फर्निचरसाठी भांडणाऱ्या बाईवर किती बोलायचं? त्यांच्या घरी चार सोफा व दोन टेबल पाठवून देतो, म्हणजे शांत राहील; नितेश राणेंची सुषमा अंधारेंवर टीका
शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी नितेश राणे आणि मुर्तीकार असलेल्या जयदीप आपटेचा एकत्रित असल्याचे फोटो आज समोर आणले आहेत.

Nitesh Rane criticism on Sushma Andhare : मनीषा कायंदे आता एकनाथ शिंदे यांच्या बरोबर आल्या आहेत, पण त्याआधी ठाकरेंकडे होत्या. त्यावेळी रश्मी ठाकरे त्यांना राणेंवर बोलण्यासाठी जबरदस्ती करत होत्या. बोललं नाही, तर पद आणि तिकीट देणार नाही, असे सांगायच्या. त्यामुळे सुषमा अंधारे रश्मी ठाकरेंना खुश करण्यासाठी पद मिळावे यासाठी बोलत असल्याची टीका नितेश राणे यांनी केली आहे.
फर्निचरसाठी भांडणाऱ्या बाईवर किती बोलायचं?
नितेश राणे म्हणाले की, फर्निचरसाठी भांडणाऱ्या बाईवर किती बोलायचं? त्यांच्या घरी चार सोफा व दोन टेबल पाठवून देतो, म्हणजे शांत राहील. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी नितेश राणे आणि मुर्तीकार असलेल्या जयदीप आपटेचा एकत्रित असल्याचे फोटो आज समोर आणले आहेत.
पत्रकार सामान्य नागरिक पोलीस यांच्याशी सतत दमदाटीची भाषा, गुंडागर्दी, सामाजिक प्रदूषण पसरवणाऱ्या राणेंवर गुन्हे दाखल झाले नाही तर याचा अर्थ या तीनही कळसूत्री बाहुल्यांचे सूत्रधार @Dev_Fadnavis यांना जाणीवपूर्वक महाराष्ट्र अशांत करायचा आहे. @ShivSenaUBT_ https://t.co/YiT2LMuzNI
— SushmaTai Andhare (@andharesushama) August 29, 2024
तर तिथेच पेंग्विनची पॅन्ट ओली झाली असती
नितेश राणे आदित्य ठाकरे यांच्या राजकोट किल्ल्यावर बोलताना म्हणाले की, काल पेंग्विनला डायपर घालायची वेळ आणली होती. काल परवानगी दिली नसती, तर तिथेच पेंग्विनची पॅन्ट ओली झाली असती. राजकोटवर जाण्यासाठी जी वेळ आम्हाला दिली होती, त्याचवेळी महाविकास आघाडीचे नेते तिथे आले, असा दावा नितेश राणे यांनी केला.
सुषमा अंधारेंकडून प्रश्नांची सरबत्ती, नितेश राणेंचे फोटो दाखवले
दरम्यान, राजकोट किल्ल्यावरील छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा माणूस आहे. जयदीप आपटे हा अनुभव नसलेला मूर्तीकार होता. तरीही त्याला शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचे काम कसे देण्यात आले? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत, त्यावरुन आज सुषमा अंधारे यांनी सवाल उपस्थित केले आहेत. यावेळी बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, समितीने पुतळा पाहिला होता का, समितीने पुतळ्याला हिरवा कंदील दाखवला होता का? समितीने जर हिरवा कंदील दिला होता तर कोण ते विद्वान होते ज्याला पुतळ्याचं शरीर सौष्ठव कळलं नाही आणि जर त्यांनी तो हिरवा कंदील दिला नसेल, जर परवानगी दिली नसेल तर तो पुतळा उभा का केला असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे. यावेळी, त्यांनी नितेश राणे आणि जयदीप आपटे यांचे एकत्रित फोटोही दाखवले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
