एक्स्प्लोर
Advertisement
मुख्यमंत्री निवासस्थानी डान्सबारबाबत डील झाली : नवाब मलिक
शायना एनसी आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी मध्यस्थी केली होती आणि त्यामध्ये मोठी आर्थिक देवाणघेवाण झाल्याचे सांगतानाच सर्वोच्च न्यायालयात सरकारने बाजू कमकुवत ठेवली असा आरोपही नवाब मलिक यांनी केला.
मुंबई : मुख्यमंत्री निवासस्थानी डान्सबारबाबत डील झाली असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला. दोन वर्षांपूर्वी भाजपचा वरिष्ठ नेता आणि डान्सबार मालक यांच्यात बैठक झाली आणि शायना एनसी आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी मध्यस्थी केली होती आणि त्यामध्ये मोठी आर्थिक देवाणघेवाण झाल्याचे सांगतानाच सर्वोच्च न्यायालयात सरकारने बाजू कमकुवत ठेवली असा आरोपही नवाब मलिक यांनी केला.
महाराष्ट्रात डान्सबारची छमछम सुरु होण्याचा मार्ग मोकळा
दरम्यान आमचं सरकार आलं की पुन्हा डान्सबार बंदी आणणार असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले. डोंबिवली शस्त्रप्रकरणात राज्यमंत्री रवींद्र चव्हाण हे आरोपीची पाठराखण करत असून मुख्यमंत्र्यांच्या आदेशामुळे पोलिसांनी धनंजय कुलकर्णी यांचा रिमांड मागितला नाही असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. नवाब मलिक अजूनही नैराश्यातून बाहेर आलेले नाहीत: आमदार आशिष शेलार नवाब मलिक हे अजूनही नैराश्यातून बाहेर आलेले नाहीत आणि येणारही नाहीत त्यामुळे वारंवार खोटे आरोप करणे हे त्यांच्याकडून घडत असते. आज आरोप केल्या प्रमाणे अशी कोणती बैठक झालेली नाही त्यामुळे त्याच्याशी माझा संबंध असण्याचे कारण नाही. डान्स बार, मालक या विषयाशी माझा कोणताही संबंध नाही. जे नेहमी सेटलमेंट मध्ये असतात त्यांच्याच डोक्यात असे सेटलमेंटचे विषय येत राहतात. माझा अशा कुठल्याही विषयाशी संबंध नाही पण गेली 5 वर्षे नैराश्यात असलेल्या नवाब मलिक यांच्यावर जालीम इलाज करण्यासाठी चांगला डॉक्टर सापडला तर त्या डॉक्टरांसोबत मी त्यांची नक्की बैठक करून देईन. संबंधित बातम्यामहाराष्ट्रात डान्सबारची छमछम सुरु होण्याचा मार्ग मोकळा
महाराष्ट्राच्या दृष्टीने हा काळा दिवस : स्मिता पाटील
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
नागपूर
निवडणूक
Advertisement