एक्स्प्लोर
Advertisement
हिंगणघाट जळीतकांडातील आरोपी विकेश नगराळेविरोधात हत्येचा गुन्हा दाखल
हिंगणघाट जळीतकांड प्रकऱणातील आरोपी विकेश नगराळे याच्यावर सुरवातीला कलम 307, 326 (a) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीडितेचा मृत्यू झाल्यानंतर यामध्ये 302 या कलमाची वाढ करण्यात आली आहे
वर्धा : हिंगणघाट येथे पेट्रोल टाकून जाळलेल्या पीडित प्राध्यापक तरुणीचा सोमवारी (10 फेब्रुवारी) मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात 302 या कलमाची वाढ केली आहे. घटनेप्रकरणी आरोपी विकेश नगराळे याच्यावर सुरवातीला कलम 307, 326 (a) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीडितेचा मृत्यू झाल्यानंतर यामध्ये 302 या कलमाची वाढ करण्यात आली आहे. प्रकरणाचा लवकर तपास करून प्रकरणात चार्जशीट दाखल करण्याचा प्रयत्न असल्याचं पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी सांगितलं आहे.
हिंगणघाट जळीत हत्याप्रकरणाच्या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास वेगाने आणि खटला जलद गतीने चालेल यावर कटाक्ष असेल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. आरोपीला गुन्ह्याची शिक्षा मिळालीच पाहिजे. त्याला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, यासाठी तपास यंत्रणा काम करेल. अशा घटनेच्या तपासात कुचाराई होऊ दिली जाणार नाही. पीडिता आणि तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळेल यासाठी शासनाचे संबंधित विभाग समन्वयाने काम करतील. खटला वेगाने आणि दोषीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशा रितीने चालविण्यात येईल. त्यासाठी अॅड. निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Hinganghat Nirbahya | मी हिंगणघाटची लेक बोलतेय! जाता जाता काय म्हणाली निर्भया? स्पेशल रिपोर्ट
एकतर्फी प्रेमातून जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाल्यानंतर हिंगणघाटच्या निर्भयानं 7 दिवस मृत्यूशी कडवी झुंज दिली. मात्र सोमवारी (10 फेब्रुवारी) पहाटे उपचारादरम्यान नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात तिची प्राणज्योत मालवली. पीडितेच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर दारोडाच्या ग्रामस्थांचा आक्रोश अनावर झाला.आधी आरोपीला जिवंत जाळा मग पीडितेवर अंत्यसंस्कार करा अशी मागणी करत ग्रामस्थांनी सुरुवातीला महामार्ग रोखून धरला. त्यानंतर पीडितेचा मृतदेह गावात घेऊन जाणाऱ्या शववाहिनेवर देखील जोरदार दगडफेक करण्यात आली. तसंच दारोडा गावातही पोलिसांना गावकऱ्यांच्या आक्रोशाचा सामना करावा लागला.
पीडितेच्या अंतिम यात्रेदरम्यानही, आरोपीला फाशी द्या अशी घोषणाबाजी केली. 3 फेब्रुवारीला कॉलेजमध्ये जात असताना पीडितेवर आरोपी विकेश नागराळेनं पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला होता. या हल्ल्यात पीडित शिक्षिकेचा चेहरा पूर्णपणे जळाला होता. श्वसननलिकेला देखील मोठी इजा झाली होती. डॉक्टरांनी वेळोवेळी शस्त्रक्रिया करुन पीडितेला वाचवण्याचा पुरेपर प्रयत्न केला होता.
संबंधित बातम्या :
Hinganghat Women Ablaze | आरोपीलाही पीडितेप्रमाणेच यातना व्हायला हव्या, वडिलांची उद्विग्न प्रतिक्रिया
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement