एक्स्प्लोर

SSC Exam : बोर्डाच्या परीक्षेला वेळेतच केंद्रावर उपस्थित रहा! अन्यथा प्रवेश नाकारला जाणार, बोर्डाचा महत्वाचा निर्णय

Maharashtra SSC Exam : दहावी- बारावी बोर्डाच्या मागील पेपरमध्ये उशिरा येणाऱ्या  विद्यार्थ्यांकडून गैरप्रकार घडत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर बोर्डाने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे.

 Maharashra SSC Exam : 16 मार्चपासून पुढे होणाऱ्या दहावी- बारावी बोर्ड परीक्षेच्या सर्व पेपरला उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला जाणार आहे. म्हणजेच सकाळच्या सत्रात साडे दहानंतर आणि दुपारच्या सत्रात 3 वाजेनंतर कुठल्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात परीक्षा देण्यास प्रवेश न नाकारला जाणार आहे. बोर्डाच्या मागील पेपरमध्ये उशिरा येणाऱ्या  विद्यार्थ्यांकडून गैरप्रकार घडत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर बोर्डाने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यापुढे परीक्षेला विद्यार्थी दिलेल्या वेळेत पोहोचू शकला नाही तर त्याला परीक्षा कक्षामध्ये कुठल्याही परिस्थितीत प्रवेश दिला जाणार नाही

परीक्षेला येताना विद्यार्थ्यांनी पुढील सूचनांचे पालन करणे गरजेचे असल्याचे बोर्डाकडून सांगण्यात आले आहे.

1. सर्व संबंधित विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू होण्यापूर्वी किमान एक तास अगोदर परीक्षा केंद्रावर हजर राहणे गरजेचे असेल

2. विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू होण्यापूर्वी दहा मिनिटे अगोदर म्हणजे सकाळच्या सत्रात 10.20 पर्यंत ते दुपारच्या सत्रात 2.50  मिनिटांनी पर्यंत परीक्षा केंद्रात हजर राहणे गरजेचे असेल

3. विद्यार्थी अपरिहार्य कारणामुळे उशिरा आल्यास त्याच्या शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्याची सर्व तपासणी करून सकाळच्या सत्रात साडेदहा पर्यंत तर दुपारच्या सत्रामध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत प्रवेश दिला जाईल

4.  मात्र, परीक्षा सुरू झाल्यानंतर सकाळच्या सत्रात सकाळी साडेदहा नंतर तर दुपारच्या सत्रात तीन वाजेनंतर कुठल्याही परिस्थितीत विद्यार्थ्याला परीक्षा कक्षा मध्ये प्रवेश दिला जाणार नाही

या आधीच्या नियमांमध्ये पेपरची लिखाण सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्याला प्रवेश नाकारला जायचं मात्र अपवादात्मक परिस्थितीत विद्यार्थ्याला परीक्षेचे लिखाण सुरू झाल्यानंतर दहा मिनिटे उशीर झाल्यास विलंबाच्या कारणाची खातरजमा करून केंद्रस्तरावर केंद्र संचालकाकडून परवानगी देण्यात येत होती. दहा मिनिटांपेक्षा जास्त उशीर झाल्यास केंद्र संचालक मंडळाचे विभागीय सचिवांची मान्यता घेऊन कारणाची खातरजमा करून अपवादात्मक परिस्थितीत परीक्षा कक्षात प्रवेश देण्याबाबत परवानगी दिली जायची. मात्र आता परीक्षा लेखन सुरू झाल्यानंतर कुठल्याही परिस्थितीची परवानगी विद्यार्थ्याला दिली जाणार नाही.

कारण बोर्डाच्या मागील पेपरमध्ये उशिरा येण्याच्या सवलतीचा लाभ काही विद्यार्थी घेत असून त्या दरम्यान त्यांच्या मोबाईलमध्ये प्रश्नपत्रिकेचा काही असे निदर्शनास आला.  परीक्षेदरम्यान गैरप्रकार घडण्याच्या तक्रारी समोर आल्या ही बाब गंभीर असून यामध्ये काही ठिकाणी कारवाई करण्यात आली. तर काही ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गैरप्रकाराला आळा बसावा यासाठीच बोर्डाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Maharashtra SSC Exams 2022 : ऑल द बेस्ट! दहावी बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात, विद्यार्थ्यांना पेपरसाठी वाढीव वेळ

SSC Board Exam 2022 : दहावीचं हॉलतिकीट 30 हजार रुपये, 10 हजार घेताना संस्थाचालकाला अटक, औरंगाबादमधील धक्कादायक प्रकार

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; व्हिआयपी दर्शनासाठ अट्टाहास नडला
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; व्हिआयपी दर्शनासाठ अट्टाहास नडला
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये ६८ जागांसाठी होणार निवडणूक, कोण मारणार बाजी?
Sanjay Raut : मनसे आणि शिवसेनेमध्ये मुंबईसह इतर महापालिकांमध्ये युती - संजय राऊत
Supriya Sule Full PC : युतीचा काही फॉर्मल प्रस्वात माझ्याकडे आलेला नाही, सुप्रिया सुळेंचं स्पष्टीकरण
Raj Uddhav Thackeray Brothers Alliance : उद्या दुपारी 12 वाजता ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार
Ratnagiri Lote MIDC : इटलीतून हद्दपार केलेला प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसीमध्ये सुरु

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; व्हिआयपी दर्शनासाठ अट्टाहास नडला
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; व्हिआयपी दर्शनासाठ अट्टाहास नडला
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
मोठी बातमी! ठाकरेंनंतर पवारांच्याही युतीची तारीख ठरली; अजित पवार 26 तारखेला घोषणा करणार !
मोठी बातमी! ठाकरेंनंतर पवारांच्याही युतीची तारीख ठरली; अजित पवार 26 तारखेला घोषणा करणार !
मोठी बातमी! ठाकरे बंधूंच्या युतीची उद्या दुपारी 12 वाजता घोषणा; मुंबईचं जागावाटपही निश्चित, मनपासाठी ठाकरे सज्ज
मोठी बातमी! ठाकरे बंधूंच्या युतीची उद्या दुपारी 12 वाजता घोषणा; मुंबईचं जागावाटपही निश्चित, मनपासाठी ठाकरे सज्ज
Embed widget