कसा होता विधानपरिषदेतील कामकाजाचा अखेरचा दिवस?
कोरोना परिस्थिती,राज्यात आलेले नैसर्गिक आपत्ती अनेक प्रश्नांवर विस्तृत चर्चा झालीच नाही. विरोधकांना देखील शासनाला घेरण्याची संधी मिळाली नाही. कोरोना काळात सोशल डिस्टन्सिंग ठेवत आणि योग्य ती खबरदारी घेत अधिवेशन सांगता झाली.
मुंबई : महाराष्ट्रातील पावसाळी दोन दिवसाच्या अधिवेशनच आज दुसरा आणि शेवटचा दिवस होता. आजचा कामकाजाचा मुख्य दिवस होता.कामकाज सुरु झाल्यावर वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी वैद्यकीय महाविद्यालयातील 70-30 कोटा रद्द करण्याची घोषणा केली. One state and one merit सांगत सरकारने गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये म्हणून कोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला.
त्यानंतर शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी रिपब्लिक वाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी यच्यावर आक्षेप घेत हक्कभंग नोटीस दिली. सुशांत सिंग प्रकरणी रिपब्लिक चॅनेलवरील बातम्या, अर्णव गोस्वामी यांची भाषा त्यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि इतर नेत्यांचा एकेरीत केलेला उल्लेख यावरून हक्कभंग शिवसेना आमदाराने मांडला.या हक्कभंगाला पाठिंबा दिला तो छगन भुजबळ यांनी. हा हक्कभंगाबद्दल अनिल परब बोलत असताना विरोधी बाकांवरून गोंधळ करण्यात आला.घोषणाबाजी झाली त्यामुळे सभागृह तहकूब करण्याची तीन वेळा वेळ आली. माजी शिवसेनीक असलेले छगन भुजबळ ही यावेळी मुख्यमंत्री आणि प्रताप सरनाईक यांच्या मदतीला धावून आले.
पुरवणी मागण्या चर्चा होऊन मंजूर करण्यासाठी वेळेची मर्यादा ही दुपारी तीनपर्यंत होती. त्यात अर्णव गोस्वामी ,जगणं राणावत याच मुद्द्यावरून गोंधळ झाल्याने सभागृहाच्या कामकाजाचा वेळ वाया गेला. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतला.
अखेरीस दुपारी एकच्या सुमारास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुरवणी मागण्यांवर आपले भाषण सुरू केले.राज्यातील कोरोना स्थिती,वैदकीय सुविधा ते विदर्भातील पूर या सर्व बाबींवर देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीका केली. मुख्यमंत्री मुंबईचे काम पाहणार अजित पवार पुण्याचं मग राज्यातील इतर भागाची जबाबदारी कोण घेणार? औरंगाबाद,नागपूर हे महाराष्ट्रात येत नाही का असा खडा सवाल त्यांनी सरकारला विचारला. रुग्णालयाची चुकीची बिल,ऑक्सिजन -बेड - औषधांचा तुटवडा या सगळ्यावर त्यांनी आकडेवारीसहित आपली भूमिका मांडली. आरे कारशेड वरून देखील त्यांनी सरकारला इगो घेऊन सरकार चालवू शकत नाही हे सुनावलं. पावणे दोन तास देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केले.वेळ कमी असल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना फक्त आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीच उत्तर दिले.
राज्यात केलेली आरोग्य व्यवस्था, कोरोना स्थिती त्यांनी सांगितले. तसेच केंद्राने सध्या राज्याला पीपीई किट, मास्क , ventilators देणार नसल्याचे कळवले आहे. त्यामुळे राज्यावर 300 कोटींचा भार येणार आहे. देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लाडके असल्याने त्यांनी केंद्राशी बोलून ही मदत सुरू ठेवावी सरकारला मदत करावी असा आवाहन केले. यानंतर पुरवणी मागण्या आणि विनियोजन विधेयक मंजूर करण्यात आली.
अधिवेशनाचे कामकाज संपत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना परिस्थितीत सगळ्यांनी केलेलं सहकार्य याबाबत आभार मानले. राज्यात नेमकी सरकार कोरोना स्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी करत असलेल्या उपाययोजनांवर भाष्य केले. राज्य सरकार 15 ऑगस्ट पासून माझे कुटुंब माझी जबाबदारी हा उपक्रम राबवणार असल्याचे देखील सांगितलं. याविषयी बोलताना मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्ष देवेंद्र फडणवीस यांना टोला मारला. फडणवीस सरकार असताना आरेमध्ये रात्री झाड कापली होती. त्यावरून सरकार चालवताना इगो असू नये तसा शॉर्टकट ही मारू नये. रात्री चालणारी काम आम्ही दिवस ढवळ्या सगळं करतो, म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारलं "बरोबर ना दादा..." यानंतर विधानसभेचे कामकाज संपून हिवाळी अधिवेशन नागपुरात 7 डिसेंबर असल्याचे उपाध्यक्षांनी घोषित केले.कोरोना काळातील जिकरीचे अधिवेशन संपले..
या अधिवेशनात पुरवणी मागण्या आणि विनियोजन आणि विधेयक हेच काम प्रामुख्याने झाले. कोरोना परिस्थिती,राज्यात आलेले नैसर्गिक आपत्ती अनेक प्रश्नांवर विस्तृत चर्चा झालीच नाही. मंत्र्यांनाही प्रश्नोत्तर आणि लक्षवेधी नसल्यामुळे अधिवेशनात विशेष आपल्या खात्यात काय सुरू आहे हे मांडण्याची संधी मिळाली नाही. विरोधकांना देखील शासनाला घेरण्याची संधी मिळाली नाही. कोरोना काळात सोशल डिस्टन्सिंग ठेवत आणि योग्य ती खबरदारी घेत अधिवेशन सांगता झाली.
संबंधित बातम्या :