एक्स्प्लोर

हृदयद्रावक! स्वतःचं चित्र रेखाटून त्यावर मृत्यू दिनांक लिहून कला शिक्षकाची आत्महत्त्या

पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील निंबापूर महालपाडा येथील एका कला शिक्षकाने स्वतःचे चित्र रेखाटून त्यावर मृत्यू दिनांक लिहून आपल्या फोटोला हार घालून गळफास घेऊन घरातच आत्महत्त्या केली.

पालघर : जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील निंबापूर महालपाडा येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. एकतीस वर्षीय तरुण चित्रकला शिक्षक गंगाराम रमेश चौधरी यांनी आपलं स्वतःचे चित्र रेखाटून त्यावर मृत्यू दिनांक लिहून आपल्या फोटोला हार घालून गळफास घेऊन घरातच आत्महत्त्या केल्याची घटना घडली आहे. काही दिवसापासून आपली पत्नी माहेरी निघून गेल्याने गंगाराम विचलित अवस्थेत होता. गंगाराम हा चित्रकलेत पारंगत आणि वारली चित्रकार होता. 8 जून 2020 रोजी गंगारामने आपले स्वतःचे चित्र रेखाटले. त्या चित्रावर दि 15-7-2020 बुधवार, असा मृत्यू दिनांक टाकला. आणि चित्राला हार घालून त्याचा फोटो काढून त्यांच्या एक आप्तेष्टाला व्हॉटअप्सद्वारे फोटो पाठवला. हृदयद्रावक! स्वतःचं चित्र रेखाटून त्यावर मृत्यू दिनांक लिहून कला शिक्षकाची आत्महत्त्या सध्या पाऊस चांगला असल्याने शेतीची काम सुरू आहेत. त्यामुळे काल गंगारामच्या घरातील सर्व माणसं आपल्या भात लावणीच्या कामासाठी शेतीवर निघून गेली होती. दरम्यान गंगाराम एकटाच घरी होता. त्याने घरातच गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपविली. गंगाराम चौधरी हे चळणी येथील शाळेत चित्रकला शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांचे लग्न 2016 साली झाले होते. त्यांना एकही अपत्य नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पालघर जिल्ह्यातील दोन आमदार शेतीच्या कामात गुंतले, कुटुंबासोबत पारंपरिक भात लावणी कौटुबिक वादातून आत्महत्या केल्याचा अंदाज काही दिवसांपूर्वी त्यांची पत्नीही माहेरी गेली होती. गंगाराम हे चांगले वारली चित्रकार ही होते. ते शाळेतील काम संपल्यावर सतत वारली पेंटिंग करून त्या विक्रीही करायचे. अजूनही आत्महत्येचं कारण समजू शकले नसले तरीही ही आत्महत्त्या कौटुंबिक वादातून झाली असल्याची शक्यता पोलीस वर्तवित आहेत. सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद कासा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून कासा पोलीस ठाण्याच्या एपीआय सिद्धवा जायभाये यांच्या नेतृत्वाखाली कासा पोलीस अधिक तपास करत आहेत. हृदयद्रावक! स्वतःचं चित्र रेखाटून त्यावर मृत्यू दिनांक लिहून कला शिक्षकाची आत्महत्त्या नैराश्य वाढतंय कोरोना व्हायरसमुळे सर्वांनाच लॉकडाऊन अनिवार्य झाले आहे. मात्र, लॉकडाऊनमधील क्वॉरंटाईन हे मानसिक आरोग्यवर परिणाम करत असल्याचे एका सर्व्हेक्षणातून समोर आलं आहे. लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंदे बंद असल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. विनाअनुदानीत शाळा, महाविद्यालयातील शिक्षकांचीही अशीच काहीशी अवस्था झाली आहे. घरात बसून राहावे लागत असल्याने लोकांमध्ये नैराश्य वाढत असल्याचे सांगितले आहेत. Anil Deshmukh | पालघर झुंडबळी प्रकरणी सीआयडीकडून आरोपपत्र दाखल : गृहमंत्री अनिल देशमुख
एबीपी माझा मध्ये पालघर प्रतिनिधी म्हणून गेली पाच वर्ष कार्यरतमी मराठी न्यूज चैनल पालघर ब्यूरो म्हणून सात वर्षाचा अनुभव महाराष्ट्र 1, न्यूज चैनल मध्ये दोन वर्षाचा अनुभव
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune Unseasonal Rain: पुण्यात जोरदार पाऊस, पिंपरी-चिंचवडलाही सरींनी झोडपलं, हवामान खात्याकडून राज्यात गारपिटीचा अंदाज
पुण्यात जोरदार पाऊस, पिंपरी-चिंचवडलाही सरींनी झोडपलं, हवामान खात्याकडून राज्यात गारपिटीचा अंदाज
Virar Crime News: संशयाचे भूत मानगुटीवर! नवऱ्याने मित्राच्या मदतीने बायकोला संपवलं अन्...; विरारमधील 'त्या' घटनेचा उलगडा
संशयाचे भूत मानगुटीवर! नवऱ्याने मित्राच्या मदतीने बायकोला संपवलं अन्...; विरारमधील 'त्या' घटनेचा उलगडा
Maharashtra Live Blog Updates: भोंदू अशोक खरात SIT चौकशीची मोठी अपडेट; मोबाईल मधला डेटा रिकव्हर करण्याचे काम सुरू
Maharashtra Live Blog Updates: भोंदू अशोक खरात SIT चौकशीची मोठी अपडेट; मोबाईल मधला डेटा रिकव्हर करण्याचे काम सुरू
Ashok Kharat Case Nashik Crime News: औषधाची बाटली, विविध खडे जप्त, पीडित महिलांचे लाईव्ह स्क्रिनिंग; अशोक खरातच्या केबिनमध्ये SIT ने काय काय केलं?
औषधाची बाटली, विविध खडे जप्त, पीडित महिलांचे लाईव्ह स्क्रिनिंग; अशोक खरातच्या केबिनमध्ये SIT ने काय काय केलं?

