एक्स्प्लोर
यवतमाळचा तरुण इंडोनेशियन मित्राशी विवाहबद्ध
त्याला तिथे बक्कळ पगाराची नोकरी आहे. अमेरिकेत वास्तव्य आणि मोठ्या पॅकेजची नोकरी असल्याने त्याला मुलगी द्यायला कोणीही एका पायावर तयार होतं. परंतु, तो लग्नाला नकार देत असल्याने घरच्यांची काळजी वाढली होती.
यवतमाळ : यवतमाळमध्ये पहिल्यांदाच समलैंगिक विवाह नुकताच पार पडला. शहरातील प्रसिद्ध पुस्तक विक्रेत्याचा मुलगा काल इंडोनेशियाच्या आपल्या मित्राशी विवाहबद्ध झाला. यवतमाळमधील एका पॉश हॉटेलात हा विवाहसोहळा पार पडला.
मात्र या लग्नाची कुठेही चर्चा होऊ नये, यासाठी खास गुप्तता पाळण्यात आली होती. वराच्या आईचा प्रचंड विरोध असल्याने मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत हा विवाह पार पडला.
यवतमाळमधील प्रसिद्ध पुस्तक विक्रेत्याचा मुलगा अमेरिकेत नोकरीला आहे. त्याला तिथे बक्कळ पगाराची नोकरी आहे. अमेरिकेत वास्तव्य आणि मोठ्या पॅकेजची नोकरी असल्याने त्याला मुलगी द्यायला कोणीही एका पायावर तयार होतं. परंतु, तो लग्नाला नकार देत असल्याने घरच्यांची काळजी वाढली होती.
त्याला विचारले असता त्याने आपण समलैंगिक विवाह करणार असल्याचं सांगितलं. त्यावेळी त्याच्या आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. मूळचा इंडोनेशियन असलेल्या आपल्या सहकाऱ्यावर त्याचं प्रेम जडलं होतं. त्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. घरच्यांनी नाईलाजास्तव लग्नास होकार दिला.
लग्नासाठी पॉश हॉटेल बुक करण्यात आलं होतं. माध्यमांचे प्रतिनिधी तेथे पोहोचू नये म्हणून बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला इथे प्रवेश नव्हता. विवाहात सर्वच वैदिक चालीरिती पाळण्यात आल्या. लग्नापूर्वी दोघांना हळद लावण्यात आली. लग्नाचे कपडे, वेडिंग रिंग होतीच. त्यानंतर हार घालून वैदिक मंत्रोच्चारात हे लग्न पार पडलं.
यवतमाळच्या तरुणाचा मित्र इंडोनेशियातील असून तोदेखील अमेरिकेतच राहतो. दोघेही एकाच कंपनीत नोकरीला असून ते काही दिवस 'लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये होते. या लग्नाचे फोटो आज कुणीतरी व्हॉटस्अॅपवर व्हायरल केल्यामुळे या लग्नाची चर्चा सर्वत्र होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement