एक्स्प्लोर
LIVE UPDATES | लोणावळ्यात सात दिवसांचा लॉकडाऊन घेण्यासाठी प्रस्ताव
- ऐश्वर्या राय बच्चनसह मुलगी आराध्या नानावटी रुग्णालयात भरती - नवी मुंबईत डॉक्टर असल्याचे सांगून रूममध्ये प्रवेश करीत कोरोना सेंटरमध्ये बलात्कार -मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर पालकमंत्र्यांच्या सल्ल्याने प्रशासक, खंडपीठाची राज्य शासनास नोटिस - कोरोना निगेटिव्ह विक्रेत्याकडूनच वाण-सामान खरेदी करा : औरंगाबाद मनपा - कोविड संसर्गाचा कल समजून घेण्यासाठी मुंबईत पालिकेकडून सेरो सर्वेक्षण सुरू कोरोना व्हायरस, लॉकडाऊन आणि सर्व महत्वाचे अपडेट आणि घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

Background
कोरोना व्हायरससह इतर महत्वाच्या घडामोडीचं अपडेट या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
बिग बी अमिताभ बच्चन, अभिनेते अभिषेक यांच्यानंतर आता ऐश्वर्या राय बच्चन आणि त्यांची मुलगी आराध्याला देखील नानावटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या चौघांना ही कोरोना ची लागण झाली होती. मात्र, ऐश्वर्या आणि आराध्याला लक्षणे नसल्याने घरीच होम क्वॉरंटाईन करण्यात आले होते. मात्र, आज ऐश्वर्याला ताप आणि घशात त्रास होऊ लागला तेव्हा त्यांना संध्याकाळी नानावटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र, त्यांची तब्येत स्थिर असल्याची माहिती मिळते आहे.
आतापर्यंत 99 डॉक्टरांचा कोरोनाने मृत्यू तर 1302 संक्रमित; IMA कडून रेड अलर्ट जारी
कोरोना संकटकाळात आघाडीवर लढणाऱ्या डॉक्टरांपैकी आतापर्यंत 99 डॉक्टरांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची धक्कादायक माहिती डॉक्टरांची संघटना इंडियन मेडिकल असोसिएशनने दिली आहे. तर आतापर्यंत 1302 डॉक्टरांना कोरोना विषाणूची बाधा झाली आहे. विशेष म्हणजे सर्वसामान्य नागरिकांपेक्षा डॉक्टरांचा मृत्युदर जास्त आहे. या सर्व पार्श्वभूमीवर इंडियन मेडिकल असोसिएशनने देशातील सर्व सदस्य डॉक्टरांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे.
17:23 PM (IST) • 18 Jul 2020
पुण्यातील येरवडा कारागृहात पळालेल्या एका आरोपीच्या वाकड पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. सनी पिंटो असं त्याचं नाव आहे. तात्पुरत्या कारागृहातुन 15 जुलैच्या रात्री इतर सहकाऱ्यांसोबत त्याने पळ काढला होता. तिथून तो पिंपरी चिंचवड शहरातील बोट क्लब परिसरात लपून बसला होता. खबऱ्याने दिलेल्या बातमीच्या आधारे वाकड पोलिसांनी सापळा रचत त्याच्या मुसक्या आवळल्या.
17:27 PM (IST) • 18 Jul 2020
गडचिरोलीत नक्षल विरोधी सुरक्षा दलात तब्बल 72 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह. एकूण 204 CRPF-SRP जवानांना संसर्ग, आतापर्यंत 1200 हुन अधिक जवान झालेत जिल्ह्यात दाखल, जिल्हा पोलीस आणि CRPF ने संयुक्तपणे उभारली आहे विलगीकरण सुविधा, जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या देखील वाढतीच.
Load More
Tags :
HSC Results Live Update. Coronavirus Amitabh Bacchan Coivd Positive Live News Lockdown Unlock Bollywood Breaking News Maharashtra Covid 19मराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
मुंबई
बीड
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement


