व्हिडीओ

Parth Pawar Meet Raj Thackeray : खासदार पार्थ पवारांनी घेतली राज ठाकरेंची भेट, एक ते दीड तास चर्चा
Prashant Padole Accident : गोंदियाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळेंच्या वाहनाचा अपघात, पडोळे किरकोळ जखमी
Satara ZP Rada : सातारा झेडपी राडा प्रकरण भोवलं, चौकशी होईपर्यंत SP Tushar Doshi सक्तीच्या रजेवर
Nagpur Crime : नर्सिंग कॉलेजमध्ये विद्यार्थिनीने प्रियकराला व्हिडीओ कॉल करुन जीवन संपवलं
Ashok Kharat Police Custody | अशोक खरातला 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
LPG Supply : ... तरच तीन महिन्यात LPG सिलेंडर बंद होणार, इंधन-गॅस तुटवड्याच्या चर्चेवर भुजबळांचं मोठं स्पष्टीकरण
... तरच तीन महिन्यात LPG सिलेंडर बंद होणार, इंधन-गॅस तुटवड्याच्या चर्चेवर भुजबळांचं मोठं स्पष्टीकरण
Mohit Kamboj Daughter Birthday Party: आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळे, संजय दत्त, अंबानी, मोहित कंबोजांच्या लेकीच्या बर्थडे पार्टीला कोण कोण?
आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळे, संजय दत्त, अंबानी, मोहित कंबोजांच्या लेकीच्या बर्थडे पार्टीला कोण कोण?
Tushar Doshi Shivsena: शिवसेनेशी पंगा महागात पडला, तुषार दोशी सक्तीच्या रजेवर, एकनाथ शिंदेंनी फडणवीसांना नेमकं काय सांगितलं? वाचा इनसाईड स्टोरी
शिवसेनेशी पंगा महागात पडला, तुषार दोशी सक्तीच्या रजेवर, शिंदेंनी फडणवीसांना काय सांगितलं? वाचा इनसाईड स्टोरी
विवाहित नेव्ही जवानाकडून प्रेयसीचे तीन तुकडे; शीर जाळून टाकलं, एक तुकडा पलंगाखाली अन् दुसरा फ्रिजमध्ये ठेवला; आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात गेला
विवाहित नेव्ही जवानाकडून प्रेयसीचे तीन तुकडे; शीर जाळून टाकलं, एक तुकडा पलंगाखाली अन् दुसरा फ्रिजमध्ये ठेवला; आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात गेला
Nitish Kumar: बिहारी राजकारणात नितिश पर्वाचा अखेर अस्त! तब्बल 20 वर्ष सभागृहात अन् फक्त 29 शब्दांत निरोप घेत आमदारकीचा राजीनामा; जेडीयू की भाजप? मुख्यमंत्रीपदाचं काय ठरलं?
बिहारी राजकारणात नितिश पर्वाचा अखेर अस्त! तब्बल 20 वर्ष सभागृहात अन् फक्त 29 शब्दांत निरोप घेत आमदारकीचा राजीनामा; जेडीयू की भाजप? मुख्यमंत्रीपदाचं काय ठरलं?
Mangalprabhat Lodha on LPG Gas Cylinder: लोक मदत मागायला आले, त्यांना गॅस सिलेंडर मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न केलं तर काय चुकलं? मंगलप्रभात लोढांचा आर्त सवाल
मदतीसाठी आलेल्या लोकांना गॅस सिलेंडर देण्यासाठी प्रयत्न केलं तर काय चुकलं? मंगलप्रभात लोढांचा आर्त सवाल
PSL 2026 News : बळजबरीनं खोलीत नेलं...; शाहीन आफ्रिदी आणि सिकंदर रझावर गंभीर आरोप; पाकिस्तान सुपर लीगमध्ये भूकंप
बळजबरीनं खोलीत नेलं...; शाहीन आफ्रिदी आणि सिकंदर रझावर गंभीर आरोप; पाकिस्तान सुपर लीगमध्ये भूकंप
Cameron Green: तब्बल 25.20 कोटी मोजून केकेआरनं धुरंदर संघात आणला, पण बॉलिंगची संधी दिलीच नाही! कॅप्टन अजिंक्य रहाणेच्या उत्तरानं सुद्धा डोकं खाजवायची वेळ आली...
तब्बल 25.20 कोटी मोजून केकेआरनं धुरंदर संघात आणला, पण बॉलिंगची संधी दिलीच नाही! कॅप्टन अजिंक्य रहाणेच्या उत्तरानं सुद्धा डोकं खाजवायची वेळ आली...
Embed widget