, सगळं फुलप्रूफ
उद्धव ठाकरे 6 मतदारसंघात फिरुन आल्यानंतर सचिन अहिरांकडून 'वेलकम'; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, सगळं फुलप्रूफ
Sachin Ahir Anti Defection Law: कायद्यातील सर्वात मोठी पळवाट, सचिन अहिर यांना पक्षांतरबंदी कायदा लागूच होणार नाही, कारण...
कायद्यातील सर्वात मोठी पळवाट, सचिन अहिर यांना पक्षांतरबंदी कायदा लागूच होणार नाही, कारण...
Sachin Ahir and Aaditya Thackeray: पक्ष सोडताच पहिला हल्ला आदित्य ठाकरेंवर, वरळीतून निवडणूक लढणार का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले....
पक्ष सोडताच पहिला हल्ला आदित्य ठाकरेंवर, वरळीतून निवडणूक लढणार का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले....
Sachin Ahir joins Eknath Shinde Shivsena: 'ती' तीन नावं चर्चेत ठेवून एकनाथ शिंदेंनी सगळ्यांना गाफील ठेवलं अन् ठाकरेंचा विश्वासू मोहरा फोडला, सचिन अहिर शिंदे गटात
'ती' तीन नावं चर्चेत ठेवून एकनाथ शिंदेंनी सगळ्यांना गाफील ठेवलं अन् ठाकरेंचा विश्वासू मोहरा फोडला, सचिन अहिर शिंदे गटात
Sachin Ahir and Aaditya Thackeray: सचिन अहिरांचा ठाकरे गटातील नेत्याला इंग्रजीत मेसेज अन् आदित्य ठाकरेंनाही फोन करुन म्हणाले...
सचिन अहिरांचा ठाकरे गटातील नेत्याला इंग्रजीत मेसेज अन् आदित्य ठाकरेंनाही फोन करुन म्हणाले...
Embed widget