एक्स्प्लोर

सांगलीत शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 141 शेतकऱ्यांना गैरलाभ; फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

सांगली जिल्ह्यातील एकूण 141 व्यक्तींनी महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 चा गैरलाभ घेतल्याचे निदर्शनास आले आहे. गैरलाभ घेणाऱ्या 141 शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश सांगली जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिले आहेत.

सांगली : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा सांगली जिल्ह्यातील 141 शेतकऱ्यांनी गैरलाभ घेतल्याचे उघडकीस आले आहे. गैरलाभ घेणाऱ्या 141 शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश सांगली जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिले आहेत. 141 शेतकऱ्यांपैकी 110 जणांच्या खात्यावर 92 लाख रुपये निधी वर्ग देखील झाला होता. संबंधितांवर शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधकांना देण्यात आले आहेत.

सांगली जिल्ह्यातील एकूण 141 व्यक्तींनी महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 चा गैरलाभ घेतल्याचे निदर्शनास आले आहे. यातील ज्या व्यक्तींना अद्याप शासनाकडून रक्कम प्राप्त झालेली नाही, अशा प्रकरणी प्राप्त होणारी रक्कम संबंधित कर्ज खात्यामध्ये वर्ग न करता शासनास परत करावी. तसेच गैरलाभाच्या प्रकरणांपैकी ज्या व्यक्तींच्या खात्यावर रक्कम जमा झाली आहे. त्या व्यक्तींकडून सदरची रक्कम वसूल करून यासाठी जबाबदार असणाऱ्या संबंधितांवर शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक यांना दिल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत बँकांनी पोर्टलवर अपलोड केलेल्या शेतकऱ्यांपैकी ज्यांच्या नावावर कोणतीही शेतजमीन नाही अथवा 10 गुंठ्यापेक्षा कमी क्षेत्र आहे, अशा शेतकऱ्यांची माहिती तलांठ्यामार्फत उपलब्ध करून शासकीय लेखा परीक्षकांमार्फत तपासणी करण्याबाबत आदेश दिलेले होते. यामध्ये हा सर्व अफरातफरीचा प्रकार समोर आला आहे.

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील गोटखिंडी येथील वित्तीय संस्थेमध्ये सातबारा नसताना कर्जवाटप करून महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा गैरलाभ घेतल्याचे निदर्शनास आल्याने 12 व्यक्तींवर यापुर्वीच गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. अशाच पध्दतीने जिल्ह्यात इतर ठिकाणी देखील या योजनेचा गैरलाभ घेण्यात आल्याची शक्यता असल्याने बँकांनी कर्जमुक्ती योजनेच्या पोर्टलवर अपलोड केलेल्या शेतकऱ्यांपैकी 10 गुंठ्यापेक्षा कमी क्षेत्र आहे. अशा शेतकऱ्यांची माहिती तलांठ्यामार्फत उपलब्ध करून शासकीय लेखा परीक्षकांमार्फत तपासणी करण्याबाबत आदेश दिलेले होते. यामध्ये मिरज तालुक्यातील राष्ट्रीयकृत बँकांची यादी वगळता जिल्ह्यातील कर्जखात्यांची शासकीय लेखापरीक्षकांमार्फत तपासणी करण्यात आली आहे. सदर तपासणी अहवालानुसार, सांगली जिल्ह्यातील एकूण 141 व्यक्तींनी महात्मा जोतिराव फुले शेतकारी कर्जमुक्ती योजना 2019 या योजनेचा गैरलाभ घेतला असल्याचे निदर्शनास आलेले आहे.

गैरलाभ घेतलेल्या प्रकरणांमध्ये व्यक्तीच्या नावे शेतजमीन नसताना विना सातबारा उताऱ्याची 60 कर्जप्रकरणे, पीक कर्जाव्यतिरिक्त सामान्य कर्जे, गाय/ म्हैस/ शेळी बाबतची कर्जे, इतर व्यवसायासाठी दिलेल्या कर्जाचा समावेश चुकीच्या पध्दतीने कर्जमुक्ती योजनेमध्ये करणे अशी 52 प्रकरणे, क्षेत्र नसताना बनावट सातबारा दाखल करून घेतलेली कर्जाची 7 प्रकरणे, जमीन विक्री केलेली असताना कर्ज उचलीची 7 प्रकरणे, सातबारा आहे, परंतू जादा कर्जवाटपाची 3 प्रकरणे, यापूर्वी गुन्हा दाखल असलेली 12 प्रकरणे. अशी एकूण 141 प्रकरणे असून यातील अपात्र 110 कर्ज खात्यांवर सुमारे 92 लाख 42 हजार 833 रूपयांची गैरलाभाची रक्कम वर्ग झाली आहे. सदर प्रकरणी गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही सुरु आहे.

गैरलाभ घेतलेल्या प्रकरणांचा बँकनिहाय पुढीलप्रमाणे :

  • बँक ऑफ बडोदा मधील 30 अपात्र खात्यांपैकी 25 खात्यांवर 7 लाख 43 हजार 663 रूपये.
  • बँक ऑफ इंडिया 39 अपात्र खात्यांपैकी 33 खात्यांवर 36 लाख 13 हजार 813 रूपये.
  • एचडीएफसी बँक मधील 4 अपात्र खात्यांवर 1 लाख 98 हजार 13 रूपये.
  • बँक ऑफ महाराष्ट्र मधील एका अपात्र खात्यावर 30 हजार 249 रूपये.
  • कार्पोरेशन बँक कराड / वांगी मधील 32 अपात्र खात्यांपैकी 17 अपात्र खात्यांवर 20 लाख 6 हजार 531 रूपये.
  • बँक ऑफ बडोदा कराड मधील 3 अपात्र खात्यांवर 3 लाख 94 हजार 132 रूपये.
  • सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. सांगली मधील 32 अपात्र खात्यांपैकी 27 अपात्र खात्यांवर 22 लाख 56 हजार 432 रूपये, अशा एकूण 110 अपात्र कर्ज खात्यांवर 92 लाख 42 हजार 833 रूपये गैरलाभाची रक्कम वर्ग झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :  हृदयद्रावक! स्वतःचं चित्र रेखाटून त्यावर मृत्यू दिनांक लिहून कला शिक्षकाची आत्महत्त्या नागपूरच्या बहुचर्चित 'हनी ट्रॅप' ऑडिओ क्लिप प्रकरणात पोलिसांचा मोठा खुलासा मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर त्या -त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या सल्ल्याने प्रशासक नेमण्याला खंडपीठात आव्हान
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjivraje Naik Nimbalkar : साम, दाम, दंड भेद वापरण्याचे दिल्लीतील नेत्यांनी सांगितले, पण दिल्लीसमोर झुकणारे आम्ही नाही; संजीवराजेंचा एल्गार
साम, दाम, दंड भेद वापरण्याचे दिल्लीतील नेत्यांनी सांगितले, पण दिल्लीसमोर झुकणारे आम्ही नाही; संजीवराजेंचा एल्गार
आनंदाची बातमी! पुणेकरांना आणखी दोन नव्या मेट्रो मिळणार, मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय, जाणून घ्या कसा असेल मार्ग?
आनंदाची बातमी! पुणेकरांना आणखी दोन नव्या मेट्रो मिळणार, मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय, जाणून घ्या कसा असेल मार्ग?
Nobel In Economic Sciences : अअमेरिका आणि ब्रिटनमधील तीन शास्त्रज्ञांना अर्थशास्त्रातील 'नोबेल'; राजकीय संस्थांचा समाजावरील परिणाम जगाला दाखवला
अमेरिका आणि ब्रिटनमधील तीन शास्त्रज्ञांना अर्थशास्त्रातील 'नोबेल'; राजकीय संस्थांचा समाजावरील परिणाम जगाला दाखवला
मुंबईहून उड्डाण करणाऱ्या तीन फ्लाइटमध्ये बॉम्बची धमकी; एअर इंडियाचे विमान दिल्लीकडे वळवले, इंडिगोच्या 2 विमानांचीही तपासणी
मुंबईहून उड्डाण करणाऱ्या तीन फ्लाइटमध्ये बॉम्बची धमकी; एअर इंडियाचे विमान दिल्लीकडे वळवले, इंडिगोच्या 2 विमानांचीही तपासणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Baba Siddique Shooters House : चप्पल,बॉटल अन् सामान; सिद्दिकींच्या मारेकऱ्यांची घरी काय सापडलं?ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 14 October 2024Kurla house of Baba Siddique Shooters : बाबा सिद्दिकी यांची हत्या करणाऱ्यांचं मुंबईतील राहतं घर पहाTop 50 | टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट : ABP Majha : 05 PM : 14 OCT 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjivraje Naik Nimbalkar : साम, दाम, दंड भेद वापरण्याचे दिल्लीतील नेत्यांनी सांगितले, पण दिल्लीसमोर झुकणारे आम्ही नाही; संजीवराजेंचा एल्गार
साम, दाम, दंड भेद वापरण्याचे दिल्लीतील नेत्यांनी सांगितले, पण दिल्लीसमोर झुकणारे आम्ही नाही; संजीवराजेंचा एल्गार
आनंदाची बातमी! पुणेकरांना आणखी दोन नव्या मेट्रो मिळणार, मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय, जाणून घ्या कसा असेल मार्ग?
आनंदाची बातमी! पुणेकरांना आणखी दोन नव्या मेट्रो मिळणार, मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय, जाणून घ्या कसा असेल मार्ग?
Nobel In Economic Sciences : अअमेरिका आणि ब्रिटनमधील तीन शास्त्रज्ञांना अर्थशास्त्रातील 'नोबेल'; राजकीय संस्थांचा समाजावरील परिणाम जगाला दाखवला
अमेरिका आणि ब्रिटनमधील तीन शास्त्रज्ञांना अर्थशास्त्रातील 'नोबेल'; राजकीय संस्थांचा समाजावरील परिणाम जगाला दाखवला
मुंबईहून उड्डाण करणाऱ्या तीन फ्लाइटमध्ये बॉम्बची धमकी; एअर इंडियाचे विमान दिल्लीकडे वळवले, इंडिगोच्या 2 विमानांचीही तपासणी
मुंबईहून उड्डाण करणाऱ्या तीन फ्लाइटमध्ये बॉम्बची धमकी; एअर इंडियाचे विमान दिल्लीकडे वळवले, इंडिगोच्या 2 विमानांचीही तपासणी
शिवसृष्टीतील राड्यानंतर छगन भुजबळ तडकाफडकी येवल्यात दाखल; म्हणाले, छत्रपती शिवरायांसमोर शिवीगाळ करणं....
शिवसृष्टीतील राड्यानंतर छगन भुजबळ तडकाफडकी येवल्यात दाखल; म्हणाले, छत्रपती शिवरायांसमोर शिवीगाळ करणं....
Lawrence Bishnoi Baba Siddique Vastav EP 94 : लॉरेन्स बिश्नोईला पाठीशी कोण आणि का घालतंय?
Lawrence Bishnoi Baba Siddique Vastav EP 94 : लॉरेन्स बिश्नोईला पाठीशी कोण आणि का घालतंय?
Mahayuti Government : महायुती सरकारची उद्या संयुक्त पत्रकार परिषद; मुख्यमंत्री अन् दोन्ही उपमुख्यमंत्री काय बोलणार?
महायुती सरकारची उद्या संयुक्त पत्रकार परिषद; मुख्यमंत्री अन् दोन्ही उपमुख्यमंत्री काय बोलणार?
योजना राबवा, पैसे द्या, पण राजकीय स्टंट करू नका; लाडक्या बहिणीच्या मृत्यूवरून छत्रपती संभाजीराजे कडाडले
योजना राबवा, पैसे द्या, पण राजकीय स्टंट करू नका; लाडक्या बहिणीच्या मृत्यूवरून छत्रपती संभाजीराजे कडाडले
Embed widget