एक्स्प्लोर
आता एसटी स्थानकात मिळणार जेनेरिक औषधं
मुंबई : राज्यातील एसटी स्थानकांवर आता जेनेरिक औषधं विक्रीसाठी ठेवली जाणार आहेत. नुकताच राज्य सरकारने बैठकीत यासंबंधी निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना स्वस्त दरात औषधं मिळणार आहेत.
राज्यातील 568 एसटी आगारांमध्ये जेनेरिक औषधं उपलब्ध करुन दिली जाणार आहेत. एसटी महामंडळाकडून यापूर्वीच निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारनेही जेनेरिक औषधं विकण्याचा निर्णय घेतला आहे. पण ही जेनेरिक औषधं सहजपणे उपलब्ध नसल्याने आता ती एसटी स्थानकांमध्ये विक्रीसाठी ठेवली जातील.
दरम्यान राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर एसटी महामंडळाच्या अधिकारी आणि आरोग्य विभागाची संयुक्त बैठकही होणार आहे. यात जेनेरिक औषधांची विक्री कशी करायची याचा विचार केला जाईल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement