एक्स्प्लोर

Godavari Flood : गोदावरी नदीला पूर, रात्र जागून काढली; पैठणकरांना पुन्हा 2006 ची आठवण

Godavari Flood Aurangabad Rains : गोदावरी नदीला (Godavari River)  पूर आला आहे. त्यामुळे पैठणकरांची चिंता वाढली असून,रात्रीतून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येईल या चिंतेने पैठणकरांनी रात्र जागून काढली

Godavari Flood Aurangabad Rains : जायकवाडी धरणातून (Jayakwadi Dam Update) तब्बल 1 लाख 13 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला असून, गोदावरी नदीला (Godavari River)  पूर आला आहे. त्यामुळे पैठणकरांची चिंता वाढली असून, रात्रीतून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येईल या चिंतेने पैठणकरांनी रात्र जागून काढली आहे.पाण्याचा मोठ्याप्रमाणात विसर्ग सुरू असल्याने शहरातील 625 कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

2006 मध्ये जायकवाडी धरणातून तब्बल 2 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. त्यामुळे गोदावरी नदीला मोठा पूर आला होता. तर पैठण शहरात पाणी घुसल्याने नागरिकांना पूर परिस्थितीचा सामना करावा लागला होता. त्यातच आता दीड लाख क्युसेकने पाणी सोडण्याची तयारी प्रशासनाकडून करण्यात आल्याने, पैठणकरांना पुन्हा 2006 ची आठवण झाली आहे. त्यामुळे पैठण शहरातील नदीकाठच्या नागरिकांनी रात्र जागून काढली आहे.

प्रशासन रात्रभर लक्ष ठेवून...

शनिवारी संध्याकाळी 1 लाख 13 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. त्यानंतर हा विसर्ग दीड लाखापर्यंत वाढवण्यात येईल अशा सूचना प्रशासन दिल्या होत्या. त्यामुळे जायकवाडी प्रशासन, पोलीस प्रशासन आणि इतर स्थानिक प्रशासन रात्रभर पूर परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. जायकवाडी धरणात येणारी आवक आणि होणारा विसर्ग याची क्षणाक्षणाला नोंद घेतली जात होती.

नागरिकांना सतर्कतेचा इशारा...

यावर्षी पहिल्यांदाच जायकवाडी धरणाचे संपूर्ण 27 दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरणातून सध्या 1 लाख 13 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे गोदावरी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर पैठण शहरातील 625 नागरिकांचे स्थलांतरण करण्याच्या हालचाली प्रशासनाकडून सुरू झाले आहे.

जिल्ह्यातील 43 गावांना सतर्कतेचा इशारा...

नाशिक जिल्ह्यातील धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने गोदावरी नदीला पूर आला आहे. त्यामुळे गोदावरी काठच्या 43 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीला पूर आला असून कोणत्याही नागरिकांनी नदीत उतरू नये, जनावरे व इतर साहित्य घेऊन नदी काठावर जाऊ नयेत आशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या

Godavari Flood : जायकवाडी धरणातून 1 लाख 13 हजार क्यूसेकनं पाण्याचा  विसर्ग, 620 कुटुंबांना स्थलांतराच्या सूचना

Jayakwadi Dam : यावर्षी प्रथमच जायकवाडी धरणाचे संपूर्ण 27 दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा 

 

About the author मोसीन शेख

मोसीन शेख
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar : महाराष्ट्र हळहळला, डोळे पाणावले! नाना पाटेकर अनंतात विलीन, डोणजे गावात भावपूर्ण वातावरणात 'नटसम्राटा'ला शेवटचा निरोप
महाराष्ट्र हळहळला, डोळे पाणावले! नाना पाटेकर अनंतात विलीन, डोणजे गावात भावपूर्ण वातावरणात 'नटसम्राटा'ला शेवटचा निरोप
नानांमुळं आमच्या डोक्यावरचा हंडा खाली आला, पाण्याच्या थेंबा थेंबात त्यांची आठवण येत राहिल, नानांच्या आठवणीत महिला भावूक 
नानांमुळं आमच्या डोक्यावरचा हंडा खाली आला, पाण्याच्या थेंबा थेंबात त्यांची आठवण येत राहिल, नानांच्या आठवणीत महिला भावूक 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑक्टोबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑक्टोबर 2026 | गुरुवार
'सदा' राहायला आला नाहीस माझ्याकडे, चारच दिवसांपूर्वी फोनवर बोललो होतो, नाना पाटेकरांच्या आठवणीने सदाभाऊ भावूक
'सदा' राहायला आला नाहीस माझ्याकडे, चारच दिवसांपूर्वी फोनवर बोललो होतो, नाना पाटेकरांच्या आठवणीने सदाभाऊ भावूक

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
USA : अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
Congress Vs CJP : टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
Drought Relief Maharashtra : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
Donald Trump : भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
Embed widget