एक्स्प्लोर

MLA Rohit Pawar on Shivaji Maharaj Statue : वारेSS व्वाSS सरकार! शिवरायांचा पुतळा 2.40 कोटींचा अन् तात्पुरत्या हेलिपॅडसाठी 2.2 कोटींचा खर्च! आमदार रोहित पवारांचा हल्लाबोल

पुतळ्याच्या दर्जावरून सुरुवातीपासून प्रश्नचिन्ह निर्माण होत असतानाच आता पुतळ्याच्या किंमतीच्या जवळपास जाईल इतका खर्च  तात्पुरत्या हेलिपॅडवर झाल्याचा गंभीर आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे. 

MLA Rohit Pawar on Shivaji Maharaj Statue : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. राजकोट किल्ल्यावर महाविकास आघाडी आणि भाजप कार्यकर्त्यामध्ये चांगलेच रणकंदन सुद्धा झाले. ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे राजकोट किल्ल्यावर पोहोचल्यानंतर चांगलाच राडा झाला. दरम्यान पुतळ्याच्या दर्जावरून सुरुवातीपासून प्रश्नचिन्ह निर्माण होत असतानाच आता पुतळ्याच्या किंमतीच्या जवळपास जाईल इतका खर्च  तात्पुरत्या हेलिपॅडवर झाल्याचा गंभीर आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे. 

घरापेक्षा दरवाजे-खिडक्या महाग असाच या सरकारचा दळभद्री कार्यक्रम

आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 2.40 कोटींचा आणि पुतळा अनावरण कार्यक्रमाला येणाऱ्या पाहुण्यांसाठी तात्पुरतं #हेलिपॅड उभारण्याचा खर्च आहे 2.2 कोटी... वारेSS व्वाSS सरकार! घरापेक्षा दरवाजे-खिडक्या महाग असाच या सरकारचा दळभद्री कार्यक्रम म्हणावा लागेल. 78 लाख, 44 लाख अणि 79 लाख असा खर्च तीन तात्पुरते हेलिपॅड उभारण्यासाठी राज्य सरकारने केला. सर्वांत आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे टेंडर डिसेंबर 2023 मध्ये निघालं आणि वर्क ऑर्डर मात्र दोन महिने आधीच सप्टेबर 2023मध्ये देण्यात आल्या. याचाच अर्थ गाव वसण्याआधीच लुटेरे हजर होते. तात्पुरतं हेलिपॅड उभारण्यासाठी एवढा खर्च येतो का आणि दलाली खाण्यासाठी एवढ्या किमतीचं टेंडर काढलं जातं का? यावर संशोधन होणं गरजेचं आहे. राज्य सरकारने यावर उत्तर द्यावं!

24 वर्षांच्या मुलाला कंत्राट कोणी दिले? 

दरम्यान शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी राजकोटवर बोलताना म्हणाले की, महाराजांच्या गडावर राजकारण न करणे हा बालिशपणा आहे. ते म्हणाले, 24 वर्षांच्या मुलाला कंत्राट कोणी दिले? तो फरार आहे, त्याला पळून जाण्यास कोणी मदत केली? सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांवर एफआयआर दाखल झाला आहे का? हे अत्यंत दुर्दैवी आहे. ठाकरे म्हणाले की, महाराजांच्या किल्ल्यांचे राजकारण करू नका, असे मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगितले आहे. त्यामुळे मी कार्यकर्त्यांनाही थांबवले आहे. मला या बालिशपणात पडायचे नाही. पंतप्रधानांना खूश करण्यासाठी त्यांना डिसेंबरमध्ये निवडणुकीपूर्वी बोलावण्यात आले होते.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Indurani Jakhar  : इंदुराणी जाखर पालघरच्या नव्या जिल्हाधिकारी, कल्याण डोंबिवलीहून बदलीचे आदेश
इंदुराणी जाखर पालघरच्या नव्या जिल्हाधिकारी, कल्याण डोंबिवलीहून बदलीचे आदेश
Akola : 'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
नाद खुळा... कंपनीने टार्गेट पूर्ण केलं, मालकाने कर्मचाऱ्यांना SUV कार गिफ्ट दिल्या, 200 कोटींचं जंगी सेलिब्रेशन
नाद खुळा... कंपनीने टार्गेट पूर्ण केलं, मालकाने कर्मचाऱ्यांना SUV कार गिफ्ट दिल्या, 200 कोटींचं जंगी सेलिब्रेशन
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kunal Kamra Special Report : कामराची कॉमडी, प्रेक्षकांना समन्स; पोलीस नोंदवणार प्रेक्षकांचे जबाबSuresh Dhas Full PC : कृषी केंद्राची कंत्राट अप्रत्यक्षपणे कृषी अधिकाऱ्यांकडेच : सुरेश धसSpecial Report Sanjay Raut : मोदींची सप्टेंबरमध्ये निवृत्ती,राऊतांची भविष्यवाणी;भाजप जाळ्यात अडकणार?Anjali Damania On Rajendra Ghanwat : राजेंद्र घनवट यांनी बीडच्या शेतकऱ्यांना छळून त्रास दिला:दमानिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indurani Jakhar  : इंदुराणी जाखर पालघरच्या नव्या जिल्हाधिकारी, कल्याण डोंबिवलीहून बदलीचे आदेश
इंदुराणी जाखर पालघरच्या नव्या जिल्हाधिकारी, कल्याण डोंबिवलीहून बदलीचे आदेश
Akola : 'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
नाद खुळा... कंपनीने टार्गेट पूर्ण केलं, मालकाने कर्मचाऱ्यांना SUV कार गिफ्ट दिल्या, 200 कोटींचं जंगी सेलिब्रेशन
नाद खुळा... कंपनीने टार्गेट पूर्ण केलं, मालकाने कर्मचाऱ्यांना SUV कार गिफ्ट दिल्या, 200 कोटींचं जंगी सेलिब्रेशन
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
शेतकऱ्याकडून 2 लाख 20 हजारांची लाच; तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात अडकला, तलाठी धूम पळाला
शेतकऱ्याकडून 2 लाख 20 हजारांची लाच; तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात अडकला, तलाठी धूम पळाला
शाकाहाराचा अट्टाहास! अनंत अंबानींनी कत्तलाखान्यात जाणाऱ्या 250 कोंबड्या दुप्पट पैसा देऊन विकत घेतल्या
शाकाहाराचा अट्टाहास! अनंत अंबानींनी कत्तलाखान्यात जाणाऱ्या 250 कोंबड्या दुप्पट पैसा देऊन विकत घेतल्या
शिवसेनेला दे धक्का! विधानसभा निवडणुकीत 1 लाखांवर मतं घेतलेल्या उमेदवाराचा उद्धव ठाकरेंना 'जय महाराष्ट्र'
शिवसेनेला दे धक्का! विधानसभा निवडणुकीत 1 लाखांवर मतं घेतलेल्या उमेदवाराचा उद्धव ठाकरेंना 'जय महाराष्ट्र'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल  2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल  2025 | मंगळवार
Embed widget