'मला कोरोना झालाय'.. मनोरुग्णाचा पोलीस चौकीत घुसून धुडगूस; कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण
लातूर शहरात एका मनोरुग्णाने मला कोरोना झालाय असं सांगत पोलीस चौकीत धुडगूस घातला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे पोलिसांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

लातूर : कोरोना व्हायरसच्या भीतीने सर्वांची पाचावर धारण बसलीय. अशात जर तुमच्याजवळ येऊन 'मला कोरोना झालाय असं म्हटलं तर?' भीती वाटेल ना? असाच एक प्रकार लातूर शहरात घडला. एक मनोरुग्ण थेट पोलीस चौकीत मला कोरोना झालाय ओरडत शिरला. यामुळे चौकीत एकच गोंधळ उडाला. हा मनोरुग्ण इथेच न थांबता एका पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर थुंकत त्याने कार्यलयात तोडफोड केली. अचानक घडलेल्या या कृतीने पोलीसही चक्रावून गेले होते. मात्र, हा व्य्क्ती मनोरुग्ण असल्याचे लक्षात येताच त्यांनी त्याला पकडून जिल्हा रुग्णालयात भरती केलं. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
शहरातील विवेकानंद पोलीस चौकीत आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मोठा अनुचित प्रकार घडला. एका मनोरुग्णाने चौकीत घुसून कार्यलयातील संगणक, केबिनची काच आदी सामानाची तोडफोड केली. किमान एक तास या व्यक्तीचा चौकीमध्ये गोंधळ चालू होता. पोलीस चौकीत येण्याअगोदरच त्याने दोघांची डोकी फोडल्याचीही माहिती मिळाली आहे. चौकीमध्ये घुसल्यानंतर त्या ठिकाणी पीएसओ झोपलेले असताना त्यांच्या अंगावर मला कोरोणा झालाय म्हणून थुंकू लागला. हे ऐकताच कोरोना संसर्गाच्या भीतीने एपीआय तरूणे व इतर पोलीस कर्मचारी धावत बाहेर आले.
Lockdown | मुंबईत सक्तीचं लॉकडाऊन राबवणार; कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकारचं पाऊल
काही पोलिसांनी त्याच्यावर निर्जंतुकीरणाचा फवारा मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तो फवारा हिसकावुन घेवून त्याने जमिनीवर आपटला. आतमध्ये उडी मारून कार्यालयातील लॅपटॉप, टेबल आदीची जबर तोडफोड केली. या प्रकाराने गोंधळुन गेलेल्या पोलिसांनी हा मनोरूग्ण आहे हे लक्षात येताच. त्याला आवरून शहरातील जिल्हा शासकीय सर्वोपचार रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. कौटुंबिक अडचणीमुळे तो मानसिक रूग्ण झाला आहे. सदरील व्यक्तिवर शासकीय कामात अडथळा म्हणून 353 दाखल करण्यात आली आहे. या घटनेमुळे पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
राज्यातही आमदारांच्या वेतनात एक वर्ष कपात; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
राज्यात कोरोनाबाधित वाढले राज्यात कोरोनाचा प्रसार वेगाने होताना दिसत असून आताच्या घडीला 1364 नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे. मुंबईत सर्वाधिक 876 जण कोरोना संक्रमित आहेत. मुंबई हा दाट वस्तीचा प्रदेश असल्याने सरकारसाठी चिंता वाढली आहे. दरम्यान, कोरोनामुळे होणारा मृत्यूदर इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. राज्यात कोरोनामुळे आतापर्यंत 97 जणांचा बळी गेला आहे. यापैकी मुंबईत 54, पुणे 24 अशी बळींची संख्या आहे.
Pravin Pardeshi | सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्क वापरा, मास्क वापरल्याने जपानमध्ये रूग्ण संख्या कमी : आयुक्त प्रविणसिंह परदेशी























