एक्स्प्लोर

डॉ. जगन्नाथ वाणी यांचं कॅनडात निधन

धुळे : आपल्या सामाजिक कार्यातून भारतासह परदेशातही ठसा उमटविणारे प्रा. डॉ. जगन्नाथ वाणी यांचं कॅनडात कर्करोगाने निधन झालं. ते 83 वर्षांचे होते. त्यांच्यावर कॅनडातच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. साल 1965 पासून ते कॅनडामध्ये स्थायिक आहेत. डॉ. वाणी यांनी धुळ्यात का. स. वाणी मराठी प्रगत अध्ययन संस्था, मूक बधिरांसाठी शाळा स्थापन केली. विज्ञानाच्या प्रचार, प्रसारासाठी रेऊ वाणी विज्ञान विहार, गरीब विद्यार्थ्यांची गावोगावी नेत्र तपासणी करून मोफत चष्मे वाटप, कमलिनी आय हॉस्पिटलची उभारणी आणि गरीबांना मोफत उपचाराची सोय उपलब्ध करुन दिली. शस्त्रक्रिया, सिजोफ्रेनिया या आजाराच्या रुग्णांसाठी पुण्यात सामाजिक कार्याची उभारणी आणि त्यातील संघटनातून राज्यभरातील अशा रूग्णांच्या मदतीसाठी पुढाकार आदी विधायक कार्यातून त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला होता. विमा-संख्याशास्त्र या विषयाचे संशोधक - प्राध्यापक म्हणून कॅनडाच्या विद्वत वर्तुळात डॉ. वाणी प्रसिद्ध होते. डॉ. वाणी यांनी केलेल्या प्रदीर्घ सामाजिक कार्यासाठी त्यांना ‘ऑर्डर ऑफ कॅनडा’ या कॅनडाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. ज्या ठिकाणी डॉ. वाणी राहिले त्या उत्तर अमेरिकेलाही त्यांनी भरभरून दिलं. भारतीय संगीत आणि नृत्याच्या प्रसारार्थ त्यांनी स्थापन केलेली ‘रागमाला सोसायटी’ असो, की तुलनेने विरळ मराठी वस्ती असलेल्या कॅलगरी भागात मराठी भाषकांना एकत्र आणणारी ‘ कॅलगरी मराठी असोसिएशन’. उत्तर अमेरिकेतल्या सामाजिक-सांस्कृतिक उपक्रमांमध्ये ते सातत्याने सहभागी असत. 2001 साली कॅलगरी या सुंदर गावात बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या द्वैवार्षिक अधिवेशनाचे आयोजनही त्यांनी एकट्याच्या बळावर यशस्वीपणे तडीला नेलं होतं. एवढेच नव्हे, तर उत्तर अमेरिकेतल्या या सर्वात भव्य मराठी आयोजनांमध्ये लेखक-विचारवंतांनाच अध्यक्ष म्हणून बोलावण्याची परंपरा डॉ. वाणी यांनी मोडली आणि डॉ. अभय बंग यांना आमंत्रित केलं. त्यानंतरच्या मराठी अधिवेशनांमध्ये महाराष्ट्रातल्या सामाजिक कामांना मानाचं पान मिळत गेलं, त्यामागे डॉ. वाणी यांचा कृतीशील आग्रहच होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
Shirala Vidhan Sabha constituency : मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
Sharad Pawar : राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
''आपल्या राजाच्या वडिलांच्या नावाची बदनामी नको; शहाजी नाव काढून खोके पाटील ठेवा, कोर्टात जावा''
''आपल्या राजाच्या वडिलांच्या नावाची बदनामी नको; शहाजी नाव काढून खोके पाटील ठेवा, कोर्टात जावा''
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 1 PM :18 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 02 PM : 18 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray Speech Shivdi : उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा? शिवडीत राज ठाकरेंचा हल्लाबोलBala Nandgaonkar Full Speech : भर उन्हात बसून राज ठाकरेंनी ऐकलं बाळा नांदगावकर यांचं भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
Shirala Vidhan Sabha constituency : मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
Sharad Pawar : राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
''आपल्या राजाच्या वडिलांच्या नावाची बदनामी नको; शहाजी नाव काढून खोके पाटील ठेवा, कोर्टात जावा''
''आपल्या राजाच्या वडिलांच्या नावाची बदनामी नको; शहाजी नाव काढून खोके पाटील ठेवा, कोर्टात जावा''
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर दक्षिणमध्ये भाजप हॅटट्रीक साधणार की ठाकरेंचा उमेदवार गड जिंकणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर दक्षिणमध्ये भाजप हॅटट्रीक साधणार की ठाकरेंचा उमेदवार गड जिंकणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर मध्यमधून काँग्रेसची जादू चालणार की आडम मास्तरांना मताधिक्य मिळणार? कोण मारणार बाजी
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर मध्यमधून काँग्रेसची जादू चालणार की आडम मास्तरांना मताधिक्य मिळणार? कोण मारणार बाजी
Rohit Pawar : शरद पवार राजकारणातील वस्तादांचे वस्ताद,  रोहित पवारांचं आजोबांसमोर धडाकेबाज भाषण, राम शिंदेंवर डागली तोफ
शरद पवार राजकारणातील वस्तादांचे वस्ताद, रोहित पवारांचं आजोबांसमोर धडाकेबाज भाषण, राम शिंदेंवर डागली तोफ
नाशिकमध्ये नामांकित हॉटेलवर निवडणूक अधिकाऱ्यांचा छापा, कोऱ्याकरकरीत नोटांच्या बंडलांनी भरलेली बॅग सापडली
नाशिकमध्ये नामांकित हॉटेलवर निवडणूक अधिकाऱ्यांचा छापा, कोऱ्याकरकरीत नोटांच्या बंडलांनी भरलेली बॅग सापडली
Embed widget