Jayakwadi Dam : यावर्षी प्रथमच जायकवाडी धरणाचे संपूर्ण 27 दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
मुसळधार पावसानंतर जायकवाडी धरणात (Jayakwadi Dam) येणारी पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पाण्याची आवक वाढल्यामुळं जायकवाडी धरणाचे संपूर्ण 27 दरवाजे उघडण्यात आले आहे.
Jayakwadi Dam : सध्या राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस (Rain) कोसळत आहे. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला आहे. धरणांच्या पाणी पातळीत देखील मोठी वाढ झाली आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरम्यान, नाशिक (Nashik) जिल्ह्यात देखील मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. या मुसळधार पावसानंतर जायकवाडी धरणात (Jayakwadi Dam) येणारी पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पाण्याची आवक वाढल्यामुळं जायकवाडी धरणाचे संपूर्ण 27 दरवाजे उघडण्यात आले आहे. यावर्षी प्रथमच धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत.
गोदावरी नदीला पूर
दरम्यान, सध्या जायकवाडी धरणातून 99 हजार क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरु आहे. यावर्षी जुलै महिन्यातच जायकवाडी धरणातून पाणी सोडावे लागले होते. दरम्यान दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात होत असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. त्यामुळं जायकवाडी धरणातील आवक सुद्धा वाढली आहे. त्यामुळेच जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणाचे संपूर्ण 27 दरवाजे उघडण्यात आले आहेत. यापूर्वी 18 दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग सुरू असताना आता, आपत्कालीन 9 दरवाजे सुद्धा उघडण्यात आले आहे. त्यामुळं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
असा सुरू आहे पाण्याचा विसर्ग
जायकवाडी धरणाचे एकूण 27 दरवाजे उघडले
यावर्षी पहिल्यांदा 27 दरवाजे उघडले
जायकवाडी धरणाचे 9 आपत्कालीन दरवाजे सुद्धा उघडले
जायकवाडी धरणातून 99 हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू
सर्व दरवाजे 4 फूट उंचीने उघडण्यात आले आहेत.
गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
पाण्याची आवक वाढल्यास विसर्ग ही वाढवण्यात येणार
राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी
सध्या मुंबईत देखील पावसाची रिपरिपस सुरुच आहे. मध्यरात्री मुंबईत जोरदार पावसानं हजेरी लावली होती. त्याचबरोबर ठाणे, नवी मुंबई, पालघर परिसरात देखील जोरदार पाऊस झाला आहे. तसेच पुणे, नाशिक, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बुलढाणा, परभणी, वर्धा, नांदेड, अकोला या जिल्ह्यात देखील पावसानं जोरदार हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. काही ठिकाणी मात्र, या पावसामुळं शेती पिकांचे नुकसान होत आहे. दरम्यान, आजही राज्यात पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. आज पालघर आणि रायगडला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर रत्नागिरीसह पुणे आणि विदर्भात आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना हवामान विभागानं दिल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: