एक्स्प्लोर

Crime: व्हॉटसअॅपवरुन खुनाचा उलगडा, पतीकडून पत्नीची गळा आवळून हत्या, विरारमधील खळबळजनक घटना 

Crime News : विरारमध्ये चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीची गळा आवळून हत्या केली आहे. व्हॉटसअप स्टेटसवरून या खुनाचा उलगडा झाला आहे.

Crime News : विरारमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीची गळा आवळून हत्या केली आहे. प्रियंका उर्फ पिंकी पाटील असे हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. तर वैभव पाटील असं संशयीत पतीचं नाव आहे.  हत्येनंतर वैभव याच्या व्हॉटसअॅप स्टेटसवरुन त्याने पत्नीची हत्या केल्याचे उघड झाले. सध्या तो फरार असून त्याच्या मित्राला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, विरारच्या शंकर पाड्यातील जीवदानी अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या प्रियांका उर्फ पिंकी पाटील हिचा मृतदेह 1 फेब्रुवारी रोजी तिच्या राहत्या घरात विरार पोलिसांना मिळाला होता. मृतदेहाचा वास येत असल्याने शेजाऱ्यांनी घर मालकाला बोलावून विरार पोलिसांच्या मदतीने घरात प्रवेश केला. त्यावेळी मयत प्रियंकाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मिळून आला होता. मृतदेह मिळाल्यानंतर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर मृत प्रियांका हिची बहिण बबिता भोईर हिच्याकडे चौकशी केली. यावेळी पोलिसांना माहिती मिळाली की, प्रियांका आणि तिचा पती वैभव पाटील यांनी घरातून पळून जावून लग्न केलं होतं. त्यानंतर 4 जानेवारीपासून दोघे विरार येथे एका घरात भाड्याने राहत होते. वैभव प्रियांकाच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याची माहिती पोलिसांना दिली. 

माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पती वैभवच्या फोनवर त्याला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याचा फोन लागत नव्हता. त्याचवेळी मृत प्रियांकाचा भाऊ किरण जाधव याने पोलिसांना माहिती दिली की, संशयीत आरोपी पती वैभव पाटील याने दोन दिवसापूर्वी  व्हॉटसअॅपवर विचित्र स्टेटस ठेवला होता. किरण याने वैभवच्या स्टेटसचा स्क्रिनशॉट  पोलिसांना दिला. त्यावर वैभव पाटील याने आई वडिलांना उद्देशून, सॉरी मम्मी पापा मी मोठं पाऊल आज घेणार आहे, असा स्टेटस ठेवला होता. याबरोबरच बहिणीला उद्देशून सॉरी ताई, असा स्टेटस ठेवला होता. त्यामुळे पोलिसांचा संशय अधिक बळावला. त्यात शवविच्छेदन अहवालात प्रियांकाची गळा आवळून हत्या केल्याचे समोर आले. 

पोलिसांनी प्रियांकाच्या हत्येबाबत वैभव याच्यावर गुन्हा दाखल केला आणि अधिक तपास सुरू केला. यावेळी वैभव पाटीलचा मित्र संकेत राऊत प्रियंकाचा खून करताना साथीदार होता. माहिती मिळाल्यानंतर त्याला विरार पोलिसांनी अटक केली आहे. तर वैभव पाटीलचा शोध विरार पोलिस घेत आहेत, अशी माहिती विरार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे  यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या 

बंदुकीचा धाक दाखवून 31 वर्षीय महिलेवर बलात्कार करणारा संस्थाध्यक्ष गजाआड, भिंवडीत गुन्हा दाखल 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

खासगी विकासकाने चार वर्षांचं भाडं दिलं नाही, झोपडीधारकाची आत्महत्या, जोगेश्वरीमधील घटना
खासगी विकासकाने चार वर्षांचं भाडं दिलं नाही, झोपडीधारकाची आत्महत्या, जोगेश्वरीमधील घटना
Devendra Fadnavis : वाढवण ते नाशिक हायस्पीड कनेक्टिविटी तयार करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रशासनाला निर्देश
वाढवण ते नाशिक हायस्पीड कनेक्टिविटी तयार करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रशासनाला निर्देश
Manoj Jarange Patil and Anjali Damania : मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्यावर लातूर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल
मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्यावर लातूर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल
शिव्या, शाप, आरोप... आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटीवर एकनाथ शिंदे बोलले; म्हणाले, ही नवी जात
शिव्या, शाप, आरोप... आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटीवर एकनाथ शिंदे बोलले; म्हणाले, ही नवी जात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 09 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सZero Hour Full : 'इंडिया'आघाडी दिल्लीत फुटणार? ते मुंबईतील रखडलेल्या पुलांची समस्याZero Hour Mumbai Mahapalika :महापालिकेचे महामुद्दे :मुंबईत रखडलेल्या पुलांची समस्या अन् वाहतूक कोंडीZero Hour :विरोधकांची इंडिया आघाडी दिल्लीत फुटणार? Anand Dubey Atul Londhe Keshav Upadhyay EXCLUSIVE

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
खासगी विकासकाने चार वर्षांचं भाडं दिलं नाही, झोपडीधारकाची आत्महत्या, जोगेश्वरीमधील घटना
खासगी विकासकाने चार वर्षांचं भाडं दिलं नाही, झोपडीधारकाची आत्महत्या, जोगेश्वरीमधील घटना
Devendra Fadnavis : वाढवण ते नाशिक हायस्पीड कनेक्टिविटी तयार करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रशासनाला निर्देश
वाढवण ते नाशिक हायस्पीड कनेक्टिविटी तयार करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रशासनाला निर्देश
Manoj Jarange Patil and Anjali Damania : मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्यावर लातूर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल
मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्यावर लातूर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल
शिव्या, शाप, आरोप... आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटीवर एकनाथ शिंदे बोलले; म्हणाले, ही नवी जात
शिव्या, शाप, आरोप... आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटीवर एकनाथ शिंदे बोलले; म्हणाले, ही नवी जात
हेल्थ इज वेल्थ: हृदयाच्या संबंधित रुग्णांनी कराव्यात 'या' आरोग्य तपासण्या; रक्तदाब निरीक्षणही महत्त्वाचे
हेल्थ इज वेल्थ: हृदयाच्या संबंधित रुग्णांनी कराव्यात 'या' आरोग्य तपासण्या; रक्तदाब निरीक्षणही महत्त्वाचे
पुणे विद्येचं माहेरघर, शहरातील प्रत्येक शिक्षणसंस्थेवर संघाचे लोक; शरद पवारांकडून पुन्हा RSS चं कौतुक
पुणे विद्येचं माहेरघर, शहरातील प्रत्येक शिक्षणसंस्थेवर संघाचे लोक; शरद पवारांकडून पुन्हा RSS चं कौतुक
बीड जिल्ह्यात वर्षभरात 40 खुनाचे गुन्हे, सर्वच उघड करण्यास पोलिसांना यश; गतवर्षीच्या तुलनेत सरस कामगिरी
बीड जिल्ह्यात वर्षभरात 40 खुनाचे गुन्हे, सर्वच उघड करण्यास पोलिसांना यश; गतवर्षीच्या तुलनेत सरस कामगिरी
धक्कादायक! घराबाहेर पडलेल्या 80 वर्षाच्या महिलेवर बिबट्याची झडप, 500 मीटर फरफटत नेले, मृतदेह छिन्नविछिन्न
धक्कादायक! घराबाहेर पडलेल्या 80 वर्षाच्या महिलेवर बिबट्याची झडप, 500 मीटर फरफटत नेले, मृतदेह छिन्नविछिन्न
Embed widget