एक्स्प्लोर

Maharashtra Rain Live Updates : राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी, अकोल्यात जनजीवन विस्कळीत

Maharashtra Rain Live : राज्याच्या काही भागात पावसानं (Rain) चांगलीच हजेरी लावली आहे. हवामान विभागानं (Meteorological Department) दिलेल्या अंदाजानुसार राज्यात पाऊस पडत आहे

Key Events
Maharashtra Rain Live Updates 18 September 2022 Heavy rain in maharashtra Maharashtra Rain Live Updates : राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी, अकोल्यात जनजीवन विस्कळीत
Maharashtra Rain Live

Background

Maharashtra Rain Live Updates : हवामान विभागानं (Meteorological Department) दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात पावसानं (Rain) जोरदार हजेरी लावली आहे.  मुंबईसह ठाणे परिसरात पावसाचा जोर कायम आहे. अनेक ठिकाणी रात्री जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. सकाळपासून देखील मुंबई आणि परिसरात पावसाची रिपरिप सुरु आहे. तसेच राज्यातील पालघर, अकोला, भिवंडी पुणे या परिसरात देखील पावसानं हजेरी लावली आहे. दरम्यान, आज देखील हवामान विभागानं पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आज विदर्भासह मराठवाड्यात पावासाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. 
 
राज्याच्या विविध भागात पाऊस कोसळत आहे. त्यामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. काही ठिकाणी पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. धरणांच्या पाण्यासाठ्यात देखील वाढ झाली आहे. त्यामुळं धरणांमधून पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. त्यामुळं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान आज विदर्भातील सर्व जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, जालना, औरंगाबाद, लातूर बीड या जिल्ह्यातही यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच अहमदनगर, जळगाव जिल्ह्याला देखील यलो अलर्ट देण्यात आला आहे. 

मराठवाड्यातही यलो अलर्ट

दरम्यान, मुंबईत देखील पावसाची रिपरिपस सुरुच आहे. मध्यरात्री मुंबईत जोरदार पावसानं हजेरी लावली होती. त्याचबरोबर ठाणे, नवी मुंबई, पालघर परिसरात देखील जोरदार पाऊस झाला आहे. तसेच पुणे, नाशिक, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बुलडाणा, परभणी, वर्धा, नांदेड, अकोला या जिल्ह्यात देखील पावसानं जोरदार हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. काही ठिकाणी मात्र, या पावसामुळं शेती पिकांचे नुकसान होत आहे. 

अकोल्यात जोरदार पाऊस, शहरातील अनेक भागात शिरलं पाणी

अकोल्यात जोरदार पाऊस झाला आहे. या जोरदार पावसाने शहरातील अनेक भागांत पाणी शिरलं आहे. या पावसामुळं अनेक रस्ते जयमय झाले आहेत. शहरातील मोठी उमरी भागात उमरी ते गुडधी रस्त्यावरील विठ्ठलनगर येथे रस्त्याला अक्षरश: नदीचं रुप आलं आहे. अनेक वाहनधारकांना रस्त्यावरुन वाहने काढतांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. अनेकांचे वाहने रस्त्यात पाण्यामुळ बंद पडल्याने अडकून पडले होते. अनेक ठिकाणी यामुळं वाहतुकीची कोंडी झाली आहे. याच परिसरात अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने घरातील साहित्य तसेच इतर वस्तूंचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, गोरेगाव बुजरुक गावातील बंशा नाल्याला पूर आल्याने गावाचा जिल्हा मुख्यालयासोबतचा संपर्क तुटलाय. अकोला शहराला पाणीपुरवठा करणारा महान येथील काटेपुर्णा प्रकल्प 100 टक्के भरला. धरणाचे 10 पैकी सहा दरवाजे प्रत्येकी 30 सेंटीमीटरने उघडलेत. नदीकाठच्या गावांना अतिदक्षतेचा जिल्हा प्रशासनाचा इशारा.

पंढरपूरच्या व्यास नारायण झोपडपट्टीत शिरलं पुराचं पाणी, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं

उजनी आणि वीर धरणातून काल सोडलेल्या पाण्याचा विसर्ग आज पंढरपूरमध्ये पोहोचला आहे. त्यामुळं चंद्रभागी नदीची पाणी पातळी वाढी आहे. पुराचे पाणी वाढू लागल्यानं व्यास नारायण झोपडपट्टी मधील नागरिकांना सुरक्षित जागी हलवण्यात आलं आहे. सायंकाळी चंद्रभागा तीरावर असणाऱ्या व्यास नारायण वसाहतीतील अनेक घरात पाणी शिरण्यास सुरुवात झाली होती. रात्री ही पाणी पातळी अजून वाढणार असल्याने प्रशासन आणि स्थानिक नगरसेवकांनी या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेण्याची व्यवस्था केली होती. 

 

09:38 AM (IST)  •  18 Sep 2022

वसई विरारमध्ये जोरदार पाऊस

Vasai Virar Rain : वसई विरारमध्ये जोरदार पाऊस सुरु आहे. नालासोपारातील पूर्व आचोळे रोड, सेंट्रल पार्क, विवा कॉलेज रस्ता या ठिकाणी सकल भागात काही प्रमाणात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. पाऊस जर दिवसभर असाच राहिला तर शहरातील अनेक सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. सततच्या पडणाऱ्या पावसाने परिसरात सध्या तरी कुठेही आपत्तीजनक घटना घडल्या नाहीत. विरारहून चर्चगेट जाणाऱ्या आणि येणाऱ्या लोकल सुरळीत चालू आहेत.

07:56 AM (IST)  •  18 Sep 2022

Godavari Flood : पैठणचा मोक्षघाट आजपासून बंद; पुराचे पाणी वाढल्याने प्रशासनाचा निर्णय

Godavari Flood : पैठणच मोक्षघाट आजपासून बंद करण्यात आला आहे.  पुराचे पाणी वाढल्याने प्रशासनाने निर्णय घेतला आहे. जायकवाडी धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग वाढविण्यात आला आहे. जायकवाडी धरणातून एक लाख 13 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू. पैठणच्या मोक्ष घाटापर्यंत पोहोचले पुराचे पाणी. आजपासून मोक्ष घाट नागरिकांसाठी बंद करण्यात आला आहे. आजपासून पुढील आदेशापर्यंत दशक्रिया विधी बंद रहाणार आहे. पैठणच्या मोक्ष घाटावर सर्वसामान्यांना जाण्यासाठी बंदी असणार आहे. मोक्ष घाटाच्या भीतीला पुराचे पाणी जाऊन धडकले असल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
CAG Report: रेल्वे कारभारावर CAGचा गंभीर ठपका! 19, 458 कोटींचा अनधिकृत खर्च, 20 हजारांहून अधिक सुरक्षा कामे रखडली; तर 89 % स्थानकांवर मूलभूत सुविधांचा अभाव
रेल्वे कारभारावर CAGचा गंभीर ठपका! 19, 458 कोटींचा अनधिकृत खर्च, 20 हजारांहून अधिक सुरक्षा कामे रखडली; तर 89 % स्थानकांवर मूलभूत सुविधांचा अभाव
Nashik Crime News: 300 कोटींच्या टेंडरचे आमिष, विभागीय आयुक्तांची डिजिटल स्वाक्षरी अन् राजमुद्रेचा वापर; कुंभमेळ्याच्या बनावट वर्क ऑर्डरद्वारे व्यावसायिकाला 35 लाखांचा गंडा
300 कोटींच्या टेंडरचे आमिष, विभागीय आयुक्तांची डिजिटल स्वाक्षरी अन् राजमुद्रेचा वापर; कुंभमेळ्याच्या बनावट वर्क ऑर्डरद्वारे व्यावसायिकाला 35 लाखांचा गंडा
Chandrashekhar Bawankule: भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?
भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
Mumbai Railway Local Train: मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
Mukesh Khanna Demands To Remove Jana Gana Mana: 'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
IND vs SL 1st Test DAY-3 Live : आकाशात ढगांची गर्दी अन् विजांचा कडकडाट...! तिसऱ्या दिवशीही टीम इंडियाच्या खेळावर पाणी फिरणार?, जाणून घ्या Live अपडेट्स
आकाशात ढगांची गर्दी अन् विजांचा कडकडाट...! तिसऱ्या दिवशीही टीम इंडियाच्या खेळावर पाणी फिरणार?, जाणून घ्या Live अपडेट्स
Manohar Mama Bhosale Case: भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
Ind vs Sl 1st Test Day-3 Weather Forecast Galle : भारत-श्रीलंका कसोटीवर मोठं संकट; तिसऱ्या दिवशी हवामानाचा नेमका अंदाज काय? गॉलमधून धक्कादायक अपडेट
भारत-श्रीलंका कसोटीवर मोठं संकट; तिसऱ्या दिवशी हवामानाचा नेमका अंदाज काय? गॉलमधून धक्कादायक अपडेट
Chandrashekhar Bawankule: भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?
भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?
Nashik Crime News: 'आई लगेच घरी येईल...' सांगून बाबा क्लिनिकला गेले, अन् मागे अनर्थ घडला; दोन सख्ख्या बहिणींचा पाण्याच्या टाकीत पडून दुर्दैवी अंत
'आई लगेच घरी येईल...' सांगून बाबा क्लिनिकला गेले, अन् मागे अनर्थ घडला; दोन सख्ख्या बहिणींचा पाण्याच्या टाकीत पडून दुर्दैवी अंत
Embed widget