महाड इमारत दुर्घटना : 40 तास जेसीबी चालवणाऱ्या किशोर लोखंडेला शौर्य पुरस्कार द्या, बीडमधील ग्रामस्थांची मागणी
रायगडमधील महाड येथील इमारत दुर्घटनेत बीडच्या किशोर लोखंडेने तब्बल 40 तास जेसीबी चालवत बचावकार्यात मदत केली. त्यामुळे त्याच्या या धाडसी कामगिरीमुळे त्याला शौर्य पुरस्कार देऊन एनडीआरएफ मध्ये नौकरी द्यावी. अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
रायगड : महाड इथल्या इमारत दुर्घटनेत बीडच्या उखंडा गावातील तरुण किशोर लोखंडे याने तब्बल 40 तास जेसीबी चालवण्याचे काम केलं होतं. ज्यामुळे दोन जीव देखील वाचले. किशोरच्या या धाडसी कामाचं कौतुक अख्ख्या महाराष्ट्रानं केलं होतं. तो तरुण गावी आला त्या वेळी गावकऱ्यांनी त्याचा सत्कार करून स्वागत केलंय.
किशोरच्या धाडसी कामगिरीमुळे त्याला शौर्य पुरस्कार देऊन एनडीआरएफमध्ये नोकरी द्यावी. अशी मागणी गावकऱ्यांनी केली असून ग्रामपंचायतने तसा ठराव पास करून याचा प्रस्ताव सरकारकडे पाठविणार असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य प्रकाश कवठेकर यांनी दिली आहे.
किशोरचे धाडसी काम...
घटना 24 ऑगस्ट रोजीची महाड मधली आहे. सायंकाळी साडेसहा वाजता मोठा अवाज झाला. आता नको तारीख गार्डन इमारत पत्त्या सारखी खाली कोसळली. ही घटना वेगाने घडली की, क्षणार्धात इमारत कोसळलेल्या ठिकाणाहून फक्त धुळीचे लोट पाहायला मिळत होते. आधी काहीतरी कोसळण्याचा मोठा आवाज आणि त्यानंतर जमीनदोस्त झालेली मला बघून उपस्थित लोकांच्या हृदयाचा ठोका चुकत होता.
काही वेळापूर्वी ज्या इमारतीमध्ये लोक हसत खेळत राहत होते. किती मारत पक्ष्यासारखे जमिनीवर कोसळले होते आणि याच कोसळलेल्या इमारतीच्या ढिगार्यातून आता आक्रोश कानावर पडत होता. जो तो मदतीसाठी सैरावैरा धावताना पाहायला मिळत होता. इमारत एवढी मोठी होती की, केवळ माणसाने तो ढिगारा बाहेर काढणं कदापि शक्य नव्हतं आणि म्हणूनच आता जेसीबी आणि पोकलेनसाठी विचारणा केली जाऊ लागली.
मदतीसाठी फोन करणाऱ्यांपैकी कुणी तरी एल.अँड.टी कंपनीने ठेका घेतलेल्या पोकलँण्ड मालकाच्या कामगारालाही केला. बीड जिल्ह्याच्या पाटोदा तालुक्यातील उखंडा लिंबडेवी गावचा 24 वर्षीय किशोर हा या कोसळलेल्या इमारती जवळच पोकलेन चालविण्याचे काम करत होता. त्याला कॉन्ट्रॅक्टरचा फोन गेला आणि लवकर घटनास्थळी पोहोचण्यासाठी सांगण्यात आले.
किशोर ज्या वेळी कोसळलेल्या इमारतीचा जवळ पोकलेन घेऊन पोहोचला त्यावेळी समोरचे दृश्य बघून दोन मिनिट तोही निशब्द झाला. कारण पत्त्याप्रमाणे कोसळलेल्या इमारतीचा ढिगारा झाला होता आणि त्यातून माणसं गाडली गेली होती. त्यांना बाहेर काढायचं काम करायचं होतं. किशोरने कामाला सुरुवात केली अनेक मदतीचे हात आता या कोसळलेल्या इमारती जवळ पोहोचले होते. सगळ्यांना चिंता होती, ती या ढिगाऱ्याखाली दबलेल्या माणसांची.
किशोरने न झोपता अखंडपणे 40 तास पॉकलेन चालवण्याचं काम केल. कोसळलेल्या इमारतीचा मलबा हा जास्त नव्हता पण त्याखाली माणसं होती म्हणून काळजी घेऊन काम करणार्या किशोरने एक दिवस, दोन दिवस नव्हे तर तब्बल 40 तास पोकलेन चालवून 10 जणांचे मृतदेह बाहेर काढले. पोकलेन चालवताना कुणी माणूस तरी खाली येणार नाही ना हा विचार करूनच किशोरच्या पोटामध्ये गोळा उठायचा.
कामाला सुरुवात केल्यापासून डोळ्याला डोळा न लावलेल्या किशोर तिथे जेवण करून पुन्हा काम करायचा. त्याच्या कामाचं तेव्हा चीज झालं जेव्हा किशोरने चार वर्षाच्या मुलाला जिवंत बाहेर काढलं. या अगोदर 10 मृतदेह ढिगार्यातून बाहेर काढताना ज्या वेदना किशोरने अनुभवल्या होत्या, त्याच किशोरने मोठ्या शिताफीने 4 वर्ष मुलाचा जीव वाचवला होता. या कामाचा अभिमान गावकऱ्यांना वाटतो आहे. म्हणूनच गावी परत त्यानंतर किशोरला गावकऱ्यांनी फेटा बांधला आणि त्याचं स्वागत केलं.
किशोरच्या धाडसी कामगिरीमुळे त्याला शौर्य पुरस्कार देऊन एनडीआरएफ मध्ये नौकरी द्यावी. अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :