एक्स्प्लोर

शाळेत पेपर फुटीचे प्रकरण आढळल्यास शाळांची मान्यता काढणार, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा

SSC Exam : राज्यातील कोणत्याही शाळेत पेपर फुटीचे प्रकरण आढळल्यास त्या शाळांची मान्यता काढून घेतली जाईल, अशी  घोषणा  शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची विधान परिषदेत केली आहे. 

 Maharashra SSC Exam :   राज्यात दहावीची परीक्षा (SSC Board) सुरु आहे. कोरोनामुळे दोन वर्षांनंतर दहावीची ऑफलाईन परीक्षा सुरु होणार आहे.  बोर्डाच्या पहिल्याच पेपरमध्ये उशिरा येणाऱ्या  विद्यार्थ्यांकडून गैरप्रकार घडत असल्याची घटना समोर आली. त्यानंतर  शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पेपर फुटीप्रकरणी मोठा निर्णय घेतला आहे. कोणत्याही शाळेत पेपर फुटीचे प्रकरण आढळल्यास त्या शाळांची मान्यता काढून घेतली जाईल, अशी  घोषणा  शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची विधान परिषदेत केली आहे. 

 वर्षा गायकवाड म्हणाल्या, नगर जिल्ह्यातील ज्या शाळेत पेपर फुटीचे प्रकरण समोर आले त्याची मान्यता काढून घेण्यात आली आहे. या पुढे ज्या शाळेत पेपरफुटीचे प्रकरण समोर येईल त्या शाळांची मान्यता काढून घेण्यात येईल. तसेच एखाद्या शाळेत कॉपीचे प्रकरण आढळल्यास त्या शाळांना यापुढे परीक्षा केंद्र दिले जाणार नाहीत. 
यासोबतच परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांनी एक तास आगोदर पोहोचावे. सकाळी 10.30  चा पेपर असल्यास 9:30 वाजता तर दुपारी तीन वाजता पेपर असल्यास दोन ला पोहोचावे. परीक्षेला उशिरा आलेल्या विद्यार्थ्यांची पूर्ण तपासणी करूनच परीक्षा केंद्रात सोडले जाणार आहे. 

परीक्षेसंदर्भात गैरसमजाचे वातावरण पसरू नये दहावीचे विद्यार्थी हे राष्ट्राच्या आणि देशाचे भवितव्य आहेत.  त्यांना निर्भीडपणे परीक्षा देण्यासाठी वातावरण निर्माण करावे. शाळा  तिथे परीक्षा केंद्र दिल्याने राज्यात या वेळी दहावीच्या परीक्षेला मोठ्या प्रमाणात परीक्षा केंद्र वाढलेले आहेत. पोलिसांचा बंदोबस्त अधिक देण्याची विनंती आम्ही केलेली आहे. जिल्हाधिकारी आणि इतर अधिकारी यासाठीची माहिती घेऊन परीक्षा सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करत आहेत, असे देखील वर्षा गायकवाड सभागृहात म्हणाल्या.

परीक्षेला येताना विद्यार्थ्यांनी पुढील सूचनांचे पालन करावे

1. सर्व संबंधित विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू होण्यापूर्वी किमान एक तास अगोदर परीक्षा केंद्रावर हजर राहणे गरजेचे असेल

2. विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू होण्यापूर्वी दहा मिनिटे अगोदर म्हणजे सकाळच्या सत्रात 10.20 पर्यंत ते दुपारच्या सत्रात 2.50  मिनिटांनी पर्यंत परीक्षा केंद्रात हजर राहणे गरजेचे असेल

3. विद्यार्थी अपरिहार्य कारणामुळे उशिरा आल्यास त्याच्या शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्याची सर्व तपासणी करून सकाळच्या सत्रात साडेदहा पर्यंत तर दुपारच्या सत्रामध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत प्रवेश दिला जाईल

4.  मात्र, परीक्षा सुरू झाल्यानंतर सकाळच्या सत्रात सकाळी साडेदहा नंतर तर दुपारच्या सत्रात तीन वाजेनंतर कुठल्याही परिस्थितीत विद्यार्थ्याला परीक्षा कक्षा मध्ये प्रवेश दिला जाणार नाही

संबंधित बातम्या :

SSC Exam : बोर्डाच्या परीक्षेला वेळेतच केंद्रावर उपस्थित रहा! अन्यथा प्रवेश नाकारला जाणार, बोर्डाचा महत्वाचा निर्णय

SSC : परीक्षा शुल्क न भरल्याने गरीब मुलीला 10 वीचे परीक्षा प्रवेशपत्र नाकारले; तारापूर येथील धक्कादायक प्रकार

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uttarakhand UCC : लिव्ह-इनमध्ये राहण्यासाठी पालकांची मंजुरी आवश्यक, संबंधातून मूल झाल्यास त्याला कायदेशीर अधिकार; 'या' राज्यात समान नागरी कायदा लागू
लिव्ह-इनमध्ये राहण्यासाठी पालकांची मंजुरी आवश्यक, संबंधातून मूल झाल्यास त्याला कायदेशीर अधिकार; 'या' राज्यात समान नागरी कायदा लागू
Delhi Election : इकडं भाजपच्या दिल्लीकरांसाठी तीन टप्प्यात जाहीरनामा, तिकडं माजी सीएम केजरीवालांकडून 15 गॅरेंटी अन् माफी सुद्धा मागितली!
इकडं भाजपच्या दिल्लीकरांसाठी तीन टप्प्यात जाहीरनामा, तिकडं माजी सीएम केजरीवालांकडून 15 गॅरेंटी अन् माफी सुद्धा मागितली!
Nanded News : माहेरहून सोनं आणण्याचा तगादा, नांदेडमध्ये विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; मात्र लेकीची हत्या केल्याचा माहेरच्यांचा आरोप, गुन्हा दाखल 
माहेरहून सोनं आणण्याचा तगादा, नांदेडमध्ये विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; मात्र लेकीची हत्या केल्याचा माहेरच्यांचा आरोप
पोलिसाचं रेकॉर्डींग व्हायरल करणाऱ्या आठवले गँगवरही मकोका; बीड पोलिसांची दुसरी मोठी कारवाई
पोलिसाचं रेकॉर्डींग व्हायरल करणाऱ्या आठवले गँगवरही मकोका; बीड पोलिसांची दुसरी मोठी कारवाई
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धा 2024 | महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ| Akshay Kothari, Isha KesakarABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स :  3 PM : 27 Jan 2025 : ABP MajhaMahaKumbh Mela | Amit Shah  यांचं  प्रयागराज मध्ये महाकुंभमेळ्यात पवित्र स्नानAmey Khopakar :Chhaava चित्रपटावर MNS ची भूमिका काय? Laxman Utekar Raj Thackeray भेटीची A - Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uttarakhand UCC : लिव्ह-इनमध्ये राहण्यासाठी पालकांची मंजुरी आवश्यक, संबंधातून मूल झाल्यास त्याला कायदेशीर अधिकार; 'या' राज्यात समान नागरी कायदा लागू
लिव्ह-इनमध्ये राहण्यासाठी पालकांची मंजुरी आवश्यक, संबंधातून मूल झाल्यास त्याला कायदेशीर अधिकार; 'या' राज्यात समान नागरी कायदा लागू
Delhi Election : इकडं भाजपच्या दिल्लीकरांसाठी तीन टप्प्यात जाहीरनामा, तिकडं माजी सीएम केजरीवालांकडून 15 गॅरेंटी अन् माफी सुद्धा मागितली!
इकडं भाजपच्या दिल्लीकरांसाठी तीन टप्प्यात जाहीरनामा, तिकडं माजी सीएम केजरीवालांकडून 15 गॅरेंटी अन् माफी सुद्धा मागितली!
Nanded News : माहेरहून सोनं आणण्याचा तगादा, नांदेडमध्ये विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; मात्र लेकीची हत्या केल्याचा माहेरच्यांचा आरोप, गुन्हा दाखल 
माहेरहून सोनं आणण्याचा तगादा, नांदेडमध्ये विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; मात्र लेकीची हत्या केल्याचा माहेरच्यांचा आरोप
पोलिसाचं रेकॉर्डींग व्हायरल करणाऱ्या आठवले गँगवरही मकोका; बीड पोलिसांची दुसरी मोठी कारवाई
पोलिसाचं रेकॉर्डींग व्हायरल करणाऱ्या आठवले गँगवरही मकोका; बीड पोलिसांची दुसरी मोठी कारवाई
महायुती सरकार राज्यातील वाघांची नसबंदी करणार? मोदी सरकारकडे पाठवणार प्रस्ताव, वनमंत्री नाईकांची माहिती  
महायुती सरकार राज्यातील वाघांची नसबंदी करणार? मोदी सरकारकडे पाठवणार प्रस्ताव, वनमंत्री नाईकांची माहिती  
बांगलादेशींना बनावट जन्मदाखले दिल्याचा ठपका, नितीनकुमार देवरे निलंबित, आता तहसीलदार संघटनेची शासनाकडे मोठी मागणी
बांगलादेशींना बनावट जन्मदाखले दिल्याचा ठपका, नितीनकुमार देवरे निलंबित, आता तहसीलदार संघटनेची शासनाकडे मोठी मागणी
Hasan Mushrif : म्हणून मी लवकर निघालो, वाशिममधून तडकाफडकी कोल्हापूरला रवाना होताच हसन मुश्रीफांचा खुलासा!
म्हणून मी लवकर निघालो, वाशिममधून तडकाफडकी कोल्हापूरला रवाना होताच हसन मुश्रीफांचा खुलासा!
सुषमा अंधारे येताच माजी आमदाराने बैठक सोडली, खोचक प्रतिक्रिया; पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेत नाराजी?
सुषमा अंधारे येताच माजी आमदाराने बैठक सोडली, खोचक प्रतिक्रिया; पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेत नाराजी?
Embed widget