एक्स्प्लोर
Advertisement
पानसरे हत्येचा तपास सीबीआयकडे, मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदिल
कोल्हापूर : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या तपासापाठोपाठ कॉ. गोविंद पानसरेंच्या हत्येचा तपासही आता सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. पानसरे कुटुंबीयांच्या मागणीला मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदिल दाखवला आहे.
गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात यावा अशी मागणी पानसरे कुटुंबीयांकडून करण्यात येत होती. त्यांच्या या मागणीला आज मुख्यमंत्र्यांनी होकार दर्शवला. राज्याच्या मुख्य सचिवांनी यासंदर्भात पानसरे परिवाराला पत्र लिहीलं आहे.
दरम्यान आज मुंबई उच्च न्यायालयात राज्य सरकार आपलं प्रतिज्ञापत्र सादर करणार आहे. त्यानंतर या तपासाची सूत्रं अधिकृतपणे सीबीआयकडे जातील. त्यामुळे दाभोलकरांपाठोपाठ पानसरेंच्या हत्येचा तपासही सीबीआय कसा करतं याकडे सर्वांचं लक्ष असेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
क्राईम
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement