एक्स्प्लोर
भिवंडीत 11 गोदामांना भीषण आग
माणकोली परिसरात गोदामांना भीषण आग लागली आहे. ही आग एकामोगामोग एक अशा तब्बल 11 गोदामांना लागली.

भिवंडी : माणकोली परिसरात गोदामांना भीषण आग लागली आहे. ही आग एकामोगामोग एक अशा तब्बल 11 गोदामांना लागली. प्लॅस्टिक आणि कच्च्या मालाची ही गोदामं आहेत. आगीने अल्पावधित रौद्र रुप धारण केल्याने आग भडकत आहे. आगीची माहिती मिळताच ठाणे, कल्याण-डोंबवली आणि भिवंडी अशा महापालिकेतील अग्निशमन दलाने धाव घेतली आहे. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरु आहेत. भिवंडी नारपोली पोलिस स्टेशनच्या हद्दीतील सागर कॉम्प्लेक्समधील चेकपॉईंट या कंपनीसह डझनभर गोदामांना आग लागली. आग इतकी भीषण आहे की आजूबाजूच्या परिसरातील सर्व अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. जवळपास डझनभर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीचं भीषण रुप पाहता, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी बराच वेळ लागू शकतो. https://twitter.com/abpmajhatv/status/938311832967708672
आणखी वाचा























