Lockdown | मुंबईत सक्तीचं लॉकडाऊन राबवणार; कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकारचं पाऊल
कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी मुंबईत सक्तीचे लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. त्याशिवाय मुंबईत आता रॅपीड टेस्ट घेण्यात येणार आहे.
मुंबई : आताच्या घडीला मुंबईत सर्वाधिक 746 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. धारावी सारख्या दाट वस्ती असलेल्या प्रदेशात कोरोना विषाणूने शिरकाव केल्याने हा आकडा वेगाने वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. याला आळा घालण्यासाठी मुंबईत सक्तीचे लॉकडाऊन करण्याचा निर्णय झाला आहे. याची प्रभावी अमलबजावणी करण्यासाठी धारावी सारख्या विभागात एसआरपीएफची मागणी करण्यात आली असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय. तसेच गर्दी होते का? हे पाहण्यासाठी ड्रोनच्या माध्यमातून नागरिकांवर निरक्षण ठेवण्यात येईल, असा देखील निर्णय घेण्यात आल्याचं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाची राज्यातील परिस्थितीची माहिती दिली. कोरोनाला रोखण्यासाठी आगामी काळात उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली. मुंबईमध्ये धारावी लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेला विभाग आहे. परिणामी धारावीमध्ये गर्दी मोठ्या प्रमाणावर आहे. सार्वजनिक शौचालय असल्याने तिथं मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्याठिकाणी पूर्ण विभाग हा सॅनिटाइजेशन करण्याची सूचना महानगरपालिकेने करावे अशी सूचना देण्यात आली. यासाठी ड्रोन व अग्निशमन दलाचा वापर करावा. तसेच दिस इन्फेक्तेड टनेलची मागणी केली आहे.
मुख्यमंत्र्यांची राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून शिफारस, उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार
मुंबईत रॅपीड चाचणी होणार कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जास्तीत जास्त लोकांची कोरोना चाचणी करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर रॅपिड टेस्टची मागणी मुंबई महानगरपालिकेने केली आहे. हे किट आल्यावर सर्वप्रथम वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे टेस्ट केली जाणार आहे. पुढे जेवणाचा प्रश्न निर्माण होत आहे. यासाठी अनेक सामाजिक संस्था पुढे आल्या आहेत. यासाठी सरकारच्या मदतीने कम्युनिटी किचनचे काम व्हावे असा विचार करण्यात आला असल्याचेही टोपे म्हणाले. मुंबईत लहान घरात अनेक लोक रहातात. त्यामुळे जवळच्या शाळा उपलब्ध करून देऊन याबाबत सहकार्य करण्याची मागणी बैठकीत करण्यात आली आहे.
औरंगाबादमध्ये पोलिसांच्याच काठीने पोलिसांना मारहाण, तिघांना अटक, तीन आरोपी फरार रॅपिड टेस्ट आणि कोरोना मध्ये फरक आहे. रॅपिड टेस्ट ही टेस्ट एखाद्या व्यक्तीला इन्फेक्शन झालं आहे का यासाठी करतात. रॅपिड टेस्टमध्ये इन्फेक्शन झालं असेल तर शरीरातील रोगप्रतिकारक पेशी वाढतात. जर पेशी वाढल्या असतील तर ह्याच अर्थ इन्फेक्शम झालं आहे. मग इन्फेक्शन हे कोरोना आहे की नाही हे कोरोना टेस्ट केल्यावर समजतं. सरसकट कोरोना टेस्ट करण्यापेक्षा रॅपिड टेस्ट ही गाळणी आहे. दरम्यान, रॅपीड टेस्ट करण्यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे परवानगी मागितली होती. केंद्राने ही परवानगी दिल्याने आता राज्यात रॅपीड टेस्ट घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
Ration Scam | संकटाच्या काळातही भ्रष्टाचाराची कीड संपेना! रेशन दुकानदारांकडून ग्राहकांची लूट सुरू